Marathi / English

अध्याय १८

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय अठरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका । कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥ वर्णाश्रमादि मर्यादा । त्याचा सेतू तूं गोविंदा । तूं कारण वेदानुवादा । विवादसंवादा तूं मूळ ॥ २ ॥ तूं शब्दसृष्टीचा अर्कु । तूं वेदगुह्यप्रकाशकु । तूंचि एकला अनेकु । व्याप्य व्यापकु तूंचि तूं ॥ ३ ॥ तूंचि तूं विधि विधान । तूं बोलका तूंचि मौन । एका आणि जनार्दन । दोनी संपूर्ण तूं गुरुराया ॥ ४ ॥ यालागीं श्रीभागवता । तूंचि अर्थ तूं कविता । तूंचि अर्थावबोधकता । हेंही बोलविता तूंचि आम्हां ॥ ५ ॥ जैशीं आपुलींचि उत्तरें । पडसादें होतीं प्रत्युत्तरें । तेवीं माझेनि मुखांतरें । तूं कवित्वद्वारें बोलका ॥ ६ ॥ बोलका श्रीभागवतीं । श्रीकृष्ण कृपामूर्ती । तेणें वर्णाश्रम‍उत्पत्ति । यथास्थिती सांगितली ॥ ७ ॥ सप्तदशाध्यायीं सुगम । सांगितले ब्रह्मचर्य-धर्म । गृहस्थाचें स्वधर्मकर्म । नित्यनेम निरूपिले ॥ ८ ॥ आतां अष्टादशाध्यायीं जाण । वानप्रस्थाश्रमलक्षण । संन्यासधर्माचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९ ॥ श्रीभगवानुवाच- वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा । वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥ १ ॥ आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण । त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥ १० ॥ ’शतायुःपुरुष’-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती । सासष्टी क्रमिल्या‌अंतीं । वनाप्रती निघावें ॥ ११ ॥ निघावया वनाप्रती । भार्या दे‌ऊनि पुत्राचे हातीं । आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥ १२ ॥ भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती । भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥ १३ ॥ सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी । जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥ १४ ॥ जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ । तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥ १५ ॥ जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं । नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥ १६ ॥ कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत्‌ । वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥ २ ॥ वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें । तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥ १७ ॥ वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन । अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥ १८ ॥ वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण । त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ १९ ॥ केशरोमनखश्मश्रु मलानि बिभृयाद्दतः । न धावेदप्सु मज्जेत त्रिकालं स्थण्डिलेशयः ॥ ३ ॥ केश म्हणिजे मस्तकींचे । श्मश्रु बोलिजे मुखींचे । रोम ते कक्षोपस्थींचे । छेदन यांचें न करावें ॥ २० ॥ मस्तकीं न करावें वपन । न करावें श्मश्रुकर्म जाण । न करावें रोमनखच्छेदन । दंतधावन न करावें ॥ २१ ॥ स्नान मुसलवत्‌ केवळ । अवश्य करावें त्रिकाळ । प्रक्षाळावे ना शरीरमळ । व्रत प्रबळ वनस्था ॥ २२ ॥ केवळ भूमीवरी शयन । सदासर्वदा करावें जाण । तळीं घालावें ना तृण । मग आस्तरण तें कैंचें ॥ २३ ॥ यापरी वानप्रस्थें जाण । दृढ धरूनि व्रतधारण । करावें तपाचरण । तें तपलक्षण अवधारीं ॥ २४ ॥ ग्रीष्मे तप्येत पञ्चाग्नीन्‌ वर्षास्वासारषाड्वले । आकण्ठमग्नः शिशिर एवं वृतस्तपश्चरेत्‌ ॥ ४ ॥ उष्णकाळीं पंचाग्नीं । अग्निकुंडे चहूं कोणीं । पांचवा रवि माध्याह्नीं । ऐसा पंचाग्नी साधावा ॥ २५ ॥ माळा करोनि उच्च प्रदेशीं । धन वर्षतां धारावर्त्तेंसीं । तेथ व्हावें आकाशवासी । वर्षाकाळीं ऐसी तपप्राप्ती ॥ २६ ॥ आलिया हेमंत‌ऋतूसी । आकंठमग्न जळावासी । जळ वास करावा निशीं । हे वानप्रस्थासी तपक्रिया ॥ २७ ॥ हे तपक्रिया प्रतिवरूषीं । विहित वानप्रस्थासीं । वयसापरत्वें भक्षणासी । हृषीकेशी सांगत ॥ २८ ॥ अग्निपक्वं समश्नीयात्कालपक्वमथापि वा । उलूखलाश्मकुट्टो वा दन्तोलूखल एव वा ॥ ५ ॥ अगीस्तव पाका आलीं । कां काळें जीं परिपक्व झालीं । तीं तापसालागीं भलीं । आहारीं विहिलीं उदरार्थ ॥ २९ ॥ दांत असलिया बळी । फळें खावी तेणें सगळीं । कां गेलिया दांत समूळीं । कांडूनि उखळीं सुखे खावीं ॥ ३० ॥ जरी उखळ न मीळे वनीं । तरी खावीं दगडें ठेंचुनी । नाहीं चाड गोडपणीं । क्षुधानिवारणीं आहारार्थ ॥ ३१ ॥ स्वयं सञ्चिनुयात्सर्वमात्मनो वृत्तिकारणम्‌ । देशकालबलाभिज्ञो नाददीतान्यदाहतम्‌ ॥ ६ ॥ ऋतुकाळीं फळें संपूर्णें । तीं कालांतराकारणें । संग्रहो सर्वथा न करणें । व्रतधारणें वनस्था ॥ ३२ ॥ पूर्वदिवसीं फळें आणिलीं । अपरदिवसीं जरी उरलीं । ती अवश्य पाहिजे त्यागिलीं । नाहीं बोलिलीं आहारार्थ ॥ ३३ ॥ प्रत्यहीं आहारार्थ जाण । फळें आणावीं नूतन । जीर्ण फळांचें भक्षण । निषिद्ध जाण वानप्रस्था ॥ ३४ ॥ आणिकें फळें जीं आणिलीं । तीं अंगीकारा निषिद्ध झालीं । जीं स्वकष्टें अर्जिलीं । तींचि वहिलीं आहारार्थ ॥ ३५ ॥ देश काळ वर्तमान । इत्थंभूत कळलें ज्ञान । तरी संग्रह न करावा जाण अदृष्टधारण निर्धारें ॥ ३६ ॥ पराचा प्रतिग्रहो पूर्ण । सर्वथा न करावा आपण । प्रतिग्रह घेतां जाण । व्रतखंडन वानप्रस्था ॥ ३७ ॥ वन्यैश्चरुपुरोडाशैर्निर्वपेत्कालचोदितान्‌ । न तु श्रौतेन पशुना मां यजेत वनाश्रमी ॥ ७ ॥ जो वानप्रस्थ स्त्रीसमवेत । त्यासी अग्निहोत्र झालें प्राप्त । तेव्हां कर्म जें वेदोक्त । तें करावें समस्त वनवासीं ॥ ३८ ॥ वनीं जीं फळें ज्या ऋतूस । तोचि कल्पावा चरुपुरोडाश । तेणें यजावा मी यज्ञपुरुष । सावकाश मंत्रोक्त ॥ ३९ ॥ यापरी श्रौतकर्मविधान । यागार्थ पशुहनन । तें वानप्रस्थासी नाहीं जाण । वनफळीं यजन यागाचें ॥ ४० ॥ अग्निहोत्रं च दर्शश्च पूर्ण्मासश्च पूर्ववत्‌ । चातुर्मास्यानि च मुनेराम्नातानि च नैगमेः ॥ ८ ॥ पूर्वीं अग्निहोत्रकर्में जैसीं । गृहीं होतीं गृहस्थासी । तींचि चालवावीं वनवासीं । वेदाज्ञेसीं वनस्थें ॥ ४१ ॥ आम्नायें आगमनिगमांसी । जाणोनि करावें यागासी । दर्शपौर्णमासचातुर्मास्यांसी । निष्कामतेसी वेदाज्ञा ॥ ४२ ॥ ऐसा मुनीश्वर वनवासी । तपस्वी तेजोराशी । त्याचिये फळप्राप्तीसी । स्वयें हृषीकेशी सांगत ॥ ४३ ॥ एवं चीर्णेन तपसा मुनिर्धमनिसन्ततः । मां तपोमयमाराध्य ऋषिलोकादुपैति माम्‌ ॥ ९ ॥ ऐसें वेदोक्त तप साचार । आस्तिक्यभावें अत्यादर । साक्षेपें करितां निरंतर । अस्थिमात्र देह उरे ॥ ४४ ॥ शुष्कशरीरपांजरा । त्वचेनें झांकिलिया शिरा । परी सामर्थें अति खरा । न सरे माघारा तपोनिष्ठें ॥ ४५ ॥ ऐसें यावज्जन्म करितां तप । तो सबाह्य झाला निष्पाप । लाहोनि ज्ञान सद्‌रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥ ४६ ॥ अवशेष वासना असतां । सूक्षरूप प्रतिबद्धकता । तपाभिमानें तत्त्वतां । देह‍अहंता अणुमात्र ॥ ४७ ॥ परी फळाशा पोटीं नाहीं । ऐसेनि निमाला जो देही । तो पावोनि ऋषिलोकाच्या ठायीं । तेथोनि पाहीं मज पावे ॥ ४८ ॥ जो ऋषिलोकातें पावला । तो क्रमें मुक्तीच्या मार्गा आला । तेथूनि क्रमेंचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥ ४९ ॥ यस्त्वेतत्‌ कृच्छ्रतश्चीर्णं तपो निःश्रेयसं महत्‌ । कामायाल्पीयसे युञ्ज्याद्‍बालिशः कोऽपरस्ततः ॥ १० ॥ एवं वानप्रस्थ अतिकष्टीं । तपादिसाधनसंकटीं । भोगफळाशेच्या तुटीं । मोक्षपरिपाटी पावले ॥ ५० ॥ जें हाता आलें मोक्षफळ । आविरिंच्यादि मंगळ । तें तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ॥ ५१ ॥ जेवीं कां चिंतामणीचियेसाठीं । मागे चातीलागीं खापरखुंटी । कां परीस देवोनि पालटीं । काळी गोमटी वीट मागे ॥ ५२ ॥ तेवीं मनुष्यपणाचिये स्थितीं । उत्तम जन्में तपःप्राप्ती । ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वांछिती ते मूर्ख ॥ ५३ ॥ त्या मूर्खांचें मूर्खपण । किती सांगावें गा गहन । मोक्षप्राप्तीचें साधन । कामलिप्सा जाण नाशिलें ॥ ५४ ॥ असो हें मूर्खाचें कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण । पूढील सांगेन संपूर्ण । शस्त्रार्थ जाण सुनिश्चित ॥ ५५ ॥ जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनीं अतिक्षीण । झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥ ५६ ॥ पन्नास वर्षें गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ । झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निजज्ञाना ॥ ५७ ॥ आयुष्याचे तीन भागवरी । वेंचलें गा ऐशापरी । आतां चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरीं जर्जर ॥ ५८ ॥ ऐसें शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य झाल्या जाण । करावें संन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥ ५९ ॥ वानप्रस्थाश्रमी झाल्याही । निःशेष वैराग्य अल्पही । सर्वथा नुपजे ज्याच्या ठायीं । त्याचा अधिकार पाहीं हरि बोले ॥ ६० ॥ यदासौ नियमेऽकल्पो जरया जातवेपथुः । आत्मन्यग्नीन्‌ समारोप्य मच्चित्तोऽग्निं समाविशेत्‌ ॥ ११ ॥ सर्वथा वैराग्य नुठी देहीं । जरा आदळली ठायींचे ठायीं । स्वधर्माचरणीं शक्ति नाहीं । कंप पाहीं सर्वांगीं ॥ ६१ ॥ ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी । मातें दृढ ध्या‌ऊनि मानसीं । अग्निप्रवेशीं रिघावें ॥ ६२ ॥ वानप्रस्थाश्रमीं वनस्थ । अतिशयें झाला जो विरक्त । त्याची उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सांगतसे ॥ ६३ ॥ यदा कर्मविपाकेषु लोकेषु निरयात्मसु । विरागो जायते सम्यङ्‌ न्यस्ताग्निः प्रव्रजेत्ततः ॥ १२ ॥ वानप्रस्थीं अनुष्ठान । तेणें वैराग्य अतिगहन । इंद्रचंद्रादिब्रह्मसदन । निरयासमान जो मानी ॥ ६४ ॥ ऐसा दृढ वैराग्य‍उठावा । तेणें विहिताग्नि बोळवावा । त्याग करूनि आघवा । अंगीकारावा संन्यास ॥ ६५ ॥ ते संन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यथापद्धती । स्वयें सांगताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥ ६६ ॥ इष्ट्वा यथोपदेशं मां दत्वा सर्वस्वमॄत्विजे । अग्नीन्स्वप्राण आवेश्य निरपेक्षः परिव्रजेत्‌ ॥ १३ ॥ अष्टश्राद्धादि विधान । प्राजापत्यनामिष्टिसाधन । मज भगवंतातें यजून । सर्वस्वदान ऋत्विजां ॥ ६७ ॥ मुख्यत्वें मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं संस्थापूनी । आशा निःशेष छेदूनी । संन्यास करूनी निरपेक्ष ॥ ६८ ॥ संन्यास करितेठायीं । विघ्नें अपार उठतीं पाहीं । तीं रगडूनियां पायीं । संन्यास तिंहीं करावा ॥ ६९ ॥ विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः । विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम्‌ ॥ १४ ॥ संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन । नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥ ७० ॥ विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण । सदा अर्पी बळिदान । देवा‌अधीन हा सर्वदा ॥ ७१ ॥ तो बळी नेदी येथूनि आतां । पाय दे‌ऊनि आमुचे माथां । घे‌ऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥ ७२ ॥ तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां । अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥ ७३ ॥ ऐसा वैराग्यें उद्‍भट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ । संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥ ७४ ॥ एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान । स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥ ७५ ॥ बिभृयाच्चेन्मुनिर्वासः कौपीनाच्छादनं परम्‌ । त्यक्तं न दण्डपात्राभ्यामन्यत्किञ्चिदनापदि ॥ १५ ॥ भूतां अभयदानपुरस्कर । संकल्पपूर्वक प्रेषोच्चार । तैं उरलें दिसे देहमात्र । सर्वस्य येर त्यागिलें ॥ ७६ ॥ जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि हो‍ऊनि ठेला आपैसा । उडाला देहबुद्धिचा वळसा । तुटला फांसा कर्माचा ॥ ७७ ॥ त्यासी विधिविधान कर्तव्यता । बोलोंचि नये गा सर्वथा । नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥ ७८ ॥ कापूर मिळालिया वन्हीं । तो परतेना कापूरपणीं । तेवीं वस्तु झाला जो गुरुश्रवणीं । तो विधिकिंकरपणीं वर्तेना ॥ ७९ ॥ परी गुरुवाक्यें तत्त्वतां । ज्यासी ऐसी हे अवस्था । सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारीं ॥ ८० ॥ गुरुवाक्याचें करितां मनन । नागवेपणीं लाजे मन । तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥ ८१ ॥ इतुकेन निर्वाह न सरे । ऐसें जाणवलें जैं पुरें । तैं वस्त्रखंड दुसरें । स्वाधिकारें धरावें ॥ ८२ ॥ दंड कमंडलु जंव आहे । तंव कौपीन बहिर्वास राहे । दंडत्यागासवें पाहें । त्याग होये वस्त्रांचा ॥ ८३ ॥ आपत्तिकाळीं संन्याशासी । रोग लागला होय ज्यासी । का जरेनें व्यापिलें देहासी । तैं जें लागेल त्यासी तें द्यावें ॥ ८४ ॥ गुरुवाक्यें श्रवण मनन । ऐसें साधी जो साधन । त्या साधकाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८५ ॥ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम्‌ । सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत ॥ १६ ॥ दृष्टि ठायीं ठेवूनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन । हंसगतीं करी गमन । अनुसंधान निजवृत्तीं ॥ ८६ ॥ जेथ जीवसंपदा दृष्टीं पडे । तैं प्राण गेल्या न चले पुढें । जीवांतें काढूनि कडे । पा‌ऊल पडे अतिशुद्ध ॥ ८७ ॥ आधींच पवित्र गंगाजळ । त्याचा निर्मळ वस्त्रें निरसोनि मळ । यापरी करोनियां निर्मळ । गंगाजळ सेविती ॥ ८८ ॥ ज्याचे वाचेचे आळां । असत्याच्या तृणशाळा । जाळूनि वैराग्यज्वाळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥ ८९ ॥ ज्या कल्पद्रुमाचीं वचनफळें । परिपक्वे आणि सोज्वळें । मधररसेंसीं रसाळें । अतिनिर्मळें घमघमितें ॥ ९० ॥ जें श्रवणीं अतिगोड । पुरवी श्रोतयांचें कोड । निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड हा वाचेचा ॥ ९१ ॥ सहजें संन्याशाचें ध्यान । अहमेव् नारायण्’ । तें दृढ् धरोनि अनुसंधान् । पवित्र् मन् करावें ॥ ९२ ॥ मन् करोनि पावन् । पृथ्वी विचरावी जाण् । त्या मनाचें पवित्रपण् । सर्वत्र् आपण् लक्षावें ॥ ९३ ॥ संन्याशाचे धर्मीं जाण् । मुख्यत्वें हेंचि लक्षण् । पवित्र् करोनि अंत्:करण् । सर्वत्र् नारायण् लक्षावा ॥ ९४ ॥ मनाचें पवित्रपण् । उद्धवा या नांव् जाण् । आतां त्रिदंडाचें लक्षण् । संन्यासनिरूपण् तें ऐक् ॥ ९५ ॥ मौनानीहानिलायामा दण्डा वाग्देहचेतसाम्‌ । न् ह्येते यस्य् सन्त्यङ्ग् वेणुभिर्न् भवेद्यतिः ॥ १७ ॥ मौन् अथवा सत्य् भाषण् । कां श्रीरामनामाचें स्मरण् । हो कां ओंकाराचें उच्चारण् । वाग्दंड्’ जाण् या नांव् ॥ ९६ ॥ शरीरींचे जितुकें चळण् । तें प्राणाचेनि बळें जाण् । त्या प्राणाचें प्राणरोधन् । करावें आपण् प्राणायामें ॥ ९७ ॥ प्राणायामें निजप्राण् । जिणोनि करावा स्वाधीन् । या नांव् देहदंड्’ जाण् । ऐक् लक्षण् मनोदंडाचें’ ॥ ९८ ॥ मनाचें चपळपण् । संकल्प् विकल्प् जाण् । त्याचें करावया छेदन् । ब्रह्मानुसंधान् करावें ॥ ९९ ॥ माझें स्वरूप् सर्वगत् । तेथ् निश्चयें ठेवितां चित्त् । मन् संकल्पविकल्पें जाय् जेथ् । तेथ् तेथ् स्वरूप् ॥ १०० ॥ ऐसें सावध् राखतां मन् । दृढ् लागल्या अनुसंधान् । तंव् संकल्पविकल्प् क्षीण् । सहजचि जाण् स्वयें होती ॥ १ ॥ देह् वाचा आणि मन् । या त्रिदंडांचें लक्षण् । तुज् म्यां सांगितले संपूर्ण् । संन्यासत्व् जाण् येणें सत्य् ॥ २ ॥ हे तिन्ही दंड् नसतां जाण् । केवळ् वेणुदंडग्रहण् । तेणें संन्यासत्व् न् घडे जाण् । देहविटंबन् दंभार्थ् ॥ ३ ॥ सन्याशाचा आहार् विहार् । आचार् संचार् विचार् । स्वधर्मयुक्त् साचार् । स्वयें सारंगधर् सांगतु ॥ ४ ॥ भिक्षां चतुर्षु वर्णेषु विगर्ह्यान्वर्जयंश्चरेत्‌ । सप्तागारानसंक्लृप्तांस्तुष्येल्लब्धेन् तावता ॥ १८ ॥ पूर्वी जाण् संन्याशासी । चतुर्वर्णीं भिक्षा होती त्यासी । कलियुगीं गोष्टी झाली कैसी । ब्राह्मणापाशीं चतुर्वर्ण् ॥ ५ ॥ ज्याची जीविका जेणें जाण् । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण् । ऐका तेंही प्रकरण् । जीविकालक्षण् सांगेन् ॥ ६ ॥ मुख्य् ब्राह्मणाची वृत्ती’ जाण् । शिल्’ उंछ्’ का कोरान्न्’ । अयाचित् का अध्यापन् । अथवा याजन् जीविकेसी ॥ ७ ॥ जो जीविकेलागीं निर्धारीं । शस्त्र् घे‌ऊनियां करीं । शूरवृत्तीं जीविका करी । तो जाणावा क्षत्री’ ब्राह्मणांमाजीं ॥ ८ ॥ जो वाणिज्यवृतीवरी । नित्य् जीविका आपुली करी । तो ब्राह्मण् ब्राह्मणामाझारीं । वैश्य्’ निर्धारीं निश्चित् ॥ ९ ॥ जो शूद्राचे शूद्रक्रियेवरी । सदा सर्वदा जीविका करी । तो ब्राह्मण् शूद्रकर्मेंकरीं । शूद्रत्व्’ धरी क्रियायोगें ॥ ११० ॥ जैं उत्तम् ब्राह्मणाची भिक्षा न् लभे । तैं क्षत्रियब्राह्मणीं भिक्षा लाभे । क्षात्रब्राह्मणांचेनि अलाभें । वैश्यादि ब्राह्मणीं लाभे भिक्षाग्रहण् ॥ ११ ॥ ब्राह्मण्-क्षत्रिय्-वैश्यब्राह्मणीं । भिक्षेस् अप्राप्त् हे तिनी । तैं शूद्रजीविका-ब्राह्मणीं । भिक्षाग्रहणीं अधिकारु ॥ १२ ॥ यांत् निंद्य् जे ब्राह्मणा‌आंतु । केवळ् दोषी अथवा अभिशप्तु । ते भिक्षेसी न् लावावा हातु । हा स्वधर्मार्थु भिक्षेचा ॥ १३ ॥ तेही भिक्षा अतिनेमस्त् । भिक्षेसी येतों हें कळों नेदित् । मागावीं नेमिलीं घरें सात् । जें झालें प्राप्त् तेणें सुखी ॥ १४ ॥ जे सातां घरीं भिक्षा प्राप्त् । ते भिक्षेचा धर्म् विहित् । स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ् । स्मृतिशास्त्रार्थप्रयोगें ॥ १५ ॥ बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य् वाग्यतः । विभज्य् पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम्‌ ॥ १९ ॥ ग्रामाबाहेर् गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं । भिक्षा धरोनियां करीं । आचमन् तीरीं करावें ॥ १६ ॥ याचित् जें भिक्षेचें अन्न् । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून् । तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण् । होय् पावन् पवित्र् ॥ १७ ॥ चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार् अधिकारी त्या भागतें । ब्रह्मा विष्णु अर्क् आणि भूतें । अर्पण् तेथें अवधारीं ॥ १८ ॥ विष्णुकल्पित् जो भाग् । तो जळीं घालावा साङ्ग् । भूतकल्पित् जो विभाग् । तो पृथ्वीवरी चांग् ठेवावा ॥ १९ ॥ उरले जे विभाग् दोनी । यतीसी अधिकार् सेवनीं । दीन् मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न् द्यावें ॥ १२० ॥ परी मी एक् अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता । आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥ २१ ॥ मधुकरीचें अवघेंचि अन्न् । समयीं मागों येती दीन् । येणें उद्देशें अधिक् अन्न् । सर्वथा जाण् मागों नये ॥ २२ ॥ करितां मधुकरीभोजन् । ठायीं अधिक् उरलिया अन्न् । तें सांडितां अतिपतन् । अवघेंच् जाण् भक्षावें ॥ २३ ॥ संन्यासधर्मीं लघु आहार् । नित्य् करावा निरंतर् । अधिक् आहारीं विकार् । निद्रा आळस् फार् बाधिती ॥ २४ ॥ ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम् । तो संन्याशाचा मुख्य् धर्म् । स्वयें सांगे पुरुषोत्तम् । जेणें आत्माराम् पाविजे ॥ २५ ॥ एकश्चरेन्महीमेतां निःसङ्गः संयतेन्द्रियः । आत्मक्रीड् आत्मरत् आत्मवान्‌ समदर्शनः ॥ २० ॥ सदा वैराग्य् अंगीं पुरतें । जो अपेक्षीना सांगात्यातें । निःसंग् होत्साता चित्तें । सुखें पृथ्वीतें विचरतु ॥ २६ ॥ इंद्रियें बांधोनि चित्ताच्या पायीं । चित्त् लावी चैतन्याच्या ठायीं । तेणें चिन्मात्र् ठसावें पाहीं । देहत्व् देहीं स्मरेना ॥ २७ ॥ ऐसा आत्मस्थितीचा उद्यम् । तेणें आत्मक्रीडेचा आराम् । आत्मसुखाचा संभ्रम् । अनुभव् परम् तो ऐक् ॥ २८ ॥ आत्मस्थिति निजात्मयुक्त् । तेणें आत्मसुखें उल्हासत् । सदा समदर्शनें डुल्लत् । वोसंडत् समसाम्यें ॥ २९ ॥ ऐशिया समसुखाची संपत्ती । भोगावया सुनिश्चितीं । सदा एकाकी वसे एकांतीं । तेंचि श्रीपती सांगत् ॥ १३० ॥ विविक्तक्षेमशरणो मद्‍भावविमलाशयः । आत्मानं चिन्तयेदेकमभेदेन् मया मुनिः ॥ २१ ॥ पवित्र् आणि विजन् । प्रशस्त् आणि एकांतस्थान् । तेणें माझें अनुसंधान् । सद्‍भावें जाण् सर्वदा ॥ ३१ ॥ तेथें सांडून् जनपद् दुश्चित् । सदा एकांतीं व्हावें निरत् । मद्‍भावें सुनिश्चित् । आत्मसुख् प्राप्त् साधकां ॥ ३२ ॥ ज्यासी निजात्मसुख् झालें प्राप्त् । तो होय् अनन्यशरणागत् । मीवांचूनि जगा‌आंत् । आणीक् अर्थ् देखे न् ॥ ३३ ॥ ऐसे अनन्य् करितां माझें ध्यान् । साधक् विसरे मीतूंपण् । तेव्हां अभेदें चैतन्यघन् । मद्‌रूप् जाण् तो होय् ॥ ३४ ॥ त्या मद्‌रूपाचे स्वरूपस्थिती । पाहों जातां निजात्मवृत्ती । मी ना तो ऐशी होय् गती । अभेदप्राप्ती’ या नांव् ॥ ३५ ॥ जंव् असे द्वैतवार्ता । तंव् भयाची बाधकता । अभेदत्व् आल्या हाता । निर्भयता साधकां ॥ ३६ ॥ अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षांची वार्ता नाही । गडगर्जे बंधमोक्ष् पाहीं । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥ अन्वीक्षेतात्मनो बन्धं मोक्षं च् ज्ञाननिष्ठया । बन्ध् इन्द्रियविक्षेपो मोक्ष् एषां च् संयमः ॥ २२ ॥ ऐक्यें पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष् पाहतां । दोंहीची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित् ॥ ३८ ॥ प्रवृत्तीमाजीं बंधमोक्षता । त्या दोंहीची विभागता । इंद्रियांची जे विषयासक्तता । दृढबद्धता’ ती नांव् ॥ ३९ ॥ काया-वाचा-चित्तवृत्तीं । निःशेष् विषयांची विरक्ती । या नांव् साचार् मुक्ति’ । जाण् निश्चितीं उद्धवा ॥ १४० ॥ ज्यासी साचार् पाहिजे मुक्ती । तेणें करावी विषयनिवृत्ती । हेचि मुख्यत्वें उपायस्थिती । कृष्ण् कृपामूर्ती सांगत् ॥ ४१ ॥ तस्मान्नियम्य् षड्वर्गं मद्‍भावेन् चरेन्मुनिः । विरक्तः क्षुल्लकामेभ्यो लब्ध्वाऽऽत्मनि सुखं महत्‌ ॥ २३ ॥ येणें विचारें विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता । त्या विषयांचा त्याग् करितां । निजमुक्तता सहजेंचि ॥ ४२ ॥ तेचि विषयांची विरक्ती केवीं । आतुडे आपुल्या हातीं । यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधकें निश्चितीं साधावी ॥ ४३ ॥ अंतरीं वासना दृढमूळ् । विषयशाखा तेणें सबळ् । ते वासना छेदावया समूळ् । वैराग्य् सबळ् साधावें ॥ ४४ ॥ वैराग्यप्राप्तीचें कारण् । स्वधर्मकर्म् मदर्पण् । सांडावें कर्माचें कर्तेपण् मदर्पण्’ या नांव् ॥ ४५ ॥ मदर्पणें कर्मस्थिती । तेणें माझ्या ठायीं उपजें प्रीती । माझें नाम् माझी कीर्ती । चिंतन् चित्तीं पैं माझें ॥ ४६ ॥ ऐशिया माझ्या परम् प्रीतीं । होय् वैराग्याची उत्पत्ती । तेणें विषयांची विरक्ती । माझी सुखप्राप्ती शनैःशनैः ॥ ४७ ॥ माझेनि सुखें माझें भजन् । अत्यंत् थोरावे पैं जाण् । तेव्हा सर्वत्र् मद्‍भावन् । ब्रह्मत्वें पूर्ण् ठसावे ॥ ४८ ॥ सर्वत्र् ब्रह्मभावन् । ब्रह्मसुखाचें अनुसंधान् । धरूनि करावें पर्यटण् । जंव् निर्वासन् मन् होय् ॥ ४९ ॥ पुत्रग्रामव्रजान्‌ सार्थान्‌ भिक्षार्थं प्रविशंश्चरेत्‌ । पुण्यदेशसरिच्छैलवनाश्रमवतीं महीम्‌ ॥ २४ ॥ पृथ्वी विचरणें विचित्र । पुण्यदेश कुरुक्षेत्र । सप्त पुर्‍या परम पवित्र । पुष्करादि थोर महातीर्थें ॥ १५० ॥ कृतमाला पयस्विनी । पुण्यरूप ताम्रपर्णी । गौतमी रेवा त्रिवेणी । परमपावनी गोमती ॥ ५१ ॥ कृष्णा वेण्या तुंगभद्रा । तपती पयोष्णी भिंवरा । यमुना भागीरथी नीरा । गंगा सागरासंगमीं ॥ ५२ ॥ ऋष्यमूक श्रीशैल व्यंकटाद्री । मूळपीठींचा सह्याद्री । गौतमीतीरींचा ब्रह्मगिरी । जो पापें संहारी यात्रामात्रें ॥ ५३ ॥ हो कां चढता हिमगिरी । पदीं दुरितांतें दूर करी । निःशेष पापांतें निवारी । ते यात्रा मुनीश्वरीं अवश्य कीजे ॥ ५४ ॥ दंडकारण्य बृहद्वन । नैमिषारण्य आनंदवन । इत्यादि वनांचें गमन । संन्याशीं जाण करावें ॥ ५५ ॥ च्यवनकपिलव्यासाश्रम । गौतमवामन‍आश्रमोत्तम । यात्रा श्रेष्ठ बदरिकाश्रम । जो सकळ कर्मदाहकु ॥ ५६ ॥ ऐशीं स्थळें जीं पावन । तेथें संन्याशियें करावें गमन । मार्गीं भिक्षार्थ जें अटन । तेंही निरूपण अवधारीं ॥ ५७ ॥ हाट हाटवटिया अति उत्तम । त्यातेंपुर्’ म्हणती नरोत्तम् । हाटहाटवटियाहीन् तोग्राम्’ । भिक्षेचा नेम् सारवा तेथें ॥ ५८ ॥ गायीगौळियांचें निवासस्थान् ।व्रत्’ त्यातें म्हणती जाण् । सार्थ्’ म्हणिजे पव्हा संपूर्ण् । भिक्षार्थ् अटन् करावें तेथें ॥ ५९ ॥ पवित्र् भिक्षेचे प्राप्तीकारणें । संन्यासीं अवश्य् जाणें । तेचि अर्थींचें निरूपणें । स्वयें श्रीकृष्ण् सांगिजे ॥ १६० ॥ वानप्रस्थाश्रमपदेष्वभीक्षणं भैक्ष्यमाचरेत्‌ । संसिद्धयत्याश्वसंमोहः शुद्धसत्त्वः शिलान्धसा ॥ २५ ॥ शुद्ध् व्हावया अंतर् । वानप्रस्थाश्रमी जो नर् । जा‌ऊनि ठाकावें त्याचें द्वार् । अतिसादर् भिक्षार्थ् ॥ ६१ ॥ सेवितां सात्त्विकाचे अन्नासी । शुद्धसत्त्वता साधकासी । तत्काळ् होय् ग्रासोग्रासीं । शुद्ध् अन्नासी हा महिमा ॥ ६२ ॥ यालागीं वानप्रस्थाचें द्वार् । ठाकोनिजावें वारंवार् । तेणें सत्त्वशुद्धि अनिवार् । होय् साचार् साधकां ॥ ६३ ॥ शुद्ध् भिक्षेचिये प्राप्ती । सत्त्वशुद्ध् होय् वृत्ती । तेणें वासना निःशेष् नासती । निजशांती उल्हासे ॥ ६४ ॥ वासना नासल्या निलाग् । तो सत्यत्वें न् देखे जग् । विषयासक्ति कैंची मग् । सहज् विराग् उद्‍भट् ॥ ६५ ॥ नैतद्वस्तुतया पश्येद्‌ दृश्यमानं विनश्यति । असक्तचित्तो विरमेदीहामुत्र् चिकीर्षितात्‌ ॥ २६ ॥ येथ् जें जें दिसे नासे । हें सर्वांसी प्रत्यक्ष् आभासे । परी अज्ञानें भुलले कैसे । विषयविलासें गुंतोनी ॥ ६६ ॥ यालागीं शुद्ध् भिक्षेचिये प्राप्ती । ज्याची शुद्धसत्व् झाली वृत्ती । त्यासी विषय् सत्यत्वें न् दिसती । मा विषयासक्ती तेथें कैंची ॥ ६७ ॥ ऐसें मिथ्या विषयांचें भान् । त्याचें विषयासक्त् नव्हे मन् । यालागीं भवस्वर्गसाधन् । दोन्ही तो जाण् स्पर्शेना ॥ ६८ ॥ ऐसा जो विषयविरक्त् । त्याचें परमार्थीं लागे चित्त् । तो जगीं विचरे अनासक्त् । परमार्थयुक्त् निजबोधें ॥ ६९ ॥ त्याच्या निजबोधाचें लक्षण् । स्वयें सांगताहे नारायण् । प्रपंचाचें मिथ्यापण् । समाधान् निजात्मता ॥ १७० ॥ यदेतदात्मनि जगन्मनोवाक्क्ष्‍प्राणसंहतम्‌ । सर्वं मायेति तर्केण् स्वस्थस्त्यक्त्वा न् तत्स्मरेत् ॥ २७ ॥ मनसा-वाचा-प्राणप्रवाहीं । अहंकारकृत् उभयदेहीं । जग् आत्म्याच्या ठायीं । मिथ्या मायिक् पाहीं आभासे ॥ ७१ ॥ दोरा‌अंगीं सर्पाभास् । शुक्तिकेमाजीं रजतप्रकाश् । उखरीं मृगजळाचा विलास् । तैसा जगदाभास् चिन्मात्रीं ॥ ७२ ॥ जैसा स्वप्नींचा व्यवहार् । तैसें भासे चराचर् । ऐसें मिथ्या जाणोनि साचार् । पुढती स्मरणादर् स्फुरेना ॥ ७३ ॥ जो जागा झाला इत्थंभूत् । तैं स्वप्नभोग् न् वांछी चित्त् । तेवीं स्वरूपीं जो सुनिश्चित् । तो प्रपंचजात् स्मरेना ॥ ७४ ॥ त्रिदंडी बहूदकाचें कर्म् । तुज् म्यां सांगितलें सुगम् । आता हंस् परमहंसांचे धर्म् । यथानुक्रम् अवधारीं ॥ ७५ ॥ संन्यास् चतुर्विध् देख् । हंस्’ परमहंस्’ एक् । एक् तो बहूदक्’ । कुटीचक्’ तयासी बोलिजे ॥ ७७ ॥ वार्धकीं कुटीचकाची परी । अग्निहोत्र्-स्त्रियेचा त्याग् करी । परी शिखासूत्र् न् अव्हेरी । गायत्रीमंत्रीं अधिकारु ॥ ७८ ॥ नित्य् भिक्षा पुत्राचे घरीं । पर्णकुटी बांधे त्याचे द्वारीं । मठिका सांडोनि न् वचे दूरी । कुटीचक्’ निर्धारीं या नांव् ॥ ७९ ॥ शिखासूत्र् त्यागोनि जाण् । करूनि त्रिदंडांचें ग्रहण् । केवळ् करी कर्माचरण् । ज्ञानाचें लक्षण् जाणेना ॥ १८० ॥ नाहीं वैराग्य् वरिष्ठ् । न् दिसे ज्ञाननिष्ठा श्रेष्ठ् । अतिशयेंसीं जो कर्मिष्ठ् बहूदक्’ ज्येष्ठ् त्यासी म्हणती ॥ ८१ ॥ जो कां वैराग्याच्या निर्धारीं । ज्ञानसाधनार्थ् विचारी । शिखासूत्रकर्मत्याग् करी । आत्मचिंतनावरी निजनिष्ठा ॥ ८२ ॥ ऐसा जो त्यागविलास् । या नांव्विविदिषा’ संन्यास् । ऐशिया निष्ठें वर्ते तोहंस्’ । एक्परमहंस्’ हा म्हणती ॥ ८३ ॥ ऐक् परमहंसाचें लक्षण् । ज्ञानपरिपाकें परिपूर्ण् । अत‌एव् शांति वोळंगे आंगण् । देखे तिन्ही गुण् मिथ्यात्वें ॥ ८४ ॥ मिथ्या जाणे कर्माची वार्ता । आपुली देखे नित्य् निष्कर्मता । कर्मक्रिया जो कर्तव्यता । ते प्रकृतीचे माथां प्रारब्धें ॥ ८५ ॥ ऐशिया स्थितीं सावकाश् । त्या नांव् जाण् परमहंस्’ । नाहीं मठ् मठिका विलास् । नित्य् उदास् निराश्रयी ॥ ८६ ॥ आतां हंस्-परमहंसांचे धर्म् । स्वयें सांगताहे पुरुषोत्तम् । त्या धर्माचें विशद् वर्म् । ऐक् सुगम् उद्धवा ॥ ८७ ॥ ज्ञाननिष्ठो विरक्तो व् मद्‍भक्तो वाऽनपेक्षकः । सलिङ्गानाश्रमांस्त्यक्त्वा चरेदविधिगोचरः ॥ २८ ॥ विषयांची नावडे मातु । ज्ञानप्राप्तीलागीं उद्यतु । यापरी जो अतिविरक्तु । तो संन्यास् बोलिजेतु मुख्यत्वें ॥ ८८ ॥ जो ज्ञाननिष्ठा अतिसंपन्न् । सदा स्वरूपीं रंगलें मन् । कदा न् मोडे अनुसंधान् । परमहंसासमान् हा हंस् ॥ ८९ ॥ ज्यासी करितां भगवद्‍भक्ती । अपेक्षामात्राची झाली शांती । मोक्षापेक्षा नुपजे चित्तीं । हे संन्यासपद्धती अतिश्रेष्ठ् ॥ १९० ॥ ज्ञाननिष्ठ् कां मद्‍भक्त् । इहीं आश्रमधर्म् दंडादियुक्त् । त्याग् करावा हृदयीं समस्त् । बाह्य् लोकरक्षणार्थं राखावे ॥ ९१ ॥ येचि अर्थींचें निरूपण् । पुढें सांगेल् श्रीकृष्ण् । प्रस्तुत् त्यागाचें लक्षण् । ऐक् संपूर्ण् हरि बोले ॥ ९२ ॥ आश्रमधर्म् समस्त् करी । परी विधिकिंकरत्व् तो न् धरी । प्रतिबिंब् कांपतां जळांतरी । आपण् बाहेरी कांपेना ॥ ९३ ॥ तेवीं स्वधर्मकर्म् कर्तव्यता । करी परी नाहीं कर्मठता । आपुली कर्मातीतता । जाणे तत्त्वतां निजकर्मी ॥ ९४ ॥ यापरी स्वधर्मकर्म् करी । परी विधीचें भय् तो न् धरी । विधिनिषेध् घालून् तोडरीं । कर्मे करी अहेतुक् ॥ ९५ ॥ जो नातळे स्वाश्रमकर्मगती । दंडादि लिंग् न् धरी हातीं । ऐसिया सर्वत्यागाची स्थिती । पुढें श्रीपती सांगेल् ॥ ९६ ॥ प्रस्तुत् हेंचि निरूपण् । लोकरक्षणार्थ् लिंगधारण् । अंतरीं जो निष्कर्म् जाण् । त्याचे लक्षण् हरी बोले ॥ ९७ ॥ बुधो बालकवत्‌ क्रीडेत्‌ कुशलो जडवच्यरेत्‌ । वदेदुन्मत्तवद्विद्वान्‌ गोचर्यां नैगमश्चरेत्‌ ॥ २९ ॥ विवेकज्ञान् शुद्ध् आहे । परी बाळकाच्या परी पाहे । मानापमान् सुखें साहे । सांडोनि सोये देहाभिमानाची ॥ ९८ ॥ निजनैष्कर्में अतिकुशल् । परी कर्मजडा‌ऐसा केवळ् । कर्में आचरे तो सकळ् । कोठेंही विकळ् दिसों नेदी ॥ ९९ ॥ जाणे धर्माधर्मलक्षण् । सर्वार्थीं अतिसज्ञान् । परी न् करी प्रश्नसमाधान् । अप्रमाणिक् जाण् स्वयें बोले ॥ २०० ॥ करितां प्रश्नसमाधान् । लौकिकीं वाढेल् सन्मान् । यालागीं साक्षेपें जाण् । उन्मत्त् वचन् स्वयें बोले ॥ १ ॥ वेदतत्त्वार्थ् विहित् जाणे । तें लौकिकीं नाहीं मिरवणें । सकळिकीं मूर्खाचि म्हणणें । तैशीं पशु’ लक्षणें स्वयें दावी ॥ २ ॥ यालागीं वेदवादसंवाद् । न् करी वाद् अतिवाद् । येचि अर्थीं अतिविशद् । स्वयें गोविंद् सांगत् ॥ ३ ॥ वेदवादरतो न् स्यान्न् पाषण्डी न् हैतुकः । शुष्कवादविवादे न् कञ्चित्पक्षं समाश्रयेत्‌ ॥ ३० ॥ धरोनियां मीमांसकमत् । कर्मकांडींचे शास्त्रार्थ् । नानावाद् कर्मार्थ् । न् करी निश्चित् निजबोधें ॥ ४ ॥ तार्किकाचे अतितर्क् । तर्क् वितर्क् कुतर्क् । हेही वाद् करीना देख् । निजात्मसूख् जो जाणे ॥ ५ ॥ बाहेरी ब्रह्मज्ञानें गर्जे तोंड् । भीतरीं विषयवासना उदंड् । ऐसे महावादी प्रचंड् । अतर्क् पाखंड्’ त्या नाव् ॥ ६ ॥ नसोनि ब्रह्मानुभव् साचार् । जो उच्छेदी निजाचार् । तो केवळ् पाखंडी नर् । उदरंभर् दुःशील् ॥ ७ ॥ ऐशिया वादाचा विटाळ् । ज्याचे वाचेसी नाहीं अळुमाळ् । न् लगे असत्याचा समूळ् मळ् । नित्य् निर्मळ् निजबोधें ॥ ८ ॥ शुष्कवाद्’ ज्या वृथा गोष्टी । त्यांतही वाग्वाद् उठी । होय् नव्हे कपाळपिटी । मिथ्या चावटी करीना ॥ ९ ॥ ऐशिया विवादाची कथा । दृष्टीं न् पाहे निजज्ञाता । मा स्वयें करील् ऐशा वार्ता । हें सर्वथा घडेना ॥ २१० ॥ होतां शास्त्रार्थमहावाद् । देतां युक्तीचे प्रतिबाध् । तेथ् न् करी पक्षपात् शुद्ध् । जाणे परी शब्द् बोलेना ॥ ११ ॥ श्रुतिस्मृतींसीं विरूद्ध् । होतां देखे अतिवाद् । स्वयें जाणे शास्त्रार्थ् शुद्ध् । परी पक्षपात् करीना ॥ १२ ॥ वाग्वादीं बोलतां जाण् । दुखवेल् पुढिलांचें मन् । कां क्षोभेल् स्वांतःकरण् । यालागीं वचन् बोलेना ॥ १३ ॥ नोद्विजेत् जनाद्धीरो जनं चोद्वेजयेन्न् तु । अतिवादांस्तितिक्षेत् नाममन्येत् कञ्चन् ॥ ३१ ॥ जनापासोनि उद्वेगगती । ज्ञाता न् पवे सर्वथा चित्तीं । निंदा अवगणना अपमानिती । ते आत्मस्थितीं स्वयें साहे ॥ १४ ॥ जन् जे जे उपद्रव् देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं । मीचि आत्मा एक् सर्व् भूतीं । यालागीं खंती मानीना ॥ १५ ॥ आपुलिया अवयवविकारता । उद्वेग् नुपजें जेवीं चित्ता । तेवीं सर्वांभूतीं एकात्मता । जाणून् तत्त्वतां उबगु न् मनी ॥ १६ ॥ तैसेंचि ज्याचिया स्थितीं । भूतें उद्वेग् न् मानिती । ज्याचिया निजाचारगतीं । सुखी होती जीवमात्र् ॥ १७ ॥ सर्व् भूतीं भगवंत् आहे । झणें त्यासी उपद्रव् होये । यालागीं वागवितां हातपाये । सावध् राहे निजदृष्टीं ॥ १८ ॥ थोर् देतां आरोळी । झणें दचकेल् वनमाळी । कां नेटें भवंडितां जपमाळी । देवाचे कपाळीं झणें लागे ॥ १९ ॥ यालागीं करचरणांच्या चेष्टा । आवरोनियां निजात्मनिष्ठा । भूतीं लागों नेदी झटा । झणें वैकुंठा उपद्रव् लागे ॥ २२० ॥ ऐसि‌ऐशिया निजात्मगती । उद्वेग् उपजों नेदी भूतीं । तेथ् वाग्वादाची गती । कैशा रीतीं संभवे ॥ २१ ॥ सर्वभूतीं भूतात्म् ईश्वर् । यालागीं उंच् न् बोले उत्तर् । तेथ् अतिवाद्यासी समोर् । सर्वथा अधर् उचलीना ॥ २२ ॥ पडल्या जीवसंकट् प्राणांतीं । अपमान् न् करावे कोणे व्यक्ती । अपमानीना भूताकृती । सर्वांभूतीं हरी देखे ॥ २३ ॥ जनास्तव उद्वेगता । कदाकाळीं न पवे ज्ञाता । ज्ञात्यापासोनि उद्वेगता । नव्हे सर्वथा जनासी ॥ २४ ॥ ऐशी निजात्मस्थिती साचार । तो कोणासीं न करी वैर । येचि अर्थीं शारंगधर । विशद उत्तर सांगत ॥ २५ ॥ देहमुद्दिश्य पशुवद्‌ वैरं कुर्यात्र केनाचित्‌ । एक एवपरो ह्यात्मा भूतेष्वात्मन्यवस्थितः ॥ ३२ ॥ केवळ पशूचियापरी । हो‍ऊनियां देह‍अहंकारी । कोणासी वैर न करी । तेही परी परीयेंसी ॥ २६ ॥ प्रकृति-पर चिदात्मा आहे । तोचि सर्वांभूतीं भूतात्मा पाहे । मजमाजींही तोचि राहे । ऐशी सर्व भूतीं एकात्मता जो ॥ २७ ॥ त्यासी कोण आप्त कोण इतर । कोणासी करावें वैर । सर्व भूतीं मीचि साचार । निरंतर निजात्मा ॥ २८ ॥ एक आत्मा सर्व भूतांत । येचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । श्रोता सावचित्त उद्धव ॥ २९ ॥ यथेन्दुरुदपात्रेषु भूतान्येकात्मकानि च । अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित्‌ । लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम्‌ ॥ ३३ ॥ सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ । तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥ २३० ॥ देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न । जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥ ३१ ॥ जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं । परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥ ३२ ॥ का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत । तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥ ३३ ॥ एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार । ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा आहार्’ तूं ऐक् ॥ ३४ ॥ आहार् न् मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं । अन्नालागीं न् तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ् ॥ ३५ ॥ आहार् मिळाल्या उत्तम् । हरिखेजेना मनोधर्म् । दैवाधीन् जाणे वर्म् । निजकर्मप्राप्तीसी ॥ ३६ ॥ एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन् तत्त्वता । यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥ ३७ ॥ दैवाधीन् प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य् कळलें ज्यासी । तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत् ॥ ३८ ॥ आहारार्थं समीहेत् युक्तं तत्प्राणधारणम्‌ । तत्त्वं विमृश्यते तेन् तद्विजाय् विमुच्यते ॥ ३४ ॥ पाळावया आश्रमधर्मासी । अवश्य् हिंडावें भिक्षेसी । मधुकरी संन्याशांसी । स्वधर्मासी अतिविहित् ॥ ३९ ॥ साधकां तरी आहारार्थ् । अवश्य् हिंडावें लागे येथ् । आहारेंवीण् त्यांचें चित्त् । विक्षेपभूत् हों पाहे ॥ २४० ॥ तिंहीं रसासक्ति सांडून् । भिक्षेसी करावा प्रयत्न् । आहारेंवीण् त्यांचें मन् । अतिक्षीण् सर्वार्थीं ॥ ४१ ॥ साधकांसी आहारेंवीण् । न् संभवे श्रवण् मनन् । न् करवे ध्यान् चिंतन् । अनुसंधान् राहेना ॥ ४२ ॥ संन्याशांसी ध्यान् न् घडे । तैं आश्रमधर्माचें तारूं बुडे । यालागीं भिक्षेसी रोकडें । हिंडणें घडे हितार्थ् ॥ ४३ ॥ मिळावें मिष्टान्न् गोड् । हे सांडूनि रसनाचाड् । करावें भिक्षेचें कोड् । परमार्थ् दृढ् साधावया ॥ ४४ ॥ आहार् घेतलिया जाण् । साधकांसी घडे साधन् । साधन् करितां प्रकटे ज्ञान् । ज्ञानास्तव् जाण् निजमोक्ष् लाभे ॥ ४५ ॥ सर्वथा न् वांछावें मिष्टान्न् । तरी भिक्षा मागावी कोण् । ऐसें कांहीं कल्पील् मन् । तेंचि श्रीकृष्ण् सांगत् ॥ ४६ ॥ यदृच्छयोपपन्नान्नमद्याच्छ्रेष्ठमुताऽपरम्‌ । तथा वासस्तथा शय्यां प्राप्तं प्राप्तं भजेन्मुनिः ॥ ३५ ॥ सहज् भिक्षेसी आलें जाण् । शुष्क् अथवा मिष्टान्न् । तेणें करावें प्राणधारण् । रसनालालन् सांडोनि ॥ ४७ ॥ निद्रालस्याचें न् ये प्रस्थान् । तैसें करावें प्राणधारण् । दृढ् ठसावें आसनध्यान् । युक्ताहार्’ जाण् या नांव् ॥ ४८ ॥ वल्कल् अथवा अजिन् । नवें अथवा वस्त्र् जीर्ण् । सहजें प्राप्त् झाल्या जाण् । करी प्रावरण् यथासुखें ॥ ४९ ॥ कंथा हो कां मृदु आस्तरण् । तृणशय्या कां भूमिशयन् । स्वभावें प्राप्त् झाल्या जाण् । तेथही शयन् करी मुनि ॥ २५० ॥ मी एक् भोक्ता शयनकर्ता । हेही नाहीं त्यासी अहंता । स्नानादि कर्मीं वर्ततां । त्याची निरभिमानता हरि सांगे ॥ ५१ ॥ शौचमाचमनं स्नानं न् तु चोदनया चरेत्‌ । अन्यांश्च् नियमान्‌ ज्ञानी यथाहं लीलयेश्वरः ॥ ३६ ॥ आचमन् स्नान् शौचाचार् । करितां नव्हे विधिकिंकर् । कर्माभिमानाची मोडली थार् । जैसा मी अवतार् तैसा तो ॥ ५२ ॥ जैसा मी लीलावतार्’ धरीं । अलिप्तपणें कर्में करीं । तैसीचि जाण् योग्याची परी । सर्व् कर्माचारीं अलिप्त् ॥ ५३ ॥ ज्यासी विधींचें भय् नाहीं पोटीं । तो कर्में करावया कदा नुठी । तेचि विखींची विशद् गोठी । कृष्ण् जगजेठी सांगता ॥ ५४ ॥ न् हि तस्य् विकल्पाख्या या च् मद्वीक्षया हता । आदेहान्तात्क्वचित्ख्यातिस्ततः संपद्यते मया ॥ ३७ ॥ कर्म् करणें न् करणें । ऐशिया संदेहाचें ठाणें । पळालें माझेनि दर्शनें । संकल्पाचें जिणें निमालें ॥ ५५ ॥ संकल्पु निमतांचि पोटीं । विराली लिंगदेहाची गांठी । भेदाची हारपली त्रिपुटी । मी परमात्मा दिठीं देखतां ॥ ५६ ॥ ज्यासी नाहीं भेदाचें भान् । त्याचे देहाचें भरण् पोषण् । स्नान्-भोजन्-शयन् । गमनागमन् केवीं घडे ॥ ५७ ॥ जो जिणोनियां विकल्पभ्रांती । त्रिशुद्धिं मिसळला अद्वैंतीं । त्याचे देहाची स्थितिगती । प्रारब्धाहातीं निश्चित् ॥ ५८ ॥ वृक्ष् समूळ् उपडलिया पाहें । परी सार्द्रता वृक्षीं राहे । तांबूल् खा‌ऊनियां जाये । तरी अधरीं राहे सुरंगात् ॥ ५९ ॥ हो कां कन्यादान् केल्या पाहें । वरु कन्याही घे‌उनि जाये । तरी उगा मान् उरला राहे । रुसणें न् जाये देहान्त् ॥ २६० ॥ तैसा अभिमानाचेनि सळें । मी कर्मकर्ता म्हणवीं बळें । ते अहंता निमे ज्ञानबळें । तरी शरीर् चळे प्रारब्धें ॥ ६१ ॥ कुलाल् दंड् भांडें घे‌ऊनि जाये । पूर्वभवंडीं चक्र् भंवत् राहे । तेवीं अभिमान् गेलिया पाहें । देह् वर्तताहे प्रारब्धें ॥ ६२ ॥ त्या देहाचें भरणपोषण् । प्रारब्धचि करितें जाण् । ज्ञात्यासी प्रपंचाचे भान् । सत्यत्वें जाण् असेना ॥ ६३ ॥ जैशी मिथ्या छाया देहापाशीं । तैसें देह् दिसे सज्ञानासी । यालागीं देहबुद्धि त्यासी । सत्यत्वेंसीं उपजेना ॥ ६४ ॥ छाया सुखासनामाजीं बैसे । कां विष्ठेवरी पडली दिसे । त्या छायेचे अभिमानवशें । सुखदुःख् नसे पुरुषासी ॥ ६५ ॥ तेवीं देहाची ख्यातिविपत्ती । बाधीना सज्ञानाचे स्थितीं । प्रारब्धक्षयाचे अंतीं । विदेह् पावती कैवल्य् ॥ ६६ ॥ जैशी जळाची लहरी । निश्चळ् होय् सागरीं । तैसा ज्ञाता मजमाझारीं । विदेह् करी समरसें ॥ ६७ ॥ उगम् संगम् प्रवाहगती । सरितांची नामरूपख्याती । जेवीं प्रळयोदकीं हारपती । तेवीं समरसती मजमाजीं ज्ञाते ॥ ६८ ॥ अपरोक्ष् साक्षात्कार् संन्यासी । त्याची स्थितिगति स्वधर्मेंसीं । उद्धवा सांगितली तुजपाशीं । आता मुमुक्षु संन्यासी ते ऐक् ॥ ६९ ॥ दुःखोदर्केषु कामेषु जातनिर्वेद् आत्मवान्‌ । अजिज्ञासितमद्धर्मो गुरुं मुनिमुपाव्रजेत्‌ ॥ ३८ ॥ शेंडा धरूनि समूळ् । ज्याचें उत्तरोत्तर् दुःख् फळ् । अतिबाधक् विषयजाळ् । त्यासी केवळ् जो अनासक्त् ॥ २७० ॥ माझे प्राप्तीलागीं चित्त् । सदा ज्याचें आर्तभूत् । स्वधर्मकर्मीं वर्तत् । जो वेदशास्त्रार्थ् विवंची ॥ ७१ ॥ इहामुत्रभोगीं निश्चित् । त्रासलें असे ज्याचें चित्त् । ऐसा जो कां नित्य् विरक्त् । अतिविख्यात् मुमुक्षु ॥ ७२ ॥ तेणें साधवया ब्रह्मज्ञान् । तेचि साधनीं लावितां मन् । स्वकर्म् झालिया विलक्षण् । आली नागवण् प्रत्यवायें ॥ ७३ ॥ तेणें कर्म् संन्यासोनि जाण् । करावें संन्यासग्रहण् । सद्‍गुरूसी रिघावें शरण् । तेणें ब्रह्मज्ञानपदप्राप्ती ॥ ७४ ॥ एक् केवळ् भावार्थीं । नेणे स्वधर्मकर्मगती । नेणे शास्त्रश्रवणव्युत्पत्ती । परी माझी प्रीती अनिवार् ॥ ७५ ॥ तेणेंही संन्यासूनि जाण् । गुरूसी रिघावें शरण् । त्यासीही गुरुकृपा जाण् । ब्रह्मज्ञान‍अवाप्ति ॥ ७६ ॥ गुरु करावा अतिशांत् । शास्त्रार्थ् परमार्थपारंगत् । त्याचे सेवेचा भावार्थ् । स्वयें श्रीकृष्णनाथ् सांगत् ॥ ७७ ॥ तावत्परिचरेद्‍भक्तः श्रद्धावाननसूयकः । यावद्‍ब्रह्म् विजानीयान्मामेव् गुरुमादृतः ॥ ३९ ॥ अचळ् अमळ् अविनाश् । परात्परतर् परेश् । गुरु तो परब्रह्म् ईश् । हा दृढ् विश्वास् धरावा ॥ ७८ ॥ त्या विश्वासाच्या पडिपाडीं । नवल् गुरुचरणीं आवडी । नित्य् नूतन् नवी गोडी । चढोवढी भजनार्थ् ॥ ७९ ॥ ऐशिया भजनपरवडीं । हृदयीं श्रद्धा उसळे गाढी । गुरु‌आज्ञेची नुल्लंघी काडी । आळस् तोडी समूळ् ॥ २८० ॥ गुरुवाक्याचेनि श्रवणें । विकल्पाचें खत् खाणणें । संकल्पासी सूळीं देणें । जीवें घेणें अभिमाना ॥ ८१ ॥ तेथ् असूया कैंची उठी । धाकेंचि निमाली उठा‌उठी । ऐशी गुरुचरणीं श्रद्धा मोठी । परब्रह्मदृष्टीं गुरु पाहे ॥ ८२ ॥ निर्गुण् जो निर्विकारु । तोचि मूर्तिमंत् माझा गुरु । करूनि अकर्ता ईश्वरु । तोचि हा साचारु गुरु माझा ॥ ८३ ॥ नित्य् निर्विकल्प् देख् । ज्यासी म्हणती समाधिसुख् । तें माझ्या गुरूचें चरणोदक् । ऐसा भावें नेटक् भावार्थी ॥ ८४ ॥ गुरूतें पाहतां ब्रह्मदृष्टीं । शिष्य् ब्रह्मत्वें आला पुष्टी । ब्रह्मरूप् देखे सृष्टी । निज‍ऐक्यें मिठी गुरुचरणीं ॥ ८५ ॥ ऐसें ब्रह्मरूपीं ऐक्य् घडे । तंव् गुरुसेवा करणें पडे । ऐक्य् झाल्याही पुढें । सेवा न् मोडे अखंडत्वें ॥ ८६ ॥ कापूर् घातलिया जळीं । स्वयें विरोनि जळ् परमळी । तेवीं अहं जा‌ऊनि सेवा सकळी । सर्वीं सर्वकाळीं गुरुचरणीं ॥ ८७ ॥ ऐशी अवस्था न् येतां हाता । केवळ् मुंडूनियां माथा । संन्यासी म्हणवी पूज्यता । त्याची अनुचितता हरि बोले ॥ ८८ ॥ स्वयें संन्यास् अंगीकारी । ब्रह्मसाक्षात्कार् जो न् करी । त्यालागीं स्वयें श्रीहरी । अतिधिक्कारीं निंदीत् ॥ ८९ ॥ यस्त्वसंयतषड्वर्गः प्रचण्डेन्द्रियसारथिः । ज्ञानवैराग्यरहितस्त्रिदण्डमुपजीवति ॥ ४० ॥ सुरानात्मानमात्मस्थं निन्हते मां च् धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माच्च् विहीयते ॥ ४१ ॥ नाहीं वैराग्याची स्थिती । नसतां विषयविरक्ती । देखोदेखीं संन्यास् घेती । केवळ् वृत्ती अन्नार्थ् ॥ २९० ॥ संन्यास् नेघतां पूर्व् दृष्टीं । जें वैराग्य् होतें पोटीं । तें संन्यास् घेतल्यापाठीं । उठा‌उठीं पळालें ॥ ९१ ॥ ज्ञानेंद्रियें पांच् सहावें मन् । हेचि अरिषड्वर्ग् जाण् । यांचें न् करितां निर्दळण् । संन्यासपण् तो विटंबु ॥ ९२ ॥ अवैराग्यें सकाम् मन् । तेणें विषयाकुलित् बुद्धि जाण् । नाहीं ज्ञान् ध्यान् साधन् । दंडग्रहण् उदरार्थ् ॥ ९३ ॥ नुपजेच् अनुताप् जाण् । न् करीच् श्रवण् मनन् । आदरें न् साधीचि साधन् । त्यासी ब्रह्मज्ञान् नव्हेचि ॥ ९४ ॥ त्याचा व्यर्थ् संन्यास् जाण् । व्यर्थ् त्याचें दंड् मुंडण् । व्यर्थ् काषायवस्त्रग्रहण् । जेवीं वेषधारण् नटाचें ॥ ९५ ॥ संन्यास् घेतलिया पाठीं । काम् उचंबळे उठा‌उठीं । क्रोधलोभांची धुमे आगिटी । चौगुणा पोटीं अभिमान् ॥ ९६ ॥ आसक्ति अधिकाधिक् उठी । सदा ग्रामणी चावटी । करणें पैशुन्याच्या गोष्टी । दंड् कासोटी दंभार्थ् ॥ ९७ ॥ अनधिकारीं दंडग्रहण् । तेणें संन्यासरूपें जाण् । केवळ् आली नागवण् । आपल्या आपण् नाडिलें ॥ ९८ ॥ नाडिले यज्ञाधिकारी सुरगण् । नाडिले स्वधाकाराचे पितृगण् । नाडिले ऋषि भूतगण् । बळि‌अर्पण् ठाकेना ॥ ९९ ॥ जीवरूपें मी परमात्मा आपण् । त्या मज् हृदयस्था ठकिलें जाण् । जीवोद्धारीं जें संन्यासग्रहण् । तेंचि दृढबंधन् त्यासी झालें ॥ ३०० ॥ संन्यासग्रहणीं दृढबंधन् । व्हावया कोण् कारण् । तेचि विषयींचें निरूपण् । स्वयें नारायण् बोलिला ॥ १ ॥ पूर्वश्लोकींचे तिनी चरण । येथील हें निरूपण । श्रोतीं द्यावें अवधान । झणें विलक्षण कोणी म्हणे ॥ २ ॥ ”निन्हुते मां च धर्महा । अविपक्वकषायोऽस्मादमुष्माञ्च विहीयते ॥” करोनियां संन्यासग्रहण । न करी ज्ञान ध्यान साधन । न करी प्रणव‍उच्चारण । अविरक्त जाण विषयार्थी ॥ ३ ॥ तेणें दारादि‌अभिलाषण । करिती द्रव्याचें संरक्षण । आणि गोदानादि ग्रहण । पचन पाचन करविती ॥ ४ ॥ मठाधिपत्याचिये बुद्धीं । धनधान्यस्नेहसमृद्धी । नाना वाढवितां उपाधी । जीवात्मा त्रिशुद्धी नाडिला ॥ ५ ॥ ऐसें करितां अधर्मपण । जीवासी लागलें दृढ बंधन । जेणें इहलोकपरलोकसाधन । त्या नरदेहासी जाण नाडिलें ॥ ६ ॥ चौर्‍याशीं लक्ष योनींप्रती । जैं असंख्य फेरे होती । तैं नरदेहाची प्राप्ती । अवचटें पावती सभाग्य ॥ ७ ॥ त्या नरदेहासी ये‌ऊनि जाण । स्वयें नागवला आपण । करितां अधर्माचरण । नरक दारुण संन्याशा ॥ ८ ॥ ज्या नांव गा आश्रम् चौथा’ । ज्यासी देवो वंदी माथां । तेथेंही अधर्म् करितां । नरकपाता पावले ॥ ९ ॥ ज्या नरकाचे ठायीं । कोटि वर्षें बुडतां पाहीं । ठावचि न् लागें कंहीं । तैसे ठायीं बुडाले ॥ ३१० ॥ मुख्य् चतुर्थाश्रमीं हे स्थिती । तैं इतर् आश्रमां कैंची गती । यालागीं आश्रमधर्मयुक्ती । स्वयें श्रीपती सांगत् ॥ ११ ॥ भिक्षोर्धर्मः शमोऽहिंसा तप् इक्षा वनौकसः । गृहिणो भूतरक्षेज्या द्विजस्याऽऽचार्यसेवनम्‌ ॥ ४२ ॥ संन्याशासी मुख्य् शम्’ । सबाह्य् इंद्रियनेम्’ । अहिंसा’ त्याचा स्वधर्म् । हा परमधर्म् संन्याशासी ॥ १२ ॥ वानप्रस्थाचा स्वधर्म् । तपप्राधान्य् मंत्र् होम्’ । आतां गृहस्थाचा नेम् । तिंही आश्रमां विश्रामदाता ॥ १३ ॥ गृहस्थ् मुख्य् अग्निहोत्र्’ जाण् । संन्यासी ब्रह्मचार्‍यांसी द्यावें अन्न् । करावें भूतसंरक्षण्’ । तेहीं लक्षण् अवधारीं ॥ १४ ॥ असिलेनि सामर्थ्यें जाण् । अन्न् धन् वस्त्र् जीवन् । तृण् पर्ण् निवासस्थान् । दे‌ऊनि दीन् रक्षावे ॥ १५ ॥ ब्रह्मचार्‍याचे स्वधर्मीं जाण् । श्रद्धायुक्त् गुरुसेवन्’ । एवं आश्रमधर्मलक्षण् । मुख्यत्वें हें जाण् उद्धवा ॥ १६ ॥ गृहस्थाश्रमीं जो धर्म् आहे । तो इतर् आश्रमीं करूं नये । इतराश्रमींचा धर्म् पाहें । गृहस्थाश्रमीं होये करणीय् ॥ १७ ॥ ब्रह्मश्चर्यं तपः शौचं संतोषो भूतसौहृदम्‌ । गृहस्थस्याप्यृतौ गन्तुः सर्वेषां मदुपासनम्‌ ॥ ४३ ॥ गृहस्थें व्हावया निष्पाप् । ठाके तो करावा जप् तप् । उभय् शौचांचें स्वरूप् । अतिसाटोप् करावें ॥ १८ ॥ पोटींची सांडूनि कुसमुस् । यथालाभें अतिसंतोष् । परोपकारीं अतिहव्यास् । सुहृद् सर्वांस् स्वात्मत्वें ॥ १९ ॥ गृहस्थीं ब्रह्मचर्यलक्षण् । ऋतुकाळीं स्वदाराभिगमन् । मुख्यत्वें करावें माझें भजन् । हा स्वधर्म् जाण् सर्वांचा ॥ ३२० ॥ सर्व् आश्रम् सर्व् वर्ण् । त्यांसी हाचि स्वधर्म् जाण् । सांडोनि विषयाचें भान् । माझें भजन् करावें ॥ २१ ॥ करितां स्वधर्में माझी भक्ती । भक्तासी होय् जे प्राप्ती । तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानंदें ॥ २२ ॥ इति मां यः स्वधर्मेण् भजेन्नित्यमनन्यभाक्‌ । सर्वभूतेषु मद्‍भावो मद्‍भक्तिं विन्दतेऽदृढाम्‌ ॥ ४४ ॥ सर्व् भावें अनन्यगतीं । करितां स्वधर्में माझी भक्ती । माझा भावो सर्वांभूतीं । शीघ्रगती उल्हासे ॥ २३ ॥ मद्‍भावो जोडल्या सर्व् भूतीं । तेणें प्रकटे माझी चौथी भक्ती । जिच्या पायीं चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥ २४ ॥ अनिवार् अनन्यगती । सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती । तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांतीं च्यवेना ॥ २५ ॥ भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम्‌ । सर्वोत्पत्त्यप्ययं ब्रह्म् कारणं मोपयति सः ॥ ४५ ॥ सकळ् सच्चिदानंदस्थिती । जीमाजीं सांपडे मी सहजगती । ती नांव् माझी परमभक्ती’ । जाण् निश्चितीं उद्धवा ॥ २६ ॥ विपरीत् संसाराचें भान् । दिसे दृष्य्-विलक्षण् । तेथ् सदा स्वानंदपूर्ण् । ते चौथी जाण् भक्ती माझी ॥ २७ ॥ जेथ् देव् भक्त् एक् होती । एकपणें भजनस्थिती । ऐशी साधकांसी प्राप्ती । ते परमभक्ती’ उद्धवा ॥ २८ ॥ माझी प्रकटल्या परम् भक्ती । पतन् नाहीं प्रळयांतीं । साधक् मद्‌रूपा येती । स्वरूपस्थितीं समसाम्यें ॥ २९ ॥ त्या स्वरूपाचें लक्षण् । सांगताहे श्रीनारायण् । उत्पत्ति-स्थिति-निदान् । कारणा जो चिदात्मा ॥ ३३० ॥ जो सकळ् नियंता ईश्वरु । जो विश्वात्मा विश्वंभरु । जो उपनिषदांचें सारु । जो महेश्वरु जगाचा ॥ ३१ ॥ त्या पदाची पदप्राप्ती । भक्त् पावले परमभक्तीं । तेंचि पुढती उद्धवाप्रती । स्वानंदें श्रीपति सांगत् ॥ ३२ ॥ इति स्वधर्मनिर्णिक्तसत्त्वो निर्ज्ञातमद्‍गतिः । ज्ञानविज्ञानसंपन्नो नचिरात्समुपैति माम्‌ ॥ ४६ ॥ ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक् पावले स्वधर्मस्थितीं । ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सांगत् ॥ ३३ ॥ करितां स्वधर्मानुष्ठान् । रजतमें नाशती जाण् । शुद्धसत्त्व् अंतःकरण् । तेथ् माझें ज्ञान् प्रकाशे ॥ ३४ ॥ प्रकाशल्या माझें ज्ञान् । तेणें उल्हासे माझें भजन् । भजनास्तव् मन् । विकल्पपण् पैं त्यागी ॥ ३५ ॥ विकल्पत्यागाचिये गतीं । वैराग्यें उचंबळे विरक्ती । भासे परमात्मा सर्व् भूतीं । तेणें परमभक्ती’ उल्हासे ॥ ३६ ॥ उल्हासल्या परमभक्ती । भक्तासी माझी स्वरूपप्राप्ती । तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुतीं सांगत् ॥ ३७ ॥ परमात्मा परंज्योती । परब्रह्म् परंज्ञप्ती । परात्परतर् प्रकृती । वेद् बोलती परावर्’ जो ॥ ३८ ॥ अज् अव्यय् अक्षर् । अरूप् अनाम् अगोत्र् । अलक्ष् अतर्क्य् अपार् । अपरंपारस्वरूप् ॥ ३९ ॥ ऐशी निजस्वरूपीं निजप्राप्ती । भक्त् पावले स्वधर्मस्थिती । जेथूनि परतलिया श्रुती । नेतिनेतीं निजनिष्ठा ॥ ३४० ॥ ऐसें मद्‌रूप् पावल्यापाठीं । संसाराची काढिली कांटी । नांवरूपांची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणां ॥ ४१ ॥ एवं स्वधर्माचेनि धर्मवशें । मीतूंपणाचें नांवचि पुसे । मद्‌रूपाचेनि सामरस्यें । अनायासें मीचि जाहले ॥ ४२ ॥ पूर्वीं होतों मी जीव् । आतां झालों सदाशिव्’ । हाही बुडाला आठव् । ऐसा माझा अनुभव् मद्‍भक्तां ॥ ४३ ॥ शून्य् पडिलें संसारस्थिती । तेथ् कैंची पुनरावृत्ती । ऐशी मद्‍भक्तां माझी प्राप्ती । जाण् निश्चितीं उद्धवा ॥ ४४ ॥ एवं स्वधर्में मत्प्राप्ति जाण् । तया स्वधर्माचें महिमान् । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण् । सावधान् परियेसा ॥ ४५ ॥ वर्णाश्रमवतां धर्म्, एष् आचारलक्षणः । स् एव् मद्‍भक्तियुतो, निःश्रेयसकरः परः ॥ ४७ ॥ अनादि जो स्वधर्माचार् । जो कां मोक्षकर् साचार् । तेणें स्वधर्में सकाम् नर् । लोकांतर् वांछिती ॥ ४६ ॥ झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय् पुनरावृत्ती । न् करूनियां माझी भक्ती । स्वधर्म् नाशिती सकामें ॥ ४७ ॥ ब्राह्मणा आला भद्रजाती । आम्हां न् पोसवे हा निश्चितीं । मग् तो दे‌ऊनियां घेती । वाहावया पोथी वृद्ध् ढोर् ॥ ४८ ॥ यापरी स्वधर्म् जाण् । उपेक्षिती गा ब्राह्मण् । मग् लोकांतरीं कोरान्न् । मागावया कण् धांवती ॥ ४९ ॥ घरीं आणोनि दीघली कामधेनु । आम्हां न् पोसवे म्हणूनु । ताकासाठीं देती हेळसूनु । आली नागवणु ते नेणे ॥ ३५० ॥ तेवीं म्यां जाण् गायत्रीमंत्र् । दिधला ब्राह्मणांसी स्वतंत्र् । तो उपेक्षूनियां मंत्रतंत्र् । शूद्राचार् आचरती ॥ ५१ ॥ सौर् शाक्त् गाणपत्यादि जाण् । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण् । परी गायत्रीचें अनुष्ठान् । एकही जाण् न् करिती ॥ ५२ ॥ नाहीं गायत्रीचें अनुष्ठान् । परी विपरीत् झालें आन् । गायत्रीचें श्रेय् जाण् । देती ब्राह्मण् द्रव्यार्थ् ॥ ५३ ॥ गायत्रीमंत्र् असोनि घरीं । तिचा भावार्थ् कोणी न् धरी । दीक्षेलागीं मूर्खाचे द्वारीं । लोळिजे द्विजवरीं ऐसें झालें ॥ ५४ ॥ शस्त्रास्त्रीं रथ् सुदृढू । त्यावरी बैसविला भेडू । सांडूनि पळणें मानी सुरवाडू । न् शके विभांडूं रणांगण् ॥ ५५ ॥ तेवीं वेदरूप् मी नारायण् । ब्राह्मणहृदयीं असें जाण् । त्याचें नेणोनि महिमान् । वेदपारायण् विकिती ॥ ५६ ॥ वांछूनियां स्वर्गफळ् । नाना याग् करिती प्रबळ् । कामकल्पना केवळ् । स्वधर्म् विकळ् पाडिती ॥ ५७ ॥ वेदीं प्रतिपाद्य् कर्मफळ् । तो वेदु मिथ्या नव्हे केवळ् । तो वेदवाद् समूळ् । नेणोनि बरळ् हा मानिती ॥ ५८ ॥ घ्यायवा वोखदाची वाटी । माता साकर् दे चिमुटी । तें मुख्य् फळ् नव्हे दृष्टीं । जावया पोटींचा महारोगु ॥ ५९ ॥ तेवीं वेद् बोले जें फळ् । तें प्रवृत्तिरोचना केवळ् । स्वधर्म् विचारितां समूळ् । चित्तमळक्षाळक् ॥ ३६० ॥ स्वधर्म् सांडूनि सर्वथा । सकाम् कर्में करूं जातां । तेंही शिणल्यावेगळें तत्त्वतां । क्षुद्रकामता फळेना ॥ ६१ ॥ जेणें द्रव्यें अमृत् ये हाता । तें वेंचूनि मद्य् घेतां । अधर्म् आणि उन्मत्तता । पिशाचता जग् थुंकी ॥ ६२ ॥ स्वपतीसीं काम् भोगितां । परलोक् पावि पतिव्रता । तोचि काम् परपुरुषीं करितां । अधःपाता नेतसे ॥ ६३ ॥ जिह्वा दुरुक्ती बोलतां । यमप्रहार् वाजती माथां । तिणेंचि राम् राम्’ म्हणतां । हरिभक्तां यम् कांपे ॥ ६४ ॥ तेवीं पावोनि उत्तम् जन्म् । कर्म् करूनि सकाम् । भोगावें दुःख् परम् । मरण् जन्म् अनिवार् ॥ ६५ ॥ तेणेंचि देहें स्वधर्म् । करितां निरसे सकळ् कर्म् । निवारे मरणजन्म् । बहुतां हे वर्म् कळेना ॥ ६६ ॥ स्वधर्में घडे भगद्‍भक्ती । ऐशी अतिगुह्य् आहे व्युत्पत्ती । ते मी सांगेन् तुजप्रती । यथानिगुतीं उद्धवा ॥ ६७ ॥ स्वधर्म् करणें आवश्यक् । तेथें सांडणें फळाभिलाख् । तेंचि मदर्पण्’ चोख् । न् करितां देख् संकल्पु ॥ ६८ ॥ हो कां घरिच्याचि रांजणीं । निघती मुक्ताफळांच्या श्रेणी । तरी कां ताम्रपाणीं । समुद्रमिळणीं शोधावी ॥ ६९ ॥ आपुलेच् घरींचीं झाडें । फळती कल्पतरूचेनि पाडें । तरी अमरावतीचे चाडें । वृथा वेडे कां शिणती ॥ ३७० ॥ हो कां सद्‍गुरूंचे तीर्थ् घेतां । पाविजे परम् पवित्रता । तरी धांवावया नाना तीर्था । विशेषता ते कायी ॥ ७१ ॥ कां ईश्वरत्वें पिता पूजितां । निजमोक्ष् लाभे आ‌इता । तरीं भजावें देवां देवतां । कोण्या अर्था सज्ञानीं ॥ ७२ ॥ तेवीं स्वकर्माचि करितां । लाभे आपली निष्कर्मता । ते स्वधर्मीं काम् कल्पितां । जीव् निजस्वार्था नाडले ॥ ७३ ॥ निर्विकल्पें स्वधर्माचरण् । त्या नांव् माझें शुद्ध् भजन्’ । तेणें भजनें हो‍ऊनि प्रसन्न् । मी विवेक्-वैराग्य्-ज्ञान् भक्तांसी दें ॥ ७४ ॥ तेणेंचि ज्ञानें होय् शुद्ध् मती । चित्तशुद्धीमाजीं परमभक्ती । ते भक्तीनें माझी परम् प्राप्ती । भक्त् पावती उद्धवा ॥ ७५ ॥ यालागीं नैराश्यें जें स्वधर्मकर्म् । तेंचि माझें भजन् परम् । तेणें भजनें भक्तोत्तम् । स्वयें पुरुषोत्तम् हो‍ऊनि ठाकती ॥ ७६ ॥ यापरी स्वधर्मस्थितीं । लाभे आपुली निजमुक्ती । तेचि म्यां तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥ ७७ ॥ एतत्तेऽभिहितं साधो भवन्पृच्छति यच्च माम्‌ । यथा स्वधर्मसंयुक्तो भक्तो मां समियात्परम्‌ ॥ ४८ ॥ इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संगितायामेकादशस्कन्धे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥ उद्धवा पुसिलें त्वां मजप्रती । स्वधर्में केवीं घडे मुक्ती । भक्तीनें पाविजे निजमुक्ती । तें म्यां तुजप्रती सांगितले ॥ ७८ ॥ हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म । उडोनि जाय भवभ्रम । प्राप्ती परम स्वधर्में ॥ ७९ ॥ माझिया प्राप्तीलागीं स्वकर्म । नैराश्यें आचरावा स्वधर्म । हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुषोत्तम सदा वश्य ॥ ३८० ॥ स्वधर्मा‌ऐसा स्पर्शमणी । सांपडल्या निर्विकल्पपणीं । तो लावितां दृश्यस्थानीं । चिन्मात्रसुवर्णीं तेज उठी ॥ ८१ ॥ स्वधर्मा‌ऐसा दिनमणी । नैराश्यें उगवलिया स्वभुवनीं । तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपणीं सदा वर्ते ॥ ८२ ॥ स्वधर्मा‌ऐसें निज‍अमृत । जे निर्विकल्पें सेवूं जाणत । त्यांसी जन्ममरणांचा आवर्त । मी श्री‌अनंत लागों नेदीं ॥ ८३ ॥ जे कां स्वधर्मीं विमुख । त्यासीं माझी प्राप्ती नाहीं देख । जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥ ८४ ॥ त्या स्वधर्माची अतर्क्य गोष्टी । न कळे नैष्कर्में निजदृष्टीं । याचिलागीं जन्मकोटी । अतिसंकटीं जीव भोगी ॥ ८५ ॥ स्वधर्में करितां स्वकर्म । जैं नैष्कर्म्यतेचें कळे वर्म । तैं विभांडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥ ८६ ॥ एवं स्वधर्म यापरी । तारक होय संसारीं । स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरीं निजभक्त ॥ ८७ ॥ संसार तरले हा बोलु कुडा । स्वधर्म करितं माझिया चाडा । होय भवसागर कोरडा । मी सांपडें पुढा निजात्मा ॥ ८८ ॥ ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी । देवो सांगे आवडीभरीं । नानापरी प्रबोधें ॥ ८९ ॥ भक्तिप्राधान्य भागवत । मुख्य भक्ति ते स्वधर्मयुक्त । येणें स्वधर्मभजनें समस्त । परम भागवत उद्धरले ॥ ३९० ॥ त्या स्वधर्मकर्माचा एकान्त । निजभजनभक्तीचा भावार्थ । उद्धवासी श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत एकादशीं ॥ ९१ ॥ त्या एकादशाच्या गोष्टी । स्वधर्मकर्माची कसवटी । एका जानार्दनकृपादृष्टीं । टीका मराठी हे केली ॥ ९२ ॥ हे करणी केली जनार्दनें । मज अभंगीं घातलें तेणें । शेखीं मीतूंपणाचे ठाणें । येणें निरूपणें उडविलें ॥ ९३ ॥ उडविलें विषयीं विषयपण । उडविले भेदाचें भान । उडविलें जीवशिवपण । जनीं जनार्दन तुष्टोनी ॥ ९४ ॥ जनार्दनें जनकें तेणें । आम्हां केलें परब्रह्म खेळणें । यालागीं सकळ क्रिया तेणें होणें । स्वधर्मपणें सहजेंचि ॥ ९५ ॥ सहजीं लागल्या स्वधर्म । कर्मचि होय निष्कर्म । संसार होय परब्रह्म । हे कृपा परम जनार्दनीं ॥ ९६ ॥ यालागीं सांडूनियां एकपण । एका जनार्दन शरण । स्वधर्मकर्माचें निरूपण । झालें संपूर्ण तया कृपा ॥ ९७ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां वानप्रस्थसंन्यासधर्मनिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ ९८ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ३९७ ॥ श्लोक ॥ ४८ ॥

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org