ज्ञानियाचा एका बोल हे ऐकता । ठेवितो मी माथा तुझ्या पायी ॥१॥ ज्ञानाईने तुला सांगताच स्वप्नी । आलास धावुनी आळंदीस ॥२॥ तूच एक पुत्र खरा श्रद्धावंत । माऊलीचे आर्त जाणणारा ॥३॥ नंदिद्वारातून प्रवेशसी आत । माय कॄपावंत पाहिलीस ॥४॥ कंठी रुतलेली अजानाची मुळी । काढून तू माऊली मुक्त केली ॥५॥ पान्हावून तिने पोटाशी धरिले । आपलेसे केले त्याच क्षणी ॥६॥ ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच शुद्ध । पाठांतरी अबद्ध होता झाला ॥७॥ तिच्याच आज्ञेने करुनि प्रतिशुद्ध ।आमच्या हातात दिलास तू ॥८॥ भाव धरुनिया वाचा ज्ञानेश्वरी । मंत्र हा वैश्वरी तूच दिला ॥९॥ तुझे हे वचन मानुन प्रमाण । अहो रात्र पठण केले आम्ही ॥१०॥ वाचता वाचता भेटला श्रीहरि । अमॄत अक्षरी लपलेला ॥११॥ हंसगीत म्हणे आला अनुभव । श्रीहरि ज्ञानदेव दोन्ही एक ॥१२॥
श्री सद्गुरु कॄपांमृत या भक्तिकाव्य ग्रंथातून
श्री मधुकरराव कुलकर्णी - कॄतार्थ सो.सा. सातारा रोड पुणे -३७
कल्याणी विशेषांक
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org