श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां । तंव मीपण गेलें वायां घेऊनियां तूं पणा ॥ १ ॥ नवल पायांचे कठिणपण । वज्रें न तुटे लिंगदेह जाण । त्याचेंही केलें चूर्ण । अवलीळा चरण लागतां ॥ २ ॥ पायीं लागतांचि बळी । तो त्वां घातला पाताळीं । पायीं लवणासुरा रवंदळी । अतुर्बळी निर्दाळितां । ३ ॥ पाय अतिशयेंसीं तिख । काळियासी लागतां देख । त्याच्ं शोषोनियां विख । केला निर्विख निःशेष ॥ ४ ॥ पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण । त्याचें तुटलें गुणबंधन । गमनागमन खुंटलें ॥ ५ ॥ पायांचा धाक सबळां । पायें उद्धरिली अहल्या शिळा । पाय नृगें देखतां डोळां । थित्या मुकला संसारा ॥ ६ ॥ आवडी पाय चिंतिती दास । त्यांच्या मनुष्यधर्मा होय नाश । पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवघात ॥ ७ ॥ पायवणी शिरीं धरिलें शिवें । तो जगातें घेतु उठिला जीवें । त्यासी राख लाविली जीवेंभावें । शेखीं नागवा भंवे श्मशानीं ॥ ८ ॥ ऐसें पायांचें करणें । शिवासी उरो नेदी शिवपणें । मा जीवांसी कैंचें जीवें जिणें । हें मानितें मानणें उरों नेदी ॥ ९ ॥ ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणीं ठेला ठावो । तेथेंही पायांचा नवलावो । केला एकपणा वावो वंदनमात्रें ॥ १० ॥ तेथें कवेणें कवणासी वानणें । कवणें कवणासी विनविणें । कवणें कवणासी देणें घेणें । मीतूंचें जिणें जीवें केलें ॥ ११ ॥ तेव्हां देव आणि भक्तु । जाहलासी मा तूंचि तूं । तेथें मीपणाची मातु । कोणें कोणांतु मिरवावी ॥ १२ ॥ ऐशिया पदीं वाऊनि तत्त्वतां । करवितोसी ग्रंथकथा । तेव्हां माझेनि नांवें कवि कर्ता । तूंचि वस्तुतां सद्गुरुराया ॥ १३ ॥ माझें नामरूप आघवें एक । तेंही जनार्दनु झाला देख । ऐसें एकपणाचें कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥ १४ ॥ तेणें कौतुकेंचि आतां । माझेनि नांवें कवि कर्ता । होऊनि स्वयें रची ग्रंथा । यथार्थता निजबोधें ॥ १५ ॥ तेथें द्वितीयाध्यायाचे अंतीं । दूस्तर माया उत्तम-भक्तीं । निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥ १६ ॥ कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया । अत्यादरेंकरोनियां । म्हणे मुनिवर्या अवधारीं ॥ १७ ॥ श्रीराजोवाच - परस्य विष्णोरीशस्य मायिनामपि मोहिनीम् । मायां वेदितुमिच्छामो भगवन्तो ब्रुवन्तु नः ॥ १ ॥ तृतीयाध्यायीं निरूपण । राजा करील चारी प्रश्न । माया आणि तिचें तरण । ब्रह्म तें कोण - कर्म तें कैसें ॥ १८ ॥ तेथें प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण । तेचि अर्थींचें निरूपण । मायेचें लक्षण राजा बोले ॥ १९ ॥ सुरांमाजीं श्रेष्ठ हृषीकेशी । ब्रह्मादि शिवु वंदिती ज्यासी । त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे मायिकांसी व्यामोही ॥ २० ॥ कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवु मानिती चितें । आम्ही पूर्ण मायेचे नियंते । शेखीं माया मयांतें निजमोहें मोही ॥ २१ ॥ ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नीं । वीर्य द्रवे पार्वती देखोनी । महादेवो महाज्ञानी । देखतांचि मोहिनी निजवीर्य द्रवलें ॥ २२ ॥ जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीतें श्रुति म्हणती ’अजया’ । ते हरीची दुर्धर माया । विवंचूनियां मज सांगा ॥ २३ ॥ म्हणाल दुर्धर मायेचि बाधकता । ते बाधूं न शके अनन्य भक्तां । तुवांही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा कां पुसशी ॥ २४ ॥ तेचि अर्थींचें निरूपण । राजा साक्षेपेंसीं आपण । मुनींचें ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥ २५ ॥ नानुतृप्ये जुषन्युष्मद् वचो हरिकथामृतम् । संसारतापनिस्तप्तो मर्त्यस्तत्तापभेषजम् ॥ २ ॥ येथपर्यंत तपासले सेवितां तुमचें वचनामृत । पुरें न म्हणे माझें चित्त । आस्वादितां शब्दीं शब्दार्थ । श्रवण क्षुधार्त अधिक जाहले ॥ २६ ॥ अद्भुत कथा अतिसुरस । श्रवणीं श्रवणा अधिक सोस । रसना म्हणे हा अतिगोड रस । डोळ्यां उल्हास हें अपूर्व रूप ॥ २७ ॥ घ्राण म्हणे हा निजगंधु । सुमनीं सुमना अतिसुगंधु । वाचा म्हणे हा शब्दु । परमानंदु अनुवादे ॥ २८ ॥ नवल निरूपणाचा यवा । भुजां स्फुरण ये द्यावया खेवा । आलिंगन जीवींच्या जीवा । निजसद्भावा होतसे ॥ २९ ॥ तुमच्या कथा सुनिश्चितीं । दिव्यौषधि भवरोग छेदिती । त्रिविध तापांची निवृत्ती । जड मूढ प्राकृतीं ऐकता भावें ॥ ३० ॥ राजा परमार्थें साकांक्ष । देखोनि सार्थक कथेंचे लक्ष । हरीधाकुटा अंतरिक्ष । निरूपणीं दक्ष बोलता झाला ॥ ३१ ॥ श्रीअन्तरीक्ष उवाच - एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज । ससर्जोच्चावचान्याद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धयेआ ॥ ३ ॥ अंतरिक्ष म्हणे राया । तुवां पुशिली हरीची माया । तो प्रश्नचि गेला वयां । बोलणें न ये आया बोल्क्यचे ॥ ३२ ॥ वंध्यापुत्राचा जन्मकाल । रायें आणविला तत्काल । राशिनक्षत्र-जाति-कुल । सांगों जातां विकल वाचा होय ॥ ३३ ॥ मृगजळाची पव्हे बरवी । गंधर्वनगरीं घालावी । वारा वळूनि सूत्रस्वभावीं । वाती लावावी खद्योततेजें ॥ ३४ ॥ निजच्छायेचें शिर फोडा । आकाशाची त्वचा कढा । शिंपीं आंधारु खरवडा । बागुलाचा रांडवडा निजशस्त्रें कीजे ॥ ३५ ॥ वांझेचे सुने पुत्र झाला । तेथ भीष्मस्त्रियेसी पान्हा आला । तेणें पयःपनें तो मातला । घरभंगु केला दिगंबराचा ॥ ३६ ॥ जातीं लहान दळावा वारा । अश्वशृंगें आकाश चिरा । नपुंसकाचीं नातोंडें घरा । सूर्योदयीं अंधारा लपों आलीं ॥ ३७ ॥ गुंजेचे निजतेजें दिवी । हनुमंतलग्नीं लावावी । या सोहळियालागीं विकावी । वोसगांवीं निजच्छाया ॥ ३८ ॥ आकाशाचिं सुमनें । सुवासें कीं वासहीनें । हें विवंचिती जे देखणे । ते मायेचें सांगणें सांगोत सुखें ॥ ३९ ॥ एवं मायेचें जें बोलणें । तें सांगतांचि लाजिरवाणें । नुपजत्याचें श्राध करणें । तैशी सांग्णें महामाया ॥ ४० ॥ माया म्हणवी येणें भावें । जे मीकदा विद्यमान नव्हें । यालागीं अविद्या येणें नांवें । वेदानुभवें गर्जती शास्त्रें ॥ ४१ ॥ भ्रम तो मायेचें निजमूळ । भ्रांति हेंचि फूल सोज्ज्वळ । भुली तें इचें सजुक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥ ४२ ॥ हे नसतेनि रूपें रूपा अली । सत्यासत्यें गरोदर जाहली । तेथें असत्याचीन् पिलीं । स्वयें व्याली असंख्य ॥ ४३ ॥ वासनाविषयगुणीं । गुंफिली मिरवे वेणी । मीपणाच्या तरुणपणीं । मदनमोहिनी चमके ॥ ४४ ॥ मृगजलींच्या मुक्ताफळीं । मस्तकीं बाणली जाळी । गगनाच्या चांपेकळीं । मिरवे वेल्हाळी अतिसौंदर्यें ॥ ४५ ॥ रज्जुसर्पमाथ्याचा मणी । काढूनि लेइली ते लेणीं । शुक्तिकारजत-पैंजणीं । चाले रुणझुणी खळखळत ॥ ४६ ॥ शशाविषाणपादुका । लेऊनि ते चाले देखा । तिसी तो अहंकरु सखा । अतिनेटका ज्येष्ठपुत्र ॥ ४७ ॥ कुळविस्तारालागीं पाहीं । ममता व्याली ठायीं ठायीं । मोहो उपजवूनि देहीं । घरजांवई त्या केला ॥ ४८ ॥ अहंमोहममतायोगें । जग विस्तारले अंगें । स्थूळ सबळ प्रयोगें । ममता निजअंगें वाढवी ॥ ४९ ॥ संकल्पविकल्पांचीं कांकणें । बाणोनि मन दिधलें आंदणें । घालोनि त्रिगुणाचें ठाणें । माया पूर्णपणें थोरावें ॥ ५० ॥ ऐशी मिथ्या मूळमाया । वाढली दिसे राया । ते कैसेनि ये आया । सांगावया अनिरूप्य ॥ ५१ ॥ संत म्हणों तरी ते नासे । असंत म्हणों तरी आभासे । आधीं असे पाठीं नासे । ऐसीही नसे निजंगें ॥ ५२ ॥ जैसें मृगजळाचें ज्ञान । दिसे तरी तें मिथ्या पूर्ण । तैसें आभासे भवभान । ते माया जाण नृपनाथा ॥ ५३ ॥ श्रुतिशास्त्रां मायामाग । पुसतां आरोगिती मूग । मायेसी साचाचें अंग । पाहतां चांग दिसेना ॥ ५४ ॥ मृगजळाची महानदी । कोण गिरिवर उद्बोधी । हें सांगावया नाकळे बुद्धी । तेवीं मायासिद्धी अनिर्वाच्य ॥ ५५ ॥ आरसां काय प्रतिबिंब असे । जो पाहे तोचि आभासे । तेवीं आपुलेनि संकल्पवशें । माया उल्हासे नसतीचि ॥ ५६ ॥ रज्जुसर्प जीत धरिला । त्याचें कौतुक पाहों चला । ऐसे बोलती जे बोला । ते मायेच सोहळा सांगोत सुखें ॥ ५७ ॥ उडवों जातां आपुली छाया । सर्वथा न उडवे ज्याची तया । तेवीं तरतां दुस्तर माया । जाण राया निश्चितीं ॥ ५८ ॥ अग्निसंकल्पु सूर्यीं नसे । शेखीं सूर्यकांतींही न दिसे । तळीं धरिलेनि कापुसें । अग्नि प्रकाशे तद्योगे ॥ ५९ ॥ तेवीं शुद्ध ब्रह्मीं संकल्पु नाहीं । शेखीं न दिसे केवळ देहीं । माझारीं वासनेच्या ठायीं । देहाभिमानें पाहीं संसारु भासे ॥ ६० ॥ जागृतिदेहाचा विसरु पडे । सवेंचि स्वप्नदेह दुजें जोडे । तेणें मिथ्या प्रपंच वाढे । स्वप्नीं स्वप्न कुडें कदा न मने ॥ ६१ ॥ सुषुप्ती देहाचा असंभवो । तेथ नहीं बवभावो । जन्ममरण तेंही वावो । संसारसंभवो देहाभिमानें ॥ ६२ ॥ तेवीं आत्मतत्त्वाचा विसरू । तेणें मी देह हा अहंकारू । तेणें अहंकारें संसारू । अतिदुस्तरू थोरावे ॥ ६३ ॥ जेवीं मृगजळीं मिथा मासे । तेवीं ब्रह्मीं प्रपंचु नसे । तो निरसावया कैसें । साधनपिसें पिशाच ॥ ६४ ॥ दोनीच अक्षरें माया । जंव गेलों सांगावया । तंव श्लोकार्थ दुरी ठेला राया । वाढला वायां ग्रंथु सैरा ॥ ६५ ॥ माया पाहों जातां हर्षें । सज्ञानही झाले पिसे । नांवारूपाचिये भडसें । कल्पनावशें माया वाढे ॥ ६६ ॥ मायेचें मुख्य लक्षण । राया तुज मी सांगेन खूण । आपली कल्पना संपूर्ण । ते माया जाण नृपवर्या ॥ ६७ ॥ निजहृदयीची निजआशा । तेचि माया गा मुख्य क्षितीशा । जो सर्वथा नित्य निराशा । तों पूज्य जगदीशा पूर्णत्वें ॥ ६८ ॥ आतां कांहीं एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगोंउपलक्षणीं । सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणीं विभागे ॥ ६९ ॥ जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसतां त्याच्या ठायीं दिसे । जेव्हां कां निजकिरणवशें । अग्नि प्रकाशे सूर्यकांतीं ॥ ७० ॥ तेवीं शुद्धस्वरूपीं पाहीं । संकल्पमात्र कांहीं नाहीं । नसतचि दिसे ते ठायीं । ते जाण विदेही मूळमाया ॥ ७१ ॥ स्वरूप निर्विकल्प पूर्ण । तेथ मी म्हणावया म्हणतें कोण । ऐसेही ठायीं स्फुरे मीपण । ते मुख्यत्वें जाण मूळमाया ॥ ७२ ॥ तया मीपणाच्या पोटीं । म्हणे मजचि म्यां पहावें दिठीं । मजसीं म्यां सांगाव्या गोठी । अत्यादरें भेटी माझी मज होआवी ॥ ७३ ॥ मज माझी अतिप्रीती । माझी मज होआवी रती । माझ्याचि म्यां घेऊनि युक्ती । मज माझी प्राप्ति मद्बोधें व्हावी ॥ ७४ ॥ म्हणे मज मियां आलिंगावें । मज मियांचि संबोगावें । मज मियांचि संयोगावें । नियोगावें स्वामिसेवकत्वें सर्वदा ॥ ७५ ॥ ऐकें आजानुबाहो नृपनाथा । ऐसें आठवलें भगवंता । तो आठवो जाला स्रजिता । महाभूतां भौतिकां ॥ ७६ ॥ चारी वर्ण चारी खाणी । चारी युगें चारी वाणी । चारी पुरुषार्थ चहूं लक्षणीं । मुक्तीची मांडनी मांडली चतुर्धा ॥ ७७ ॥ उभारूनि तिन्ही गुण । आठवो रची त्रिभुवन । तेणें मांडूनि त्रिपुटीविंदान । कर्मही संपूर्ण त्रिधा केलें ॥ ७८ ॥ एवं एकपणीं बहुपण । रूपा आणी मूळींची आठवण । परी बहुपणीं एकपण । अखंडत्वें पूर्ण तें कदा न भंगे ७९ ॥ जीं जीं कुंभार भांडीं करी । आकाश सहजेंचि त्यांभीतरीं तेवीं महाभूतें भौतिकाकारीं । समन्वयें हरि सर्वदा सर्वीं ॥ ८० ॥ राया जाण येचि अर्थीं बोलिलें उपनिषदांप्रती । एकाकी न रमते या श्रुती । द्वैताची स्फुर्ति भगवंतीं स्फुरली ॥ ८१ ॥ किंबहुना एकपणें समस्तें । रूपा आलीं महाभूतें । तींचि हरीची माया येथें । जाण निश्चितें नृपनाथा ॥ ८२ ॥ भूत-भौतिक स्फुरे जे स्फूर्ती । ते प्रकाशूं न शके माया स्वशक्तीं । मायाप्रकाशकु चिन्मूर्ती । अखंडत्वें भूताकृतीं प्रवेशला भासे ॥ ८३ ॥ मुख्य मायेचें निजलक्षण । प्रकाशी परमात्मा चिद्घन । तोचि भूतीं भूतात्मा आपण । प्रवेशलेपण नसोनि दावी ॥ ८४ ॥ एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः । एकधा दशधात्मानं विभजन्जुषते गुणान् ॥ ४ ॥ ऐशीं स्रजिलीं भूतें महाभूतें । जीं जड मूढ अचेतें । त्यांसी वर्तावया व्यापारार्थें विभागी आपणातें तत्प्रवेशीं ॥ ८५ ॥ पंचधा पंचमहाभूतें । तें कार्यक्षम व्हावया येथें । पंचधा विभागें श्रीअनंतें । प्रविशिजे तेथें तें ऐक राया ॥ ८६ ॥ गंध रूपें पै पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥ ८७ ॥ पृत्वी प्रवेशला भगवंतु । यालागीन् ते आवरण-जळांतु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥ ८८ ॥ धरा दरी धराधर । यालागीं विरवूं न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणें वाहे ॥ ८९ ॥ स्वाद रूपें उदकांतें । प्रवेशोनि श्रीअनंतें । द्रवत्वें राहोनियां तेथें । जीवनें भूतें जीववी सदा ॥ ९० ॥ जीवनी प्रवेशे जगज्जिवन । याकारणें आवरण तेंचि जाण । न शोषितां उरे जीवन । हें लाघव पूर्ण हरीचें ॥ ९१ ॥ तेजाचे ठायीं रूप । प्रवेशला हरि सद्रूप । यालागीं नयनीं तेज अमूप । जठरीं देदीप्य जठराग्नि जाहला ॥ ९२ ॥ रूपयोगें लवलाहीं । हरि प्रवेशेतेजाच्या ठायीं । तें आवरण-वायूमाजीं पाहीं न मावळे कांहीं यालागीं राया ॥ ९३ ॥ वायूमाजीं स्पर्श योगें । प्रवेशु कीजे श्रीरंगें । यालागीं प्राणयोगें । वर्तती अंगें अनेक जीव ॥ ९४ ॥ वायूच्या ठायीं हृषीकेश । स्पर्शरूपें करी प्रवेश । यलागीं वायूचा ग्रास । सर्वथा आकाश करूं न शके ॥ ९५ ॥ शब्द गुणें हृषीकेश । आकाशीं करी प्रवेश । यालागीं भूतांसी अवकाश । सावकाश वर्तावया ॥ ९६ ॥ शब्दगुणें गगनीं प्रवेशला चक्रपाणी । यालागीं तें निजकरणीं । लीन होऊनि जाऊं न शके ॥ ९७ ॥ महाभूतीं निरंतर । स्वाभाविक नित्य वैर । येरांतें ग्रासावया येअर् । अतितत्पर सर्वदा ॥ ९८ ॥ जळ विरवूं पाहे पृथ्वीतें तेज शोषूं पाहे जळातें । वायु प्राशुं धांवे तेजातें । आकाश वायूतें गिळूं पाहे ॥ ९९ ॥ तेथ प्रवेशोनि श्रीधर । त्यांतें करोनियां निर्वैर । तेचि यरामाजीं येअर् । उल्हासें थोर नांदवी ॥ १०० ॥ एवं पंचभूतां साकारता । आकारली भूताकारता । तेथें जीवरूपें वर्तविता । जाहला पैं तत्त्वता प्रकृतियोगें ॥ १०१ ॥ त्यासी ब्रह्मांडीं पुरुष हें नांव । पिंडीं त्यातें म्हणती जीव । हा मायेच निजस्वभाव । प्रतिबिंबला देव जीवशिवरूपें ॥ १०२ ॥ शिवीं जे योगमाया विख्याती । जीवीं तीतें अविद्या म्हणती । हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती । स्वप्नस्थिती संसारू ॥ १०३ ॥ ज्यातेन् म्हणती दीर्घस्वप्न । तो हा मायावी संसार संपूर्ण । निद्रेमाजीं दिसे जें भान । तें जीवाचें स्वप्न अविद्यायोगें ॥ १०४ ॥ येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न । बोध जाहलिया मिथ्या भवभान । हें अवघें मायेचें विंदान । राया तूं जाण निश्चित ॥ १०५ ॥ आतां जीवाची विषयावस्था । विषयरसीं विषयभोक्ता । एकधा दशधा विभागता । आईक नृपनाथा सांगेन ॥ १०६ ॥ एकधा भागें अंतःकरण । स्वयेन् झाला जनार्दन । मन-बुद्धि-चित्त-अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभागें ॥ १०७ ॥ जीव आपुल्या परिपूर्णता । अहं म्हणे निजात्मता । तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥ १०८ ॥ अहंकारु वाढवितां देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विषयचिंता । तेचि चित्त तत्त्वतां महामाया ॥ १०९ ॥ देहअहंता अतिचपळ । तीतेंच म्हणती मन चंचळ । नाना संकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय-शोक-दुःख ॥ ११० ॥ देहअहंतेचे शहाणपण । तिये नांव गा बुद्धि जाण । ते बुद्दीनें निश्चय केला पूर्ण । आम्हा।जन्ममरण अनिवार ॥ १११ ॥ एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टय अवस्था । मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥ ११२ ॥ अहंकार धरी सोहंपण । तैं चित्तीं प्रगटे चैतन्यघन । तेव्हां मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं ॥ ११३ ॥ समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कैंचें मन । बुडे चित्तचें चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥ ११४ ॥ एकधा विभाग अंतःकरण । त्याची उणखूण निजलक्षण । राया सांगितलें संपूर्ण । आतां दशधा लक्षण तें ऐक ॥ ११५ ॥ दशधा इंद्रियें अचेतन । तयांतें चेतविता नारायण । दशधारूपें प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥ ११६ ॥ दृष्टीमाजी झाला देखणें । दृष्य प्रकाशी दृश्यपणें । ऐसेनि प्रकाशकपणें दृश्याभरणें दाखवी ॥ ११७ ॥ श्रवणीं झाला तो ऐकणें । शब्द प्रकाशी शब्दलक्षणें । मग अर्थावबोधकपणें शब्दविंदानें ऐकवी ॥ ११८ ॥ रसीं रसस्वादु नारायण । रसने तोचि रसस्वादन । यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजीं ॥ १९ ॥ सुमनीं श्रीहरी सुगंध । घ्राणी तोचि जाणे गंधावबोध । यापरी सुमनमकरंद । भोगवी गोविंद निजांगयोगें ॥ १२० ॥ शीत-उष्ण-मृदु-कठिण । स्पर्श प्रकाशिता नारायण । त्वचेमाजीं तोचि स्पर्शज्ञ । यपरी जगजीवन भोगवी स्पर्श ॥ १२१ ॥ वाचेचा वाचकु कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती । नाना शब्दार्थव्युत्पत्ति । वदवी निश्चितीं वाचाळपणें ॥ १२२ ॥ करांच्या ठायीं देती घेती । अकर्तेनि कतव्यशक्ती । चरणा आचरणें निगुती । गमनस्थिती गोविंदें ॥ १२३ ॥ उपस्थसुखाची सुखप्राप्ती । तेणें सुखें सुखावे श्रीपती । स्त्रीपुरुषमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिप्रीतीं पुरुषोत्तमु ॥ १२४ ॥ गुदचे ठायी जें का क्षरण । तेंही अक्षरें होय जाण । यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देहीं ॥ १२५ ॥ यापरी गा देहयोगें । विलासे विषयसंभोगें । भोग्य भोक्ता उभय घागें । प्रकाशूनि अंगें स्वयें भोगी ॥ १२६ ॥ जेवीं साळईच्या रुखा । साळईचि बीज देखा । साळईचि शाखोपशाखा । न विकारितां असका वृक्ष होये ॥ १२७ ॥ जेवीं कां ऊंस बीजीं पडे । तो बाहेर ऊंसपणेंचि वाढे । जरी भिन्न भिन्न कांडें चढे । तरी मगें पुढें रस एकु ॥ २८ ॥ तेवीं विषय आणि करणें । प्रकाशूनि एकपणें । मग विषयरस सेवणें । जीवपणें स्वयें सेवी ॥ २९ ॥ गुणैर्गुणान्स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः । मन्यमान इदं सृष्टमात्मानमिह सज्जते ॥ ५ ॥ इंद्रिया आणि विषयांसी । सहजें अंतर्यामी प्रकाशी । जीव सेवूनि त्या विषयांसी । पावे आसक्तीसी अहंभावें ॥ १३० ॥ म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचें पुरे कोड । तंव इंद्रियांची खवळे चाड । विषय वाड भोगावया ॥ १३१ ॥ इंद्रियां विषयांची आसक्ती । देहाभिमानें वाढे वृत्ती । मावळोनि मूळींची स्फूर्ती । मोहममतास्थिति दृढ वाढे ॥ १३२ ॥ मग मी म्हणे देहातें । देहसंबंधीं जें तें आप्तें । विषयांचिये लोलुपते । उसंतु चित्तें असेना ॥ १३३ ॥ प्रकृतिस्वभावें कर्म जाहलें । तें तें म्हणे म्यां केलें । देहअहंतेचें नाथिलें । काविरें चढलें अनिवार ॥ १३४ ॥ देहअहंता अतिउद्धट । तेथें मोहममता अतिदुर्घट । तेणें जन्ममरणांची वाट । घडघडाट प्रवाहे ॥ १३५ ॥ कर्माणि कर्मभिः कुर्वन्सनिमित्तानि देहभृत् । तत्तत्कर्मफलं गृह्णन्भ्रमतीह सुखेतरम् ॥ ६ ॥ मनीं धरोनि विषयकाम । कर्मेंद्रियीं करितां कर्म । तेथें निपजती धर्माधर्म । बाधक परम पुरुषातें ॥ १३६ ॥ कल्पिला फळभोग घडे । त्यासारिखें देह धरणें पडे । देहें देहाची खाणी उघडे । मरणही वाढे तैसेंचि ॥ ३७ ॥ फळाशा कर्म अतिदारुण । अमरां आणी अमित मरण । अजन्म्या अंगीं जन्म पूर्ण । पुनः पुनः जाण आदळती ॥ ३८ ॥ एवं स्वर्ग आणि संसारा । जन्ममरणांच्या येरझारा । नाना योनि अपारा । निजकर्मद्वारा स्वयेन् भोगी ॥ ३९ ॥ डोळे बांधोनि जुंपिला घाणा । तेलियाचा ढोरु जाणा । करकरीतु परिभ्रमणा । अविश्रम जाणा भोंवतसे ॥ १४० ॥ तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे । भोगूं जातां निजकर्मफळें । तंव जन्ममरणांचे सोहळे । भोगी आगळे अनिवार ॥ १४१ ॥ उदोअस्तांचेनि प्रमाणें । जैसें सूर्यासी पडे भंवणें । तैशीं हीं जनमरणें । अतिदारुणें स्वयें सोशी ॥ १४२ ॥ शिणशिणों जंव जन्म कंठी । सवेंच मरण ये त्यापाठीं । जैसीं जावळी फळें एक देठीं । तैशा जन्ममरणकोटी भोगी स्वयें ॥ १४३ ॥ इत्थं कर्मगतीर्गच्छन्बह्वभद्रवहाः पुमान् । आभूतसम्प्लवात्सर्ग प्रलयावश्नुतेऽवशः ॥ ७ ॥ ःओता पूर्णत्वें जो स्वतंत्र । तो झाला कर्मपरतंत्र । णानाकर्मगतिपात्र । दुःखसुखक्षेत्र सद वाहे ॥ १४४ ॥ ंआनोनि विषयांचें सुख । देखतदेखतां घेतलें विख । ट्याचें अगणित असुख । जन्मकोटी दुःख सोशितां न सरे ॥ १४५ ॥ डुःखावरी दुःखांचे आवर्त । मोहशोकांचे गर्तीं पडत । आतियातनेमाजीं बुडत । सदा उकडत काळाग्नीं ॥ १४६ ॥ आइसे सोशितां दुःख-शोक । पुढें अवचितां एकाएक । ंअहाप्र्ळयाचा भडका देख । निकट सन्मुख अंगी वाजे ॥ १४७ ॥ टेथें मागें न वचे काढिला पावो । पुढें निघावया नाहीं वावो । णिजकर्में बांधिला पहा वो । प्रळयाचा घावो मस्तकीं वाजे ॥ १४८ ॥ ऊत्पत्तिस्थितिप्रकरण । तुज सांगितलें संपूर्ण । षातां प्रळयाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ १४९ ॥ धातूपप्लव आसन्ने व्यक्तं द्रव्यगुणात्मकम् । अनादिनिधनः कालो ह्यव्यक्तायापकर्षति ॥ ८ ॥ सूर्योदयेंसीं दिवसस्थिती । लोटल्या अवश्य पावे राती । तेवीं झालिया उत्पत्तिस्थिती । प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे ॥ १५० ॥ एवं पावल्या प्रळयवेळु । खवळे अनादिनिधन काळु । तो महाभूतेंसीं भूगोळु । नाशर्थ प्रबळु प्रताप मंडी ॥ १५१ ॥ तेथ जें जें स्थूळाकारें व्यक्त । तें तें करूं लगे अव्यक्त । जेवीं पेरिलें पिकोनि शेत । स्वये वाळत उष्णकाळीं ॥ १५२ ॥ तृणादि नाना बीजें क्षितीं । स्वभावें वार्षिये विरूढती । तेचि शारदीये नानाव्यक्ती । सफळितें होती सुपुष्ट ॥ १५३ ॥ तेचि ग्रीष्माच्या अंतीं । फळमूळ मोडोनि व्यक्ती । बीजें लीन होती क्षितीं । कैशी काळगती संसारा ॥ १५४ ॥ जेवीं वसंताचे ऐलीकडी । वृक्षांसी होय पानझडी । तेवीं ब्रह्मादिकांची परवडी । काळ झोडी निजसत्ता ॥ १५५ ॥ जेवीं कां वळलिया शेत । कृषीवळु मळुं लागे समस्त । तेवीं व्यक्ताचें अव्यक्त । काळ त्वरित करूं लागे ॥ १५६ ॥ तेच अव्यक्त करिती स्थिती । राया सांगेन तुजप्रती । काळाची क्षोभक शक्ती । प्रळयाचे प्राप्तीपूर्वीं पावे ॥ १५७ ॥ शतवर्षा ह्यनावृष्टिर्भविष्यत्युल्बणा भुवि । तत्कालोपचितोष्णार्को लोकांस्त्रीन्प्रतपिष्यति ॥ ९ ॥ काळक्षोभाचिये दृष्टि । शतवर्षें अनावृष्टी । तेणें अत्युल्बणें आटे सृष्टी । पृथ्वीच्या पोटीं कांही नुरे ॥ १५८ ॥ प्राणिमात्र निमाले देख । वनें वाळूनि जाहली रख । बिंदुमात्र न मिळे उदक । यापरी लोक आटिले काळे ॥ १५९ ॥ तंव द्वादिशादित्यमेळा । मंडळीं झाला एकवेळां । तेथींच्या किरणीं प्रबळा । त्रैलोक्य सकळा संतप्त केलें ॥ १६० ॥ येती उष्णाचिया आह्या । होती पर्वतांच्या लाह्या । तेणें धरातळ लवलाह्या । भस्म झलें राया महउष्णें ॥ १६१ ॥ पातालतलमारभ्य सङ्कर्षणमुखानलः । दहन्नूर्ध्वशिखो विष्वग्वर्धते वायुनेरितः ॥ १० ॥ उष्णॆं तापले पृथ्वीतळ । पोळलें शेषफळामंडळ । तैं सहस्रमुखें विषानळ । अग्निकल्लोळ वमिता झाला ॥ १६२ ॥ पाताळतळींहूनि देखा । ऊर्ध्वमुख अग्निशिखा । जाळितचि तिहीं लोकां । उठिला घडका अनिवार ॥ १६३ ॥ क्षोभें दिधला फूत्कारा । सहस्रमुखें सुटला वारा । तो साह्य झाला त्या वैश्वानरा । जाळीत दिगंतरा वाढला वणवा ॥ १६४ ॥ संवर्तको मेघगणो वर्षति स्म शतं समाः । धाराभिर्हस्तिहस्ताभिर्लीयते सलिले विराट् ॥ ११ ॥ स्वर्ग आणि पाताळतळा । कवळूनि उठिल्या अग्निज्वाळा । तंव प्रळयकर्त्या मेघमाळा । क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥ १६५ ॥ म्हणाल तेथ मोठमोठे । वर्षों लागले थेंबुटे । तैसें नव्हे गा कडकडाटें । एकी धार सुटे अनिवार ॥ १६६ ॥ इतर पर्जन्याच्या धारा । त्य तैशा नव्हती नृपवरा । ऐक प्रमाणाच्या निर्धारा । तो समयो महावीरा अतिदुस्तर ॥ १६७ ॥ जैशी कां मदगजाची सोंड । तैशा धारा अतिप्रचंड । शत वर्षेंवरी अखण्ड । पर्जन्य वितंड पैं वर्षें ॥ १६८ ॥ विजु निजतेजें नभ जाळी । कडकडाटे दे आरोळी । काळाची बैसे दांखिळी । ऐसा प्रलयकाळीं मेघ खवळे ॥ १६९ ॥ तेणें उलथलें जळ सैंघ । जेथोनि वर्षत होते मेघ । त्यांतेंही विरवूनि सांग । जळमय चांग त्रिलोक्य झालें ॥ १७० ॥ अनिवार वर्षतां वेग । जेथें मेघांचेंही विरे आंग । य नांव सांवर्तक मेघ । अतिअमोघ वर्षावो ॥ १७१ ॥ तीर्थ क्षेत्र पवित्रोदक । सरिता समुद्र झाले एक । हारपले चंद्रसूर्यादिक । तिनी लोक बुडाले ॥ १७२ ॥ ऐशिया एकार्णवाचे ठायीं । विराट विराला गा पाहीं । साकार उरे ऐसें कांहीं उरलें माहीं नृपनाथा ॥ १७३ ॥ ततो विराजमुत्सृज्य् वैराजः पुरुषो नृप । अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिन्धन इवानलः ॥ १२ ॥ प्रळयकाळीं अतिगहिंसु । अगाध उसळे जलोल्हासु । स्थूळाचा करितां नशु । विरे निःशेषु विराटु ॥ १७४ ॥ विराटाच वैराज पुरुषु । तो अव्यक्तीं करी प्रवेशु । जेवीं इंधननाशें हुताशु । करी रहिवासु निजकरणीं ॥ १७५ ॥ जें ब्रह्मलोकनिवासी होती । त्यांसी महाप्रळयाचे अंतीं । ब्रह्मयसवें सर्वांसी क्रममुक्ती । ऐसें स्मॄ-श्रुतींचें दृढ वाक्य ॥ १७६ ॥ वैराजपुरुष नाम वदंती । हिरण्यगर्भतें म्हणती । त्यासी प्रळयीं प्रवेशु अव्यक्तीं । तैं इतरांची गति श्रुतिवाक्यें कैसी ॥ १७७ ॥ विदेहें पुशिली मायेची स्थिती । ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती । जे न करिती भगवद्भक्ती । त्यां ब्रह्म्यासवें मुक्तीं घडों नेदी ॥ १७८ ॥ जालिया ब्रह्मसदनप्राप्ती । नकरितां भगवद्भक्ती । अतिशयें दुर्लभ मुक्ती । भक्तीपाशीं मुक्ती दासी जैशी ॥ १७९ ॥ न करितां भगवद्भजन । ब्रह्म्यासीही मुक्ति नव्हे जाण । मा इतरांचा ज्ञानाभिमान । पुसे कोण परमार्थीं ॥ १८० ॥ ज्यासी जेथ पदाभिमान । त्यासी तेंचि दृढबंधन । यलागीं दुर्लभपण । मोक्षासी जाण तिहीं लोकीं ॥ १८१ ॥ सांडोनियां पदाभिमान । अंगें सदाशिवु आपण । नित्य वसवी महाश्मशान । भगवद्भजनीं निजनिष्ठा ॥ १८२ ॥ यलागीं ज्यांसी ब्रह्मलोकप्राप्ती । तेथही जे करिती भगवद्भक्ती । त्यांसीच प्रळयाच्या अंतीं । परममुक्ती नृपवर्या ॥ १८३ ॥ ब्रह्मलोकीं ज्यां नाहीं हरिभक्ती । तेही पावती पुनरावृत्ती । ऐशी मयेची दुर्धर शक्ती । न करितां भक्ती मुक्ति कैंची ॥ १८४ ॥ अर्थीं ब्रह्म्याचें वचन । दों श्लोकीं बोलिला आपण । ज्ञानाभिमानियां पतन । भक्तां भवबंधन कदा न बधी ॥ १८५ ॥ [ ब्रह्मादिकृतगर्भस्तुतिश्लोकौ ] येऽयेऽरविन्दाक्ष व्विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादबिशुद्धबुद्धयः । आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः ॥ ३२ ॥ तथा न ते माधव तावकाः चिद्भ्रश्यन्ति मार्गात्त्वयि बद्धसौहृदाः । त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभो ॥ ३३ ॥ [ भा द स्क पू अ २ ] न करितां भगवद्भक्ती । सज्ञानाही नातुडे मुक्ती । तेचि अर्थींच्या दृष्टांतीं ब्रह्म्याची उक्ती दाविली येथें ॥ १८६ ॥ जन्मामाजी ब्रह्माणपण । तेही वेदशास्त्रसंपन्न । न करितां भगवद्भजन । अचूक पतन तयांसी ॥ १८७ ॥ भक्तां सर्वभूतीं भगवद्भावो । तेथ विघ्नांसी नाहीं ठावो । तयां अपावचि होय उपावो । भावार्था देवो सदा साह्य ॥ १८८ ॥ भक्तीवीण मुक्तीचा सोसु । करितां प्रयत्न पडे वोसु । असो हें वैराजपुरुषु करी प्रवेशु अव्यक्तीं ॥ १८९ ॥ अव्यक्तीं वैराजाचा प्रवेशु । होतांचि महाभूतविलासु । हों लागे भूतां र्हासु । तो अनुप्रवेशु ऐक राया ॥ १९० ॥ वायुना हृतगन्धा भूः सलिलत्वाय कल्पते । सलिलं तद्धृतरसं ज्योतिष्ट्वायोपकल्पते ॥ १३ ॥ हृतरूपं तु तमसा वायौ ज्योतिः प्रलीयते । हृतस्पर्शोऽवकाशेन वायुर्नभसि लीयते ॥ १४ ॥ प्रळयवायूचा क्षोभक क्रोधु । तेणें पृथ्वीचा हरिला गंधु । तंव तेही विरोनियां प्रसिद्धु । एकवदु जळ जाहलें ॥ १९१ ॥ क्षोभला वायु असमसाहस । तो हरी जळचा जळरस । तेव्हां जळाचा होतसे र्हास । सावकाश् प्रळयमहातेनीं ॥ १९२ ॥ त्या तेजाचा निजसंभ्रम । वयुबळें ग्रासीत तम । तेव्हां प्रळयवायु परम । भरोनि व्योम कोंदाटे ॥ १९३ ॥ त्या प्रळयवायूचा स्पर्श । चपळतेसी सर्व ग्रास । करूनि ठके अवकाश । तेव्हां वायूतें आकाश निःशेष ग्रासी ॥ १९४ ॥ कालात्मना हृतगुणं नभ आत्मनि लीयते । इन्द्रियाणि मनो बुद्धिः सह वैकारिकैर्नृप । प्रविशन्ति ह्यहङ्कारं स्वगुणैरहमात्मनि ॥ १५ ॥ आकाशाच जो शब्दगुण । तो प्रळयकाळु गिळी । संपूर्ण । तंव क्षभला तामसाभिमान । तो करी प्राशन गगनाचें ॥ १९५ ॥ दश इंद्रियांचा गोंदळा । राजसाभिमानीं रिघाला । चित्तचतुष्टयाचा मेळा । तोही प्रवेशला सात्त्विकाभिमानीं ॥ १९६ ॥ इंद्रियअधिष्ठात्रीं दैवतें । तीहीं मिळोनियां समस्तें । प्रवेशलीं सात्त्विकातें । जाण निश्चितें नृपनाथा ॥ १९७ ॥ ते तिनी अहंकार त्रिगुणेंसीं । प्रवेशती महतत्त्वासीं । महत्तत्त्व मिळे मायेसी । जेवीं कन्या संततीसीं माहेरा ये ॥ १९८ ॥ जेवीं कुकडीचीं पिलीं । कुकडी पांखांतळी घाली । मग ते स्वयें दिसे एकली ॥ तेवीं माया उरली कल्पांतीं ॥ १९९ ॥ एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । त्रिविध भागें दाविली येथ ॥ ते गुणमयी माया निश्चित । मिथ्याभूत आभासे ॥ २०० ॥ जेवीं लेंकुरें खेळतां खेळासी । दिवसा म्हणती जाहली निशी । तेवींचि पूर्णस्वरूपापाशीं । देखती मायेसी त्रिविध कल्पता ॥ २०१ ॥ एषा माया भगवतः सर्गस्थित्यन्तकारिणी । त्रिवर्णा वर्णितास्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १६ ॥ उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन । त्रिविध कर्में तीन गुण । हें जाण विंदान मायेचें ॥ २०२ ॥ ध्येय ध्याता ध्यान । पूज्य पूजक पूजन । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची ॥ २०३ ॥ दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । भोग्य भोक्ता भोजन । हे त्रिपुटी पूर्ण मायेची ॥ २०४ ॥ शब्द श्रोता आणि श्रवण । घ्रेय घ्राता आणि घ्राण । रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥ २०५ ॥ कर क्रिया आणि कर्ता । चरण चाल चालता । बोल बोलणें बोलता । हे त्रिविधावश्ता मायेची ॥ २०६ ॥ अहं सोहं जडमूढता । साधक साधन साच्यता । देवी देवो परिवारदेवता । हेही त्रिविधता मायेची ॥ २०७ ॥ देह देही देहाभिमान । भव भय भवबंधन । मुक्त मुमुक्षु अज्ञान । हेंही विंदान मायेचें ॥ २०८ ॥ सुख दुःख जडत्व पूर्ण । आधी समाधी व्युत्थान । उत्पत्ति स्थिति निधन । इंहीं लक्षणीं संपूर्ण माया विलसे ॥ २०९ ॥ नभी निळिमा पूर्ण भासे । शेखी निळिमेचा लेशही नसे । तेवीं स्वरूपीं माया आभासे । मिथ्यावेशें मायिक ॥ २१० ॥ जेवीं प्रत्यक्ष दिसे मृगजळ । परी तें निधाघचि केवळ । तेवीं स्वरूपीं माया प्रबळ । मूळीं निर्मूळ आभासे ॥ २११ ॥ हे मिथ्या माया कल्पनावशें । प्रबळ बळें भासली दिसे । नासूं जातां नाशिजे ऐसें । सत्यत्वें नसे निजांग ॥ २१२ ॥ नांवरूपाचिया भडसें । ब्रह्मादिक केले पिसे । मिथ्या त्रिपुटीविन्यासें । ज्या बंधिलें दिसे त्रिलोक्य ॥ २१३ ॥ जेवीं रूपासवें दिसे छाया । नाशितां नातुडे नाशावया । तेवीं स्वरूपीं मिथ्या माया । अतिदुर्जया देवांसी ॥ २१४ ॥ जेवीं देहासवें मिथ्या छाया । तेवीं ब्रह्मीं मिथ्या माया । कल्पनायोगें वाढली वायां । यालगी अजया वेदशास्त्रें म्हणती ॥ २१५ ॥ राया कल्पना वाढे जे ठायीं । तेंचि मायेचें दृढ मूळ पाहीं । जो निर्विकल्प निजदेहीं । त्यासी माया नाहीं तिहीं लोकीं ॥ २१६ ॥ कल्पिती कल्पना जे राया । तेचि जाण मुख्य माया । आणीक रूपकें सांगावया । नातुडे माया निरूपणीं । २१७ ॥ तेचि त्रिविध मुख्यलक्षणीं । माया सांगितली विवंचोनी । आतां कोण्या अर्थींचेश्रवणीं । अत्यादरु मनीं वर्ते राया ॥ २१८ ॥ माया दुस्तर दारुण । ऐकूनि ऋत्विज ब्रह्मण । थरारले सभाजन । राजाही पूर्ण विस्मित जाहला ॥ २१९ ॥ नवल मायेचे रूपक । नाशूं न शकतीच ज्ञाते लोक । जिया गोंविले ब्रह्मादिक । इतरांचा देख पाडु कोण ॥ २२० ॥ माया आक्रमूनि शिवासी । तोही आणिला जीवत्वासी । ते माया तरवे दीनासी । तो उपावो यासी पुसों पां ॥ २२१ ॥ सुखोपायें दीन जन । दुस्तर माया तरती पूर्ण । तदर्थीं राजा आपण । अत्यादरें प्रश्न श्रद्धेनें पुसे ॥ २२२ ॥ श्रीराजोवाच । यथैतामैश्वरीं मायां दुस्तरामकृतात्मभिः । तरन्त्यञ्जः स्थूलधियो महर्ष इदमुच्यताम् ॥ १७ ॥ अतिदुस्तर हरीची माया । आइकोनि हांसें आले राया । लटकीच परी देहाभिमानियां । बाधावया दृढ जाहली ॥ २२३ ॥ माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथ बाळेभोळे स्थूळबुद्धी । सुखें तरती कोणे विधीं । तो सांग त्रिशुद्दी उपावो ॥ २२४ ॥ ज्यासी वश्य नाही निजमन । आणि भवाब्धि तरावया भाव पूर्ण । ऐसे भोळे भाविक जन । त्यांसी मायातरण सुगम सांगा ॥ २२५ ॥ मागां कवि बोलिला संकलितीं । तन्माययाऽतो बुध आभजेति । गुरु-ब्रह्म अभेदस्थिती । करितां भक्ती माया तरिजे ॥ २२६ ॥ तें भक्तीचें स्पष्ट लक्षण । विशद होआवया श्रवण । पुढती मायेचें तरण । पुसावया कारण मुख्य हेंचि ॥ २२७ ॥ तो मायातरणोपायविधी । सुगम सांगावया त्रिशुद्धी । अंतरिक्षाधाकुटा सुबुद्धी । प्रबुद्ध प्रज्ञानिधी बोलता जाहला ॥ २२८ ॥ श्रीप्रबुद्ध उवाच । कर्माण्यारभमाणानां दुःखहत्यै सुखाय च । पश्येत्पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम् ॥ १८ ॥ मुख्य मायेचें तरण । प्रबुद्धचिजाणे पूर्ण । प्रबुद्ध जाहलिया आपण । मायेचें विंदान न तरतां तरती ॥ २२९ ॥ मनीं विषयाचा छंदु । तो केवळ महाबाधु । विषयत्यागी तो प्रबुद्धु । तोचि विशदु भावो आइका ॥ २३० ॥ विषयीं लोभलें अत्यंत मन । तेथ नव्हतां वैराग्य पूर्ण । कदा नव्हे मायेचें तरण । वैराग्यार्थ जाण विषय निंदी ॥ २३१ ॥ केवळ नश्वर विषय देख । तेंचि मानिती परम सुख । तें सुखचि दुःखदायक । स्त्रीकामें मुख्य माया बाधे ॥ २३२ ॥ वेंचुनि धनाचिया गांठी । सुखार्थीं स्त्री वैसविली पाटीं । तेचि भोगवी दुःखकोटी । जगीं माया लाठी स्त्रीकामें ॥ २३३ ॥ स्त्रीकामें प्रपंचु सबळ । स्त्रीकामें दुःख प्रबळ । स्त्रीकामें मायेसी बळ । स्त्रीकामें मोहिलें जग ॥ २३४ ॥ आवडीं स्त्री बैसवितां पाटीं । ते प्रपंचाच्या वाढवी कोटी । महामोहाच्या पाडूनि गांठी । दुःखसागरीं लोटी स्त्रीकामु ॥ २३५ ॥ जे नवमास वाहे उदरांत । ते माता करूनि अनाप्त । स्त्रियेसी मानिती अतिआप्त । ऐशी माया समर्थ स्त्रीकामें ॥ २३६ ॥ जे तोंडींचें पोटींचें खाववित । जे सदा सोशी नरकमूत । ते मातेहूनि स्त्री आप्त । जाहली जगांत मायामोहें ॥ २३७ ॥ स्त्रिया मेळवितां असंख्य मिळती । परी माता न मिळे त्रिजगतीं । ऐसें जे सज्ञान जाणती । तेही आप्त मानिती स्त्रियेतें ॥ २३८ ॥ मातेतें भजतां भुक्तिमुक्ती । स्त्रियेतें भजतां नरकप्राप्ती । ऐसें जे शास्त्रज्ञ जाणती । तेही मता उपेक्षिती स्त्रीकामें ॥ २३९ ॥ एवं स्त्रीकामाचिया व्याप्ती । माया व्यापिली त्रिजगतीं । सज्ञानही पाडले भ्रांतीं । स्त्रीकामसक्ती महामाया ॥ २४० ॥ मानूनि विषयांचे सुख । काम्य कर्म करितां देख । तेणें अतिदुःखी होती लोक । दुःखदयक काम्य कर्म ॥ २४१ ॥ कामिनीकामें गृहासक्ती । प्राणी प्राणांतें स्वयें शिणविती । त्या श्रमाची निदानस्थिती । सांगेन तुजप्रती राजाधिराजा ॥ २४२ ॥ निर्मळ जळें भिंती धुतां । जळाचीच नासे निर्मळता । हात माखती धुतले म्हणतां । भिंतीही तत्त्वतां निदळ केली ॥ २४३ ॥ तेवीं विषयांचेनि सुखें सुख । न पावतीच ब्रह्मादिक । विषयाचा जे मानिती हरिख । ते परममूर्ख पशुदेही ॥ २४४ ॥ नित्यार्तिदेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना । गृहापत्याप्तपशुभिः का प्रीतिः साधितैश्चलैः ॥ १९ ॥ तरिदिवसु निजनिकटें । मर्णेंसीं घेतां झटें । कवडीची प्राप्ती न भेटे । प्राणांतकष्टें द्रव्य जोडे ॥ २४५ ॥ एवं कष्टलें जोडलें धन । तें महादुःखाचें जन्मस्थान । अर्थ अनर्थाचें अधिष्ठान । निजात्ममरण निजमूळ ॥ २४६ ॥ द्रव्य नातां उपायें शिणवी । जाहलिया संरक्षणीं आधी लावी । रात्रिदिवस हृद्रोग जीवीं । अविश्वासें नांदवीं धनलोभु ॥ २४७ ॥ मायाबापांशीं चोरी करवी । स्त्रीपुरुषांसी कलहो लावी । सुहृदांतें दूरी दुरावी । हे द्रव्याची पदवी स्वाभाविक ॥ २४८ ॥ द्रव्यपाशीं आधिव्याधी । द्रव्यापाशीं दुष्ट बुद्धी । द्रव्यापाशीं सलोभ क्रोधीं । असत्य निरवधी द्रव्यापाशीं ॥ २४९ ॥ द्रव्यापाशीं अतिविकल्प । द्रव्यापाशीं वसे पाप । द्रव्यापाशीं अतिसंताप । पूर्ण दुःखरूप ते द्रव्य ॥ २५० ॥ हें दानें त्यागितां फळ गोमटें लोभियां नरका ने हटॆंतटें । द्रव्याऐसे गा वोखटें । आन न भेटे तिहीं लोकीं ॥ २५१ ॥ नळिया चणियांचे आशा । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा । तेवीं द्रव्यदाराभिलाषा । नरदेहदशा अधःपातीं ॥ २५२ ॥ द्रव्य सहसा न मिळे पाहीं मिळेतरी अनीति अपायीं । यालागीं द्रव्याच्या ठायीं । सुख नाहीं त्रिशुद्धी ॥ २५३ ॥ धन वेचोनि फाडोवाडें । घर करिती वाडेंकोडें । तें अध्रुवत्वें सवेंचि पडे । थितें द्रव्य बुडे आयुष्येंसीं ॥ २५४ ॥ करूनि आयुष्याचा मातेरा । मुद्दलसिंचने जोडिलें पुत्रा । त्या पुत्राच्या मरणद्वारा । दुःखदुर्धरामाजीं बुडती ॥ २५५ ॥ प्रपंचींचे सुहृद समस्त । जंव स्वार्थ तंव होती आप्त । स्वार्थविरोधें तें अनाप्त । होऊनि घात सुहृदां करिती ॥ २५६ ॥ करोनिया अतिहव्यासु । मेळविती नाना पशु । त्यांचा सवेंचि होय नाशु । तेणें दुःखें त्रासु गृहस्थांसी ॥ २५७ ॥ निजदेहोचि नश्वर येथ । त्यासि प्रपंच नव्हे गा शाश्वत । अवघें जगचि काळग्रस्त । इहलोकीं समस्त ठकिले विषयीं ॥ २५८ ॥ मनुष्यदेहो कर्मभूमीं प्राप्त । तो लोक म्हणती कर्मजित । हा जैसा नश्वर येथ । तैसाच निश्चित नश्वर स्वर्गु ॥ २५९ ॥ एवं लोकं परम्विद्यान्नश्वरं कर्मनिर्मितम् । सतुल्यातिशयध्वंसं यथा मण्डलवर्तिनाम् ॥ २० ॥ मनीं धरोनी विषयभोग । इहलोकीं करिती याग । पुण्य जोडोनियां साङ्ग । पावती स्वर्गनिजपुण्ययोगें ॥ २६० ॥ स्वर्गासुखा इंद्र अधिपती । तोही पतनार्थ धाके चित्तीं । विघ्नें सूची तापसांप्रती । स्वर्गस्थिति अपायी ॥ २६१ ॥ यापरी निजपुण्यें स्वर्गप्राप्ती । त्या लोकातें पुण्यजित म्हणती ॥ तेही पुण्यक्षयें क्षया जाती । तेणें धाकें धाकती स्वर्गस्थ श्तेष्ठ ॥ २६२ ॥ गांठीं पुण्य असतां चोख । स्वर्गभोगीं असेल सुख । हेही वार्ता समूळ लटिक । स्वर्गींचें दुःख ऐक राया ॥ २६३ ॥ समान पुण्यें समपदप्राप्ती । त्यांसी स्पर्धकलहो करिती । आपणाहूनि ज्यां अधिक स्थिति । त्यांचा द्वेष चित्तीं अहर्निशी ॥ २६४ ॥ जैसे राजे मंडळवर्ती । राज्यलोभें । कलहो करिती । तैशी स्वर्गस्थां कलहस्थिती । देवेषें होती अतिदुःखी ॥ २६५ ॥ पतनभयें कलह-द्वेष वोढी । क्षयतें पावे पुण्यजोडी । अधोमुख पडती बुडीं । यज्ञिकें बापुडीं चरफडती ॥ २६६ ॥ एवं स्वर्गसुखउल्हसु । मानिती ते केवळ पशु । प्रत्यक्ष तेथ द्वेष नाशु । असहसाहसु नित्य कलहो ॥ २६७ ॥ सेविलाचि विषयो नित्य सेविती । परी कदा नव्हे मानसीं तृप्ती । तरी मिथ्या म्हणौनि नेणती । हेमोहक शक्ती मायेची ॥ २६८ ॥ जैसें वेश्येचें सुख साजणें । वित्त घेऊनि वोसंडणें । तेवीं विषयाचा संगु धरणें । तंव तंव होणें अतिदुःखी ॥ २६९ ॥ यालागीं उभयभोगुउपाया । जे जे प्रवर्तले गा राया । ते ते जाण ठकिले माया । थितें गेलें वायां उत्तम अयुष्य ॥ २७० ॥ कर्मभूमीं नरदेह प्राप्त । हें पूर्ण निजभाग्याचें मथित । देव नरदेह वांछित । ते देव केले व्यर्थ विषयार्थीं ॥ २७१ ॥ एवं विषयाची आसक्ती । माया ठकिले नेणों किती । यालागीं विषयाचे विरक्ती । करावी गुरुभक्ती तेंचि सांगों ॥ २७२ ॥ तस्माद्गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् । शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम् ॥ २१ ॥ जाणोनि विषयांचे नश्वरपण । पावावयालागीं ब्रह्म पूर्ण । सद्गुरुसी अनन्यशरण । रिघावें संपूर्ण श्रद्धायुक्त ॥ २७३ ॥ सद्गुरुवचनमात्रें माया । तरेन हा निश्चयो राया । येणें सद्भावें लागतो पायां । पावावया निजस्वार्तु ॥ २७४ ॥ गुरु ऐसें जे म्हणणें । तेंही आहे बहुसालपणें । ऐक राया तीं लक्षणें । तुज कारणें सांगेन ॥ २७५ ॥ एक वेदाध्ययन गुरु । एक व्याख्यानदानीं उदारु । एक ज्योतीषज्ञानीं गंभीरु । परी तो सद्गुरु न म्हणती ज्ञाते ॥ २७६ ॥ एक आगमोक्त मंत्र उपसिती । जप करावा विधानयुक्ती । मग कैं होईल निजप्राप्ती । हें नकळे निश्चितीं गुरुशिष्यां ॥ २७७ ॥ एक वयुधारणा लाविती । एक नाना ल लक्ष्यें दाविती । एक हठयोगें गोंविती । एक वैसविती महामुदा ॥ २७८ ॥ एक ब्रह्मानुवादें चोखटु । तत्त्वनिरूपणीं उद्भटु । वैरग्यबोलिका वरिष्ठु । उपजवी विटु उभयभोगंचा ॥ २७९ ॥ कैसें निरूपी शुद्ध ब्रह्म । ऐकोनि सात्त्विकं येत प्रेम । परी निजहृदयींचा भ्रम । निरसे तें वर्म नेणेचि ॥ २८० ॥ जेवीं गूळ-उसांचा घाणा । तोंडींचा रसु भरे भाणा । शब्दचोपटें भरोनि वदना । करी परिभ्रमणा करकरितु ॥ २८१ ॥ ऐसा जो कां शब्दज्ञानी । उत्तम व्यख्याता ज्ञानगुणीं । तो जन रंजवी निरूपणीं । स्वयें कोरडेपणीं करकरितु ॥ २८२ ॥ योगक्ष्म चाले गोमटा । लौकिकीं थोर प्रतिष्ठा । तेथें निजप्राप्तीची उत्कंठा । न वचे वरिष्ठा शिष्यांची ॥ २८३ ॥ जेवीं अमृत म्हणतां । चवी न लभे गा सर्वथा । तेवीं शाब्दिक ज्ञानयोग्यता । अनुभववार्ता स्वयें नुपजे ॥ २८४ ॥ जेणें स्वयें चाखिली नाहीं चवी । तो दुजयातें गोडी केवीं लावी । यालागीं जो पूर्णानुभवी । तो तारी सद्भावें सच्छिष्यसी ॥ २८५ ॥ एवं गुरुपणाची वदंती । असे बहुपणें नांदती । जो करी अपरोक्षप्राप्ती । त्यातें म्हणती सद्गुरुस्वामी ॥ २८६ ॥ ज्याचेनि वाक्यें असंतता । निःशेष मावळे तत्त्वतां । त्यासीचि गा सद्गुरुता । वेदशास्त्रार्थां प्रतिपाद्य ॥ २८७ ॥ जे उपदेशिती मंत्रतंत्र । तेही पूज्यत्वें अतिसधर । जेथें नुरे पूज्यपूजकताविचार । तोचि साचार सद्गुरुस्वामी ॥ २८८ ॥ एकातें ब्रह्मज्ञान । वस्तु देखोनि विरालें मन । मावळले द्वैताचें भान । पडिलें मौन चहूं वाचां ॥ २८९ ॥ इंद्रियें टंवकारिलीं समस्त । प्राण पांगुळला जेथींचा तेथ । वस्तु देखोनियां परमाद्भुत । पडलें ताटस्त्य्ह देहभावा ॥ २९० ॥ ऐसा जो आत्मानुभवी । त्यातें सद्भावें शिष्यु विनवी । तंव तो पुसे ना समजावी । ताटस्त्यभावीं अबोलपणा ॥ २९१ ॥ एका अनुभवा आलें ब्रह्म । फिटला बाध्यबाधकतेचा भ्रम । मोडलें द्वैतभावाचें कर्म । जगीं विषम असेना ॥ २९२ ॥ परी अचुंबित वर्तणें । अघटमान कर्म करणें । अत्यंत उग्रता निरवणें । दुर्धरपणें भयानकु ॥ २९३ ॥ आपण आपणियामाजी हंसत । ध्वनितें बोले परमार्थ । तेथें बोधेन शिष्याचें चित्त । पडे दुश्चित ते ठयीं ॥ २९४ ॥ ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी । त्याची ब्रह्मस्थिती न मने जनीं । मा कोण जाईल भाव धरोनि । बोधालागोनी त्यापाशीं ॥ २९५ ॥ आतां सद्गुरुचीं जीं निजलक्षणें । राया संगेन तुजकारणें । जें ऐकतां अंतःकरणें । सुखी होणें सद्भावें ॥ २९६ ॥ तरी जो कायावाचामनें । अतिकृपाळू दीनाकारणें । तोडी शिष्याचीं भवबंधनें । उठवी ठाणें अहंकाराचें ॥ २९७ ॥ ज्याचा जैसा जैसा भावो । तैसा तैसा करी अनुभवो । तरी गुरुत्वाचा अहंभावो । अणुमात्र पहा हो धरीना ॥ २९९ ॥ शिष्यपासूनि सेवा घेणें । हें स्वप्नींही न स्मरे मनें । शिष्याची सेवा स्वयें करणें । पूज्यत्वें पाहणें निजशिष्यां ॥ ३०० ॥ शिष्य देखावा पुत्रासमान । हें स्मृतिवक्य असे प्रमाण । दृष्टीं देखो नेणें गौण । शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वें ॥ ३०१ ॥ शिष्या सेवा करी निजभावार्थें । परी तो सेवक न म्हणे त्यातें । ज्यासी भगवद्रूप सर्व भूतें । शिष्य वेगळा तेथें सेवकत्वें नुरे ॥ ३०२ ॥ ऐसा मी एक महायोगी । हेंही न मिरवी ति जगीं । गुरुत्वाचा ताठा अंगीं सर्वथा शिगीं लागों नेदी ॥ ३०३ ॥ आपुल्या योगक्षेमाचें सांकडें । स्वप्नींही न घाली शिष्याकडे । शिष्य संकट अतिगाढें । निवारी रोकडें निजांगें जो ॥ ३०४ ॥ मी एक अकर्ता निजात्मयोगी । म्हौनि विषयांतें न भोगी । अथवा विषयो निःशेष त्यागी । हाही आग्रहो अंगीं असेना ॥ ३०५ ॥ तो विषय भोगी ना स्वयें त्यागी । तो अदृष्टाच्या निजविभागीं । लावूनियां देहाच्या अंगीं । परब्रह्मयोगीं विचरत ॥ ३०६ ॥ देह दैवें पालखीमाजीं चढे । अथवा विष्ठेमाजीं पडे । तें दोहींचें सुखदुःख त्याकडे । मी म्हणौनि पुढें कदा न रिघे ॥ ३०७ ॥ देहीं असोनि नाहीं अहंकृती । गेहीं असोनि नाहीं गृहासक्ती । शेखीं लोकांमाजीं लौकिकस्थिती । सुखें वर्तती लोकांसरिसें ॥ ३०८ ॥ त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता । शिष्य म्हणती गुरु तत्त्वतां । तो त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्तें ॥ ३०९ ॥ ऐशिया पूर्णप्रतीती । आचरोनि दावी भक्ती । हरि भजावा सर्वां भूतीं हेंच शिष्यांप्रती उपदेशी ॥ ३१० ॥ हीं सद्गुरुचीं निजलक्षणें । पंडितां न कळती ज्ञुआतेपणें । पूर्णानुभवी जाणती खुणे । इतरांचें जाणणें पांगुळे तेथ ॥ ३११ ॥ त्याचे गुरुत्वाची वोळखण । अंगीं निजशांति पूर्ण । हेंचि सद्गुरुत्वाचें लक्षण । मुख्य भूषण हेंचि राया ॥ ३१२ ॥ जगीं शांति जाली परदेशी । कोठेंही ठावो न मिळे तिशीं । ते आली सद्गुरुपायांपाशीं । सुखवासासी वसावया ॥ ३१३ ॥ यापरी स्सद्गुरुपाशीं शांती । स्वयें आली सुखवासवस्ती । जेवीं कां माहेराआंतौती । स्वानंदें क्रीडती कन्या जैशी ॥ ३१४ ॥ जाणोनि वेदशास्त्र निश्चितीं । जो न मिरवी गा व्युत्पत्ती । ज्यासी अपरोक्षें पूर्ण शांती । तो सद्गुरुमूर्ति निश्चयें राया ॥ ३१५ ॥ झणीं श्रोते कोपती येथ । म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ । निष्णात या पदाचा अर्थ । काढितां तेथ स्फुरलें हो ॥ ३१६ ॥ हे माझे गांठीची नव्हे युक्ती । सद्गुरु आपण आपली स्थिती । बोलवीतसे ग्रंथार्थीं । पदपदार्थीं साधूनि ॥ ३१७ ॥ तरी सद्गुरुचीं लक्षणें । न वर्णवती अगाधपणें । वेद वेडावले मुकेपणें । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥ ३१८ ॥ येथ आश्चर्य कैसे देखा । श्रीभगवत देशभाखा । परमार्थु साधिला नेटका । तुष्टला निजसखा जनार्दनस्वामी ॥ ३१९ ॥ एका जनार्दना शरण । त्याची जैं होय कृपा परिपूर्ण । त्या देहीं असता देहबंधन । नातळे जाण गुरुभक्तां ॥ ३२० ॥ ज्याचे सेवितां निजचरण । देहीं न बाधी देहबंधन । त्यासी जाहलिया अनन्य शरण । दे अगाध कोण हें न कळे वेदां ॥ ३२१ ॥ न करितां सद्गुरुभक्ती । कदा नव्हे परमार्थप्राप्ती । यालागीं सद्गुरुभक्ती । बोलिलीं ग्रंथीं शिष्यहितार्थ ॥ ३२२ ॥ यलागीं पूर्ण सद्गुरुपाशीं । अनन्य शरण होतां त्यासी । तो सद्भावें निववी शिष्यासी । निजबोधेंसीं यथार्थ ॥ ३२३ ॥ सद्गुरुस्थितीचें निरूपण । राया सांगितलें संपूर्ण । आतां शिष्याचे लक्षण । सावधान अवधारीं ॥ ३२४ ॥ तत्र भागवतान्धर्मान्शिक्षेद्गुर्वात्मदैवतः । अमाययानुवृत्त्या यैस्तुष्येदात्मात्मदो हरिः ॥ २२ ॥ वरीवरी दिसती सात्त्विक । भीतरीं विकल्पी शिष्य एक । एक ते केवळ दांभिक । एक ज्ञानठक अतिधूर्त ॥ ३२५ ॥ एक ते केवळ प्रतिष्ठाकाम । एकासी पूज्यतेचा संभ्रम । एकासी जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटीं भ्रम महासिद्धीचा ॥ ३२६ ॥ एक वाग्वादी वाजट । एका आवडे अतिशयेंसीं कर्मठ । एक केवळ कर्मनिष्ठ । आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानें ॥ ३२७ ॥ एका आवडे वायुधारण । एका आसनजाभिमान । एकाचें संशयी मन । विश्वास पूर्ण दृढ नाहीं ॥ ३२८ ॥ एक आदरें उपदेशु घेती । मग होय नव्हे विकल्प चित्तीं । एइशा अनेक शिष्यपंक्ती । ते जाण निश्चितीं मायिक ॥ ३२९ ॥ आतां जे कां अमायिक । शोधितसत्त्वाचे सात्त्विक । मुख्य परमार्था साधक । जे अवंचक सर्वस्वें ॥ ३३० ॥ जे गुरुचरणाचे अंकिले । जे गुरुवाक्या जीवें विकले । सद्गुरूलागीं वहिलें । सर्वस्व आपुलें वोवाळिती ॥ ३३१ ॥ जो सद्गुरूच्या बोलावरी । जीविताची कुरवंडी करी । जो गुरुआज्ञेबाहेरी । तिळभरी हों न शके ॥ ३३२ ॥ सद्गुरुतें मनुष्यबुद्धी । पाहोंचि नेणे जो त्रिशुद्धी । सेवेलागीं निरवधी । हर्षानंदीं तत्पर ॥ ३३३ ॥ निजभावार्थें सादर । सेवलागीं अतितत्पर । शरीर आठही प्रहर । अणुमात्र वंचिना ॥ ३३४ ॥ उंच अथवा नीच काम । म्हणो नेणे मनोधर्म । गौण करोनि नित्यकर्म । मानी उत्तमोत्तम गुरुसेवा ॥ ३३५ ॥ सेवेंलागीं निष्कपट । नित्य निजभावें चोखट । जंव जंव सेवा पडे सदट । तंव तंव उद्भट उल्हासु ॥ ३३६ ॥ सच्छिष्य असच्छिष्य समुदावो । सद्गुरुसी सारिखेचि पहा वो । ज्याचे हृदयीं जैसा भावो । तैसा पहा हो फळभोग ॥ ३३७ ॥ भावेषु विद्यते देवो । हा उपदेशीं मुख्य निर्वाहो । आपुला आपणया भावो । फळभोग पहा हो भोगवी ॥ ३३८ ॥ चुकवावया मृत्यूचा ठावो । जाणिवे आणितां निजभावो । हिरण्यकशिपु नाडला पहा हो । संधी साधोनि देवो निर्दळी त्यासी ॥ ३३९ ॥ तेथेंचि प्रल्हादाचा भावो । मज रक्षिता देवाधिदेवो । त्यासी साक्षेपें मारितां रावो । मरणचि वावो भावार्थें केलें ॥ ३४० ॥ परमार्थीं जें जाणपण । ते जाणावी नागवण । यालागीं सद्भावें जो संपूर्ण । तो जन्ममरणछेदकु ॥ ३४१ ॥ मी शिष्यपरीक्षकु ज्ञाता । हे सद्गुरुसी नाही अहंता । तेथें जैशी त्याची भावार्थता । तैशा थैशा अर्था तो पावे ॥ ३४२ ॥ हें असो सच्छिष्याचा सद्भावो । राया अभिनव कैसा पहा हो । गुरु ब्रह्म ऐक्यभावो । निजनिर्वाहो निष्टंक ॥ ३४३ ॥ माझा इंद्रियवृत्ती चाळिता । सद्गुरु निजात्मा मजआंतौता । बाह्य सेवेलागीं सर्वथा । ब्रह्मूर्ति तत्त्वतां सद्गुरु मानी ॥ ३४४ ॥ सद्गुरुचरणीं आपण । चित्त-वित्त-जीवितेंसीं पूर्ण । करूनि घाली आत्मार्पण । सर्वस्वें संपूर्ण सर्वभावें ॥ ३४५ ॥ तेथें संतुष्टला स्वामी पूर्ण । तोही सर्वस्वें भुलोन । आवडी निजांगें आपण । सेवका आधीन स्वामी होये । ३४६ ॥ आत्मार्पण करितां बळी । द्वारीं द्वारपाळ जाहला वनमाळी । ऐसी भजनभावाची नवाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे ॥ ३४७ ॥ एवढी ये अगाध प्रीती । उत्तम भक्त स्वयें पावती । भाळ्याभोळ्यां हेचि स्थिती । कैशा रीती आतुडे ॥ ३४८ ॥ याचिलागीं सद्गुरूपाशीं । शरण रिघावें सर्वस्वेंशीं तो संतोषोनियां शिष्यासी । भजनधर्मासी उपदेशी ॥ ३४९ ॥ जेणें भजनें भगवंत । भजोनि जाहले उत्तम भक्त । ते भागवतधर्म समस्त । शिकावे निश्चित सद्भावेंसीं ॥ ३५० ॥ मुख्य भागवतधर्मस्थिती । अवश्य करावी सत्संगती । हेंचि सद्गुरु उपदेशिती । असत्संगतित्यागार्थ ॥ ३५१ ॥ सर्वतो मनसोऽसङ्गमादौ सङ्गं च साधुषु । दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वद्धा यथोचितम् ॥ २३ ॥ सर्वांपासोनि निःसंग । जरी मनीं होणें आहे चांग । तैं अवश्य धरावा सत्संग । असत्संग त्यागावा ॥ ३५२ ॥ मुख्य असत्संग देहसंगती । त्याची समूळ करावी निवृत्ती । जगीं दाटुगी सत्संगती । जाण निश्चिती नृपनाथा ॥ ३५३ ॥ तेथें दया मैत्री प्रश्रयो पूर्ण । मुख्यत्वें हें त्रिविध लक्षण । अवश्य करावें आपण । सत्संग प्रमाण सहितासी ॥ ३५४ ॥ सांडोनिया थोरपण । साधूसी लीन होआवें संपूर्ण । सांडोनियां देहाभिमान । त्यासी लोटांगण घलावें ॥ ३५५ ॥ साधूपरता पूज्य पहा हो । जगीं नाहीन् आन देवो । संतपूजनें देवाधिदेवो । स्वयमेवो संतुष्टे ॥ ३५६ ॥ संतपदींचे रजःकण । शिरीं वंदावे श्रद्धेने पूर्ण । संतांपुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरववें ॥ ३५७ ॥ देखोनि संतसमुदावो । अनन्यगती भगवद्भावो । भगवभावें नम्र स्वभावो । प्रश्रयो पहा हो या नांव ॥ ३५८ ॥ नम्रता सेवितां सन्तचरण । येथें भूतदया वाढें पूर्ण । हें दयेचें निजलक्षण । सावधान । अवधारीं ॥ ३५९ ॥ भूतांसी कठिणपण । देखतां निघों पाहे प्राण । मा स्वयें करील आपण । हें सर्वथा जाण स्वप्नीं न घडे ॥ ३६० ॥ जेणें आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख । जेणें आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥ ३६१ ॥ सर्व भूतीं दया समान । कदा न बोले कठिणपण । भूतांची पीडा निवारण । करोनि आपण शोपाय चिंती ॥ ३६२ ॥ जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता । भूतीं दुष्टपण चाळितां । समूळ निजचित्ता निर्दाळूं पाहे ॥ ३६३ ॥ भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळी जीव भलूं धंवे । जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥ ३६४ ॥ ऐसें जें कारुण्य पूर्ण । त्या नांव दया संपूर्ण । आतां मैत्रीवें लक्षण । असाधारण तें ऐका ॥ ३६५ ॥ सर्व भूतांचे ठायीं । सुहृदावांचोनि दुजें नाहीं । तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक ॥ ३६६ ॥ जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पीं न तुटे । आलिया परम संकटें । मैत्री नेटेंपाटें सदा ग्राह्य ॥ ३६७ ॥ या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो । देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे कीं ॥ ३६८ ॥ ऐसी आचरतां निजस्थिती । श्रद्धा उपजे सर्वां भूतीं । त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथनिगुती सांगेन ॥ ३६९ ॥ नवल श्रद्धेचें लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान । तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥ ३७० ॥ अर्घ्यपाद्यादि पूजन । सकळ दान आणि सन्मान । हे श्रद्धा ब्रह्मणीं संपूर्ण । एकासी तें जाण अन्नमात्रचि ॥ ३७१ ॥ एका अन्न आच्छादन । एकासी ते कोरडे कण । तृण आणि जीवन । एका पयःपान यथोचित ॥ ३७२ ॥ जेणें ज्यासी सुख संपूर्ण । तें तें करी उचित श्रद्धें जाण । अनुचित श्रद्धेचें विंदाण दुःखकारी संपूर्ण सर्वार्थीं ॥ ३७३ ॥ जेवीं ब्राह्मणा वाढिलें तृण । गाईस वाढिलें मिष्टान्न । श्वानासी बैसणें सिंहासन । साधूसी आसन थारोळा ॥ ३७४ ॥ व्याघ्रासी पडिल्या लंघन । त्यासी अर्पूं नये गोदान । गाय गादल्या संपूर्ण । तैलाभ्यंजन करूं नये ॥ ३७५ ॥ हो कां देह इंद्रियें जरी एकें । तरी जिव्हाकर्म नव्हे नाकें । तेवीं एक भूतात्मा भूतवेखें उचितोन्मुखें यजावा ॥ ३७६ ॥ करितां यथोचित अर्पण । जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न । तरी अंतरश्रद्धा अभिन्न । हें मुख्य लक्षण भागवतधर्मीं ॥ ३७७ ॥ भूतीं भूतात्मा अभिन्नस्थिती । दया मैत्री साधूंची भक्ती । हेच आतुडे कैशा रीतीं । प्रबुद्ध तदर्थीं उपाव सांगे ॥ ३७८ ॥ तेचि नव श्लोकीं श्लोकोक्ती । समूळ भगवतधर्मस्थिती । प्रबुद्ध सांगे रायाप्रती । साधकां निजप्राप्ती साधावया ॥ ३७९ ॥ शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् । ब्रह्मचर्यमहिंसां च समत्वं द्वन्द्वसंज्ञयोः ॥ २४ ॥ मुख्य सधावया परमार्थ । अवश्य पाहिजे गा शिचिता । शुचित्वावांचोनि तत्त्वता । न लाभे हाता निजस्वार्थु ॥ ३८० ॥ यालागीं गा नृपनाथा । शुद्ध शौचाची आइक कथा । आंतर मळ न क्षाळितां न लाभे हाता बाह्यशुद्धी ॥ ३८१ ॥ मन मळिण वासनामळें । तें न करितां सोंवळें । बाह्य पवित्रता अहंबळें । तें जाण आंधळें न्याहाळी जैसें ॥ ३८२ ॥ सोनें जेवीं पुटीं पडे । मळ तुटे वाणीं चढे । तेवीं गुरुसेवा जडत्व मोडे । चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट ॥ ३८४ ॥ आरशासी सहाणीं तोडिजे । तेणें स्वमुखा शुद्धत्व जोडिजे । तेवीं चित्तशुद्धी उघडिजे । सहजीं सहजें निजशुद्धी ॥ ३८५ ॥ लोहें परिसु झांकिजे । तंव लोहत्वा मुकिजे । तेवीं अंतरशुद्धीनें कीजे । महा निर्बुजे स्थूळबुद्धि ॥ ३८६ ॥ सूर्यासन्मुख सूर्यकांत । जाहलिया शुद्धत्वें होय दीप्त । तेप्रभा बाह्य प्रकाशत । अग्निहोत्रार्थ महायागा ॥ ३८७ ॥ तेवीं गुरुवक्यें अंतरशुद्धता । सबाह्य आली शुचिता । हे न करिती जे पवित्रता । ते जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥ ३८८ ॥ अल्प जळ शौचाप्रती । तेणें हात करकटले ठाती । शेवटीं गिरबडे बृहती । तेवीं विकल्पी होती अपवित्र ॥ ३८९ ॥ भरलें काळकूट जीवीं । वरी टवटव अतिवरवी । तें इंद्रावण कोणीही न सेवी । अंतरस्वभावीं अतिमळिण ॥ ३९० ॥ तीर्थीं धुतला रजकराजु । तो काय होईल शुद्ध द्विजु । नटें भेतला राजध्वजु । तो नव्हे पूज्यु बाह्यक्रियावशें ॥ ३९१ ॥ सुंदरी सुकुमार साजिरी । वोठीं कुष्ठता तिळभरी । जाहलिया तीतें कोणी न वरी । वरीवरी बरी दिसतांही ॥ ३९२ ॥ नागवी माथा मोत्यांची जाळी । शिंबरी सुपाणीदाणा ल्याली । तेवीं बाह्य पवित्रता दाविली । ते ते केली निजभंडिमा ॥ ३९३ ॥ दहें माखला वायसु । तो काय होईल राजहंसु । दहीं म्हणोनि मथितां कापुसु । तृप्ती नव्हे उपहासु जगीं प्रगटे ॥ ३९४ ॥ तेवीं अंतरीं विकल्पु असतां । बाह्य जे जे पवित्रता । ते ते क्रिया नृपनाथा । जाण तत्त्वतां अतिभंडिमा ॥ ३९५ ॥ अंतर क्षाळिलें गुरुप्रतीतीं । बाह्य क्षाळिलें शास्त्रयुक्तीं । ऐसें शुचित्व निजनिश्चितीं अद्वैत स्थिती तेथें नांदे ॥ ३९६ ॥ अंतरी शुचित्व पूर्ण वसे । तें बाह्यकर्मीं स्वयें प्रकाशे । तें शुचित्वचि अनायासें परमार्थदशे प्रकाशी ॥ ३९७ ॥ ईश्वरभावाचें निजवर्म । ज्याचे पोटीं रिघालें सप्रेम । त्याचें कर्मचि होय ब्रह्म । त्या देहभ्रम बाधिना ॥ ३९८ ॥ या नम शुचिष्मता । सत्य जाण गा नृपनाथा । तपाचीही स्थिती आतां ऐक तत्त्वतां सांगेन ॥ ३९९ ॥ शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्ध-भोगानुरूप । हृदयीं वाहणें कृष्णस्वरूप । तो शुद्ध साक्षेप तपाचा ॥ ४०० ॥ जेवीं धूरसूनि दिठी । शूर रणामाजीं उठी । तेवीं ईश्वर धरोनि पोटीं । वर्ते तो सृष्टीं तपिया शुद्ध ॥ ४०१ ॥ हेंचि तपाचें निजस्वरूप । याचि नांव शुद्ध तप । यावरतें न चढे रूप । व्यर्थ वाग्जल्प कां करावे ॥ ४०२ ॥ द्वंद्वसहिष्णुता मुमुक्षा । या नांव म्हणिजे तितिक्षा । तेही आणावया लक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥ ४०३ ॥ सुखदुःख उभय भोग । दोंमाजीं अखंड आपुलें अंग । जेवीं चितींची वाघीण आणि वाघ । दोहींमाजीं साङ्ग निजत्वें भिंती ॥ ४०४ ॥ जेवीं दावाग्नी कां उन्हाळे । आकाश जैसें न पोळें । असोनि त्यांचेनि मेळें । त्यांवेगळें अलिप्त ॥ ४०५ ॥ शीतळ जळ कां हींव पडे । पृथ्वी निजक्षमा न कांकुडे । तेवी निजस्वरूपसुरवाडें द्वंद्वा नातुडे निजसाधु ॥ ४०६ ॥ शरीर जरी हिंवे कांपे । तेणें देह कांपे साधु न कांपे । शरीर अतिउष्णें तापे । परी साधु न तापे देहतापामाजीं ॥ ४०७ ॥ सुख देखोनि दिठी । ज्या गोडिया घाली मिठी । दुःखही त्याचि आवडि घोंटी । द्वंद्वसहिष्णुता मोठी या नांव राया ॥ ४०८ ॥ गोफणगुंडा सन्मुख । लागतां अवश्य उठे दुःख । तोच सुवर्णाचा जाहलिया देख । दुःख लोपोनि सुख अनिवार वाढे ॥ ४०९ ॥ सुखदुःखप्रकाशक । निजवस्तु असे एक । त्या एकात्मता देख । द्वंद्वें साधक सुखें साहती ॥ ४१० ॥ तेवीं द्वंद्वाचें जाणपण । जाणवीता असे जें ज्ञान । तेंजाणितल्या आपण । द्वंद्वें संपूर्ण निर्द्वंद्वें होती ॥ ११ ॥ रसउसीं कठिणपण । त्यामाजीं गोडी अखंड पूर्ण । तेवीं द्वंद्वामाजीं वस्तु चिद्घन । अखंडदंडायमान स्वयें देखे ॥ १२ ॥ ऐशी हे अखंडता । जंव न ये साधकाचे हाता । तंव द्वंद्वाची सहनता । नव्हे नृपनाथा निश्चयेंसीं ॥ १३ ॥ या नांव द्वंद्वसहन । निजनिश्चयें जाण पूर्ण । आतां मौनाचें लक्षण । सवधान अवधारीं ॥ १४ ॥ वाग्वादु करावा जनीं । तैं दृढ व्हावें देहाभिमानी । सांडविला तो सद्गुरूंनी । निःशेष धोउनी शब्देंसीं ॥ १५ ॥ सद्गुरुवचन पडतां कानीं । स्तुति निंदा मिळोनि दोन्ही । बोल बोलणें निरसुनी । हृदयभुवनीं परिपक्कलें ॥ १६ ॥ तेव्हां ज्याचे बोलावे अवगुण । तेथें दिसे हृदयस्थ आपण । यालागीं बोलतां पैशुन्य । पडे मौन गुरुवाक्यें ॥ १७ ॥ गुण देखोनियां स्तवन । करितां पडे दृढ मौन । मीचि स्तव्य स्तविता स्तवन । मज म्यान् वानितां पूर्ण मूर्खत्व माझें ॥ १८ ॥ निजात्मा निःशेष नसे । ऐसा रिता ठाव न दिसे । तेथें जें जें कांहीं दिसे । तें आत्मप्रकाशें सदोदित ॥ १९ ॥ ऐशी सद्गुरूंनि दाखविली युक्ती । ती विश्वासें स्थिरवली चित्तीं । यालागीं निंदा आणि स्तुती । वाचेप्रती बोलेना ॥ २० ॥ संवाद करावा निजस्वार्थी । तंव सद्गुरूच्या वचनोक्तीं । खुंटल्या वेदशास्त्रांच्या युक्ती । त्यावरी स्थिती चढेना ॥ २१ ॥ एवं स्तुति निंदा वाग्वाद । करितां खुंटला संवाद । महामौनें अतिशुद्ध । परमानंद सधकां ॥ २२ ॥ ऐसें साधावया दृढ मौन । सद्गुरु शिकवी वेदाध्ययन । उपनिषदर्थ विवंचून । पढवी संपूर्ण अर्थावबोधें ॥ २३ ॥ अथव अतिशयें दृढ मौन । श्रीरामकृष्णनामस्मरण । अखंड नमें गर्जतां पूर्ण । वेदार्थ जाण तिष्ठती पुढें ॥ २४ ॥ नित्य रामनाम गर्जे वाणी । त्या तीर्थें येती लोटांगणीं । सुरवर लागती चरणीं । यम पायवणी स्वयें वंदी ॥ २५ ॥ रामनामाचें जें स्मरण । या नांव गा महामौन । वेदें नाम स्तविलें पूर्ण । शुद्ध अध्ययन हरिनाम ॥ २६ ॥ वेदु अथवा नामस्मरण । या नांव गा स्वाध्यावो जाण । आतां आर्जवाचें लक्षण । ऐकें संपूर्ण महाराजा ॥ २७ ॥ आतां आर्जव तें ऐसें । सर्वा जीवां जीवन जैसें । कां तंतु जैसा निजविलासें । अवोधें असे पटामाजीं ॥ २८ ॥ सखरेचें इंद्रावण । केलिया न वचे गोडपण । तैसें विषमांही जीवां जाण । आर्जवें पूर्ण रंजवी स्वभावें ॥ २९ ॥ वक्र चंद्राची चंद्रिका । परी अमृत वक्र नव्हे देखा । तैसें देखोनि विषमां लोकां । मनोवृत्ति देख पालटेना ॥ ३० ॥ निपराद न देखे कोणासी । जिवलग सोयरा सर्वांशीं । वोळखी जीवमात्रांशीं । जैशी तैशी जुनाट ॥ ३१ ॥ न्यहा संतप्ता आधार देत । वरूनि घणघाय घेत । सांडस घायातळीं सूत । तें आघवेंचि आप्त लोहत्वें लोहा ॥ ३२ ॥ यापरी जयसी आप्त सर्व । ऐसा जो कां निजस्वभाव । तया नांव गा आर्जव । अतिअपूर्व गुरुदीक्षा ॥ ३३ ॥ असुर सुर नर ऋषीश्वर । मदनें केले निजकिंकर । कंदर्पाचा मार थोर । अतिदुर्धर अनंगु ॥ ३४ ॥ अंतरीं कामचें दृढ ठाणें । वरीवरी दऽन्त चावूनि सहणें । त्याचें मनचि निष्काम न म्हणे । चाळवणें लौकिकु ॥ ३५ ॥ तैसी नव्हे सद्गुरुची युक्ती । कमाची पालटे कामनावृत्ती । अभंग ब्रह्मचर्यस्थिती । शिष्यांप्रती उपदेशी ॥ ३६ ॥ कंदर्परणिवेस्त्रीपुरुष । तेथें गुरुदीक्षा अलोलिक । मिथ्या स्त्रीपुरुष माइक । विषयसुख भ्रम मात्र ॥ ३७ ॥ आनंदाचें उपस्थ एकायतन । हें काय मिथ्या वचन । ते अर्थीं पूण वेदज्ञ । वेदविवंचन दाविती ऐसें ॥ ३८ ॥ पुसतां साखरेची गोडी कैशी । तो स्वादु न ये सांगावयासी । तेथें चाखो देत्ती अणुमात्रेंशीं । तेचि गोडपण रशीं जाणती जाण ॥ ३९ ॥ तेवीं परमानंदसुखप्रप्ती । उपस्थद्वारा नर चाखिती । आनंद एकायतनस्थिती । बोलिली उपस्थीं या हेतु वेदें ॥ ४० ॥ त्या उपस्थसुखाची नित्यस्थिती संभोगेंवीण जे वाढविती । तेथ मिथ्या स्त्रीपुरुषव्यक्ती । सहजें होती सज्ञान ॥ ४१ ॥ चाखिली गोडी तेचि सखर । परमानंद मैथुनमात्र । मानूनियां मैथुनपर । जाहले पामर विषयांधा ॥ ४२ ॥ पुअस्थीं परमानंदगोडी । यालागीं स्त्रीकामाची अतिवोढी । सद सोसिजे महामूढीं । ताडतोडी जीविताच्या ॥ ४३ ॥ साखरेचें केलें नारियेळ । तेथ त्वचा गर्भ साखरचि केवळ । तेवीं विषयद्वारा सुखकल्लोळ । उठती सकळ परमानंदें ॥ ४४ ॥ नाना पक्वान्नपरवडी । गुळाच्या गोडीनें ते चवी गाढी । तेवीं विषयाची जे जे आवडी । ते ते गोडी निजानंदें ॥ ४५ ॥ हें नेणोनि मुळींची निजगोडी । सोशिती विषयंच्या अतिवोढी । बाप सद्गुरुकृपा गाढी । विषयांची आवडी एकत्वा आणी ॥ ४६ ॥ यलागीं विषयांची अस्था । न चढे सच्छिष्यचे माथां । स्त्रीबोगाची आसक्तता । मिथ्या तत्त्वतां गुरुवाक्यनिष्ठा ॥ ४७ ॥ हा आत्मा हे आत्मी पाहीं । ऐसें मिथुन मुळीं नाहीं । तें निजमूळ पादितां ठयीं । ब्रह्मचर्य पाहीं अभंग ॥ ४९ ॥ आतां अहिंसेची स्थिती । ऐकें राया चक्रवर्ती । भंवई उचलणें नाहीं भूतीं । स्वप्न-सुषुप्ती-जागतां ॥ ५० ॥ पावो सादळतां देख । झणीं पृथ्वी पावेल दुःख । या काकुळती आवश्यक । पाउलें अलोलिक हळुवार ठेवी ॥ ५१ ॥ आकाश दचकेल देख । यलागीं नेदी सैरा हांक । वाचा परिपक्व पीयुख । वचनें परम सुख सर्वांसी देतु ॥ ५२ ॥ त्याचा शब्दु जैं गगनीं भरे । तेणें शब्दानंदचमत्कारें । गगनचि निजसुखें भरें । येणें सुखोद्गा वचनोक्ती ॥ ५३ ॥ जळामाजीं घलितां उडी । झणीं उदक दडपे बुडीं । तरंगन्यायें देणें बुडी । जीवनाची दुथडी न हेलावतां ॥ ५४ ॥ त्यासी जळीं होतां निमग्न । जळाचा तापु शमे सन्पूर्ण । यपरी करी स्नान । जीवना जीवन निववितु ॥ ५५ ॥ झणीं दुःख पावेल वारा । म्हणौनि श्वसु न घाली सैरा । नेमूनि प्राणसंचारा । निजशरीरा वागवी ॥ ५६ ॥ निजदेहा करावया घातु । सर्वथा जेवीं नुचले जातु । तेवीं भूतावरी निघातु । ज्याच्या पोटांतु उपजेना ॥ ५७ ॥ अत्यंत न्याहारें पाहतां । वचकु पडेल प्राण्यांच्या चित्ता । यालागीं बह्यदृष्टीं क्रूरता । न पाहे भूतां भूतभवें ॥ ५८ ॥ रोम रगडतील संपूर्ण । यालागीं न करी अंगमर्दन । एवं स्वदेहाचें देहपण । भूतहिंसाभेण अहंत्व नाणी ॥ ५९ ॥ भूतां देतां दुःखलेशु । भूतीं दुखवेल भूतेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु । तेथ रहिवासु अहिंसेचा ॥ ६० ॥ कायिक-वाचिक-मानसिक । भूतां उपजे त्रिविध दुःख । तें जेथें निमालें निःशेख । अहिंसा देख ते ठायीं ॥ ६१ ॥ या नांव गा शुद्ध अहिंस । सत्य जाण नृपवरेशा । आतां द्वंद्वसाम्याची दशा । आइक क्षितीशा सांगेन ॥ ६२ ॥ सुख दुःख अदृष्टाधीन । तें अदृष्ट देहाचे माथं पूर्ण । ऐसें जाणोनि आपण । निर्द्वंद्व संपूर्ण सद्गुरुवाक्यें ॥ ६३ ॥ अदृष्टें देह सुखदुःख भोगी । मूर्ख तेथ रागी विरागी । शिश्यु लागों नेदी निजांगीं । गुरुवाक्यरंगीं रंगला । ६४ ॥ देहींचेनि सुखें सुखावतां । सवेंचि दुःख चढे माथां । हें गुरूनें जाणोनि तत्त्वतां देहअहंता सांडविली ॥ ६५ ॥ निरभिमान्यच्या अंगीं । दुःख नुरेचि दुःखनियोगीं । सुख नुरेचि सुखसंभोगीं । तो उभयभगीं अलिप्त ॥ ६६ ॥ छाया उष्णामाजी तापली । ते छाया छायेंचि निवाली । तेवीं सुखदुःखें मिथ्या जाहलीं । स्थिति सुखावली यथनुलाभें ॥ ६ ॥ अदृष्टें देही वर्तां देख । बाधूं न शए सुखासुख । हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य विश्वासिक पावती ॥ ६८ ॥ विश्वसेंवीण सर्वथा । गुरुगम्य नये हाता । गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कद न घडे ॥ ६९ ॥ देहीं दृढता जंव मीपण । तंव तंव द्वंद्वबाधा दारुण । जे गुरुवाक्यें निरभिमान । त्यांसी द्वंद्वें जाण अतिमिथ्या ॥ ७० ॥ स्वप्नींचें दरिद्र-समर्थता । तेवीं दोनी मिथ्या जागृता । तेवीं द्वंद्वबाधेची वार्ता । न बाधे गुरुभक्तां अपरोक्षबोधें ॥ ७१ ॥ लेंकुरांच्या खेळापाशीं । पारणें तैशी एकादशी । द्वंद्वाची दशा तैशी । गुरुवाक्यासरिसी समूळ उडे ॥ ७२ ॥ जेवीं चंदनाचिया द्रुतीं । आरीबोरी चंदन होती । तेवीं गुरुवाक्यप्रतीती । सकळ द्वंदेवें येती निजसाम्या ॥ ७३ ॥ चंदनासभोंवतीं झाडें । तींही कोरडीं लांकडें । देवद्विजांचे मस्तकी चढे । भाग्य एवढें सत्संगी ॥ ७४ ॥ सद्गुरु तोचि सत्संगती । तत्संगें शिष्य पलटती । स्वयें ब्रह्मरूप होती । तेव्हां द्वंदें येतीं निर्द्वंद्वा ॥ ७५ ॥ एवं गुरुवाक्यीं विश्वासतां । द्वंद्वसाम्य चढे हाता । तें गुरुवाक्यही तत्त्वतां ऐक आतां सांगेन ॥ ७६ ॥ सर्वत्रात्मेश्वरान्वीक्षां कैवल्यमनिकेतताम् । विविक्तचीरवसनं सन्तोषं येन केनचित् ॥ २५ ॥ सद्गुरुवचनविश्वासें । मानीं सर्वत्र परमात्मा ऐसें । तेचि निजबुद्धी निश्चयवशें । निजमानसें विवंची ॥ ७७ ॥ मजमाजीं परमात्मा वसे । तेणें स्थूळदेहो वर्ततसे । त्याचेनि पूर्ण चित्प्रकाशें । जग भसे जगद्रूपें ॥ ७८ ॥ तेणें निजात्मप्रकाशें माझें दृष्टीसी दृश्य दिसे । दृश्यद्रष्ट्टदर्शनविलासें विलसतसे परमात्मा ॥ ७९ ॥ दृश्य दृश्यपणें जें जें उठीं । तें तें निजात्मता पाठींपोटीं । तेणें अन्वयें देवो देखे दृष्टी । आझाळबाहाळ सृष्टि दुमदुमित ॥ ८० ॥ तेव्हां जें जें देखे भूताकृती । तेथ परमात्मा ये प्रतीती । मी नियंता ईश्वर त्रिजगतीं । हेही स्फुर्तीं स्फुरों लागे ॥ ८१ ॥ जग वर्ते माझिया सत्ता । मी कळिकाळाचा नियन्ता । मी उत्पत्ति-स्थिति-प्रलयकर्ता । हे मूळ अहंता स्वभावें स्फुरे ॥ ८२ ॥ येणें पूर्वान्वयें जंव पाहे । तंव सर्वीं सर्व मीचि आहें तें पाहतें पाहणें पाहोन् ठाये । तेथें अहं जाये विरोनि ॥ ८३ ॥ तेथें परब्रह्मैक प्रसिद्ध । कोंदला ठाके सच्चिदानंद । ऐसा गुरुवाक्यें प्रबोध । शिष्य अतिशुद्ध पावती ॥ ८४ ॥ तेव्हां वैकुंठीं देवो आहे । हें बोलणें त्या आहाचि होये । क्षीरसागरीं देवो राहे । हें ऐकतांचि पाहें अनिवार हांसे ॥ ८५ ॥ देवांवाचोनि तत्त्वता । तिळभरी ठावो नाहीं रिता । त्यातें एकदेशीं नेमितां । न मने वस्तुतां सच्छिष्यासी ॥ ८६ ॥ वैकुंठ आणी क्षीराब्धी । ज्याचेनि प्रकाशे ज्यामधीं । तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्धीं । हे बोल सोपाधी शबलत्वाचे ॥ ८७ ॥ जेथ सर्वीं सव परमात्मा । तेथे एकदेशी न सरे महिमा । तो पूर्णब्रह्म अनाश्रमा । वैकुंठादि आश्रमा वश नव्हे ॥ ८८ ॥ अखंडातें आवाहन । अधिष्ठानातें आसन । सर्वगता सिंहासन कल्पिती स्थान निजकल्पना ॥ ८९ ॥ तेही कल्पिती निजवृत्ती । जे ब्रह्मरूप नित्य पाहती । त्यांची परब्रह्मस्थिती । कद कल्पांतीन् भंगेना ॥ ९० ॥ ऐशी परब्रह्मआवाप्ती । साधकीं पावावया निश्चितीं । नित्य वसावें एकांतीं द्वैताची स्फुर्ती त्यागोनी ॥ ९१ ॥ साधितां परमार्थनिधान । साधकां आडवी वस्त्रअन्न निमोली वल्कलें परिधान । कां त्यागिलीं अतिजीर्ण वस्त्रें घ्यावीं ॥ ९२ ॥ शाकफलमूलकंदभोजन । येणें करावें जठरतर्पण । सांडूनि परमार्थ साधन । जोडावय अन्नधन न वचावें कदा ॥ ९३ ॥ चौपालवीं बांधोनि करीं भीक मागावी दारोदारीं । परी अन्न आच्छादनावरी । आयुष्य तिळभरी न वेंचावें ॥ ९४ ॥ मेळवावया अन्न आच्छादन । न शिणती साधक सज्ञान । देह अदृष्टाधीन । तें सहजें जाण प्रतिपाळी ॥ ९५ ॥ स्वयें शिणतां अहोराती । अदृष्टावेगळी अणुभरी प्राप्ती । कदा न चढे कोणाचे हातीं । हें साधक जाणती सज्ञान ॥ ९६ ॥ यलगीं अदृष्टें जें प्राप्त । तेणें निर्वाहेन् सदा निश्चिंत । साधक परमार्थ साधित । संतोषयुक्त गुरुवाक्यें ॥ ९७ ॥ देह अदृष्टपरवडी । होती सुखदुःख घडामोडी । साधकां संतोषु चढोवढी । गुरुवाक्यसुख गोडी दृढ लागली ॥ ९८ ॥ जैसें देहाचे प्रक्तन । तैसें होय अशन वसन । परी गुरुवाक्यलुख सांडून । देहावरी मन ममत्वें न ये ॥ ९९ ॥ यांचेवीण यथाकाळें यदृच्छया जें जें मिळे । तें तें सेवी सकळ मंग्ळें गुरुवाक्यमेळें स्वनंदें ॥ ५०० ॥ शरीरनिर्वाहाविखीं । कोठें कांहीं नाभिलाखी । जें जें मिळे तेणेंचि सुखी । निजात्मतोखीं संतुष्ट ॥ ५०१ ॥ प्रारब्धें सुखदुःख भोगितां । संतोष साधकांच्या चित्ता । हें गुरुवाक्यें विश्वासतां । चढे हाता शिष्याच्या ॥ ५०२ ॥ त्याच्या दृढ विश्वासासीं । भगवतशास्त्र गुरुपाशीं । अभ्यासावें आदरेंसीं । दृढ-निश्चयेंसीं प्रबोधक ॥ ५०३ ॥ श्रद्धां भागवते शास्त्रेऽनिन्दामन्यत्र चापि हि । मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥ २६ ॥ सगुण अथवा निर्गुअण ।जेथ भगवत्स्वरूपवर्णन । कं भग्वंत बोलिला आपण । अथवा भगवद्गुणकीर्ति जेथें ॥५०४ ॥ तें तें राया शास्त्र जाण । आवडे जैसें जीवुप्रण । विशेषेंसीन् ज्ञान कथन । सप्रेम पूर्ण पढियंतें ॥ ५०५ ॥ गुरुमुखें ज्ञानकथा गोड । तेणें श्रीभागवतीं श्राद्धा दृढ । श्रवणें पुरे जीवाचें कोड । वोसरे चाड विषयांची ॥ ५०६ ॥ जीवीं नाहीं विषयकौतुकें तरी विषय आवश्यक । साधकां होती बाधक । तेणें आत्यंतिक अनुतापु ॥ ५०७ ॥ अनिवार विषयावस्था । त्यागिली न वचे निजसत्ता । तेणें मुमुक्षूच्या चित्ता । अत्यंत व्यथा अनुतापें ॥ ५०८ ॥ नसतां विषयांची अतिप्रीति । स्वतां नव्हे विषयनिवृत्ति । ऐशिया साधकांप्रती । निर्णीत शास्त्रार्थीं नेमिला नेमु ॥ ५०९ ॥ नाहीं विषयांची आसक्ति । ना नव्हे विषयनिवृत्ति । ऐशी जे कां साधकस्थिति । नेमू त्याप्रती शास्त्रें केली ॥ ५१० ॥ जो कां केवळ विषयासक्त । तो कदा न मानी शास्त्रार्थ । कां जो झाला जीवन्मुक्त । तोही शास्त्रार्थ मानूनि न मानी ॥ ५११ ॥ जैसी मृगजळाची भसे स्थिति । तैसे विषय मुक्तांप्रती । त्या विषयांचिये निवृत्ती ं कोणते शास्त्रार्थीं मानावा नेमु ॥ ५१२ ॥ एवं अत्यासक्त अतिविरक्त । त्यंसी नेमु न चले येथ । मुमुक्षूंसीच शास्त्रार्थ । नेमी निश्चित निजनेमे ॥ ५१३ ॥ तेथ गुरुशिष्यसंवाद । करितां ज्ञानार्थबोध । ते बोधीन् बाधी विषयबाध । तत्तागीं प्रसिद्ध शास्त्रार्थनेमु ॥ ५१४ ॥ मनसा-वाचा-कर्मावरोधु । येणें विषयंचा त्रिविध बाधु । त्या तिहींसही त्रिविधु । शास्त्रें अतिशुद्धु नेमिला नेमु ॥ ५१५ ॥ पूर्वश्लोकोत्तरार्धम् - मनोवाक्कर्मदण्डं च सत्यं शमदमावपि ॥ मनासी नेमु उपशमाचा । इंद्रियां नेमु तो दमाचा । सत्यें नेमिलीं वाचा । तिहींसही तिहींचा निजनेमु ॥ ५१६ ॥ विषयकाम गज दारुण । अहंमदें उन्मत्त पूर्ण । देहतारुण्यें अतिघूर्ण । तोडी बंधन विधीचें ॥ ५१७ ॥ रवंदी सुहृद राजा गुरु । सोंडां कवळी स्वर्गशिखरु । नरकनदीमाजीं अपारु । अतिदुस्तरु बुड्या देत ॥ ५१८ ॥ धर्मजलें क्षाळे अवचिता । सवेंचि सलोभ धुळी घाली माथां । घोळसी ब्रह्मादिकां समस्तां । अहंममता गर्जतु ॥ ५१९ ॥ त्यासी विवेकमहावत जाण । माथां चढों जाणे आपण । शास्त्रविधी-अंकुशें पूर्ण । धरिला आवरून करकरितु ॥ ५२० ॥ त्यासी उपशमाचें संरक्षण । वैराग्ययुक्त ठेवूनि जाण । दमाचे शृंखळीं आकळून । सत्याचे स्तंभीं पूर्ण विवेकु बांधे ॥ ५२१ ॥ अनसा-वाचा-कायिक कर्म । येणें विषयबाधा बाधी परम । त्या तिहींसी केला त्रिविध नेम । त्या नेमाचें वर्म ऐक राया ॥ ५२२ ॥ आतां शमची ऐशी स्थिती । मनबुद्ध्यादि चित्तवृत्ती । सांडवूनि विषयासक्ती । लावी परमार्थीं प्रबोधूनि ॥ ५२३ ॥ पूर्वे उगवतां गभस्ती । आंधारु सांडी त्रिजगती । तेवीं गुरुवाक्यें शमाची प्राप्ती । विषयनिवृत्ति अनसिक ॥ ५२४ ॥ बाह्य इंद्रियप्रवृत्ती । दमें दमोनि गुरुवाक्यस्थिती । मग शमाची संगति । आणी निवृत्ती इंद्रियकर्में ॥ ५२५ ॥ कन्या प्रतिपाळूनि जैसी । दान देतां जांवयासी । त्यागी बापचे कुळगोत्रासी । दमें इंद्रियें तैशीं विषयार्था ॥ ५२६ ॥ झणीं वाचा जाईल विकळ । तिसी सत्याचा महामोकळ । देऊनि केली निखळ । अतिअढळ सत्यधूत वाणी ॥ ५२७ ॥ सत्यवादिया ब्रह्मदि वंदिती । असत्या होय अधोगती । ऐसें व्याख्यन जे करिती । तेही वदती असत्य ॥ ५२८ ॥ कां राम नामाच्या आवृत्तीं । वाचा धूतली स्मरणोक्तीं । ते असत्यामाजीं पुढती । कदा कल्पंतीं बुडेना ॥ ५२९ ॥ मंथूनि काढिलें नवनीत । तें पुढती न बुडें ताकंत । तेवीं नामें वाचा निर्धूत । असत्य तेथ स्पर्शेना ॥ ५३० ॥ जेवीं लागलेनि रविकरें । घृतकणिका स्वयेन् विरे । तेवीं सत्याचेनि निजनिर्धारें । असत्य चमत्कारें समूळ उडे ॥ ५३१ ॥ चंदनाचिया चौफेरीं । काष्ठत्वा मुकती खैर बोरी । तेवीं नामाच्या निजगजरीं । वाचेमाझारीं निजसत्य प्रगटे ॥ ५३२ ॥ झलेनि अर्कप्रकाशें । खद्योत हारपती जैसे । तेवीं रामनामसौरसें । लोपे अनयासें असत्य ॥ ५३३ ॥ अंवसेसी प्रतिपदे कुहु । गेलिया बिंब संडी राहु । तेव्हां प्रकाशाचा समूहु । प्रगटे बहु जगामाजीं ॥ ५३४ ॥ तेवीं असत्याचेनि आक्रमें । वाचा प्रकाशे सत्यसंभ्रमें । जेवीं राजाज्ञाअनुक्रमे । प्रजा स्वधर्में वर्तती ॥ ५३५ ॥ सत्यापरतें नाहीं तप । सत्यापरता नाहीं जप । सत्यें पाविजे सद्रूप । सत्यें निष्पाप साधक होती ॥ ५३६ ॥ एवं काया वाचा आणि मनें । शमदमादिसत्यलक्षणें । जो नेमिला त्रिविधविंदानें । त्याचे विषयाचें धरणें तत्काळ उठी ॥ ५३७ ॥ ऐसिया स्वार्थलागीं जीवीं । भगवच्छास्त्रीं आवडी करावी । परी आणिकां शास्त्रां न लावी । द्वेषभावीं निंदेचें बोट ॥ ५३८ ॥ एका स्तुती एका निंदा । करितां आदळे अंगी बाधा । यलागीं निंदानुवादा । साधक कदा नातळती ॥ ५३९ ॥ अर्धांगींची लक्ष्मी वंदावी । मा चरणींची गंगा कय निंदावी । निजजननी नमस्करावी । काय येरां द्यावी पांपर ॥ ५४० ॥ तरी भज्य भजावें भजनीं । परी निंदा स्तुति संडूनि दोनी । जो निजसत्यें होय मौनी । तैं ब्रह्मज्ञानीन् अधिकारु ॥ ५४१ ॥ ऐशी न करितां व्युत्पत्ति । नसोशितां हे कष्टस्थिति । भावें करितां भगवद्भक्ति । फुकाची मुक्ति हरिभक्तां ॥ ५४२ ॥ ते भक्तीची निजस्थिति । राया सांगेन तुजप्रती । सुगमत्वें परमात्मप्राप्ति । हरिभक्त पावती तें ऐक ॥ ५४३ ॥ श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरद्भुतकर्मणः । जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिलचेष्टितम् ॥ २७ ॥ मुख्य भक्तीचें करण । हरीचे जन्म-कर्म-गुण । पूर्ण श्रद्धा करावे श्रवण । हरिकीर्तन स्वानंदें ॥ ५४४ ॥ हरिकीर्तनाचिया जोडी । सकळ साधनें केलीं बापुडीं । अद्भुत कर्में हरीचीं गढीं । गातां अतिआवडी उल्हसे ॥ ५४५ ॥ शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन धरिला करीं । निद्रा न मोडितां सकळ नगरी । द्वारकेमाझरीं आणिली मथुरा ॥ ५४६ ॥ निमाला गुरुपुत्र दे आणूनि । मुखें प्राशिला दावाग्नि । गत गर्भ आला घेऊनि । निजजननीतोषार्थ ॥ ५४७ ॥ अजन्म्या जन्में नेणॊं किती । अकर्म्याचीं जर्में गाती । अगुणाचे गुण वर्णिती । तेणें श्रीपति सुखावे ॥ ५४८ ॥ जो सुखैकमूर्ति निजस्वभवें । तोही जन्म-कर्म-गुणवैभवें । गातां कीर्तनीं अतिसुखावे । स्वानंदगौरवें डुल्लतु ॥ ५४९ ॥ ऐशी कीर्तनीं गातां कीर्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति । तेथें ठसावे ध्यानस्थिति । ऐक ते नृपती सांगेन ॥ ५५० ॥ मुकुट कुंडलें मेखळा । कांसे कसिला सोनसळा । अपाद रुळे वनमळा । घनसांवळा घवघवित ॥ ५५१ ॥ ऐशी मूर्ती सुरेख सगुण । कां निरसून रूप नाम गुण । ध्यानीं ठसावे निजनिर्गुण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५५२ ॥ ऐसें ठसावतां ध्यान । भक्तांची सबह्य क्रिया जाण । ते ते होय कृष्णार्पण । स्त्रीपुत्रादि जाण सर्वस्वें ॥ ५५३ ॥ इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् । दारान्सुतान्गृहान्प्राणान्यत्परस्मै निवेदनम् ॥ २८ ॥ अग्निहोत्रादि यग होम । ग्रहणादि दन अनुत्तम । तप म्हणिजे स्वधर्म । जो वर्णाश्रम यथोचित ॥ ५५४ ॥ आगमोक्त यथशस्त्र । आवरणविधि-विधानतंत्र । गुरुदीक्षा शुद्ध मंत्र । अथवा नाममात्र जो जपु कीजे ॥ ५५५ ॥ तें यज्ञ दान क्रिया तप । दीक्षामंत्र कां नामजप । तेथें न घालितां संकल्प । करी निर्विकल्प कृष्णार्पण ॥ ५५६ ॥ हरीशीं जहले जे अनन्य शरण । ते हरीचे लडिवाळ पूर्ण । त्यांचें हरि करी प्रतिपाळण । जेवीं जननी जाण तानुलेया ॥ ५५७ ॥ यालागीं जें जें जीविकावर्तन । तेंही करावें कृष्णार्पण । हें माझें म्हणोनि अभिमन । भक्त सज्ञन न धरिती कद ॥ ५५८ ॥ ज्याची आवडी अतिशयें चित्तीं । ज्याची आपणिया अतिप्रीति । तें तें कृष्णार्पण करिती । गुरुवाक्यस्थिती विश्वासें ॥ ५५९ ॥ यलागीं आठही प्रहर । सेवेसी वेंचिति निजशरीर । निमिषर्धही व्यापार । विषयाकार करिती ना ॥ ५६० ॥ अन्नालागी होऊनि वेडें । सधनांच्या पायां न पडे । आयुष्याचे तीन कवडे । विषयाचे चाडे कदा न करी ॥ ५६१ ॥ आयुष्याची अर्ध घडी । वेंचितां न मिळे लक्ष कोडी । तेणें आयुष्यें परमार्थ जोडी । विषयांच्या कोडी थुंकोनि सांडी ॥ ५६२ ॥ त्यागोनियान् राज्यसंपत्ती । राजे जाऊनि वनाप्रति । स्वयें परमार्थ साधिती । विषयासक्ति थुंकोनि ॥ ५६३ ॥ कैशी भक्तीची गोडी संपूर्ण । रिता जावों नेदी अर्ध क्षण । अवघें जीवितचि जाण । करी कृष्णार्पण सर्वस्वें ॥ ५६४ ॥ आणि पुत्रदासादिक जें जें घरीं । तें तें भगवत्सेवेवारीं । स्वयें कृष्णार्पण करी । माझी म्हणोनि न धरी ममत जीवीं ॥ ५६५ ॥ दारा पुत्र देह गेह प्राण । यांसी आत्मा सबाह्य पूर्ण । तेथें संकल्पेंवीण जाण । ब्रह्मार्पण सहजचि ॥ ५६६ ॥ एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सौहृदम् । परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु ॥ २९ ॥ एवं दारा गेह देह संपदा । आत्मार्पणें शुद्ध श्रद्धा । भजलें सर्वकाळीं सर्वदा । ते भक्त गोविंदा पढियंते ॥ ५६७ ॥ जो सर्व भूतीं हृदयस्थु । पराअत्मा श्रीकृष्णनाथु । त्याचे ठायीं जो भक्तु । साधावया निजस्वर्थु सर्वस्वें भजे ॥ ५६८ ॥ त्या हृदयस्थाचे ठायीं दृढ दृष्टी जंव बसली नाहीं । तवं सगुणमूर्ती हृदयीन् । भजावी पाहीं सर्वात्मभावें ॥ ५६९ ॥ सगुणमूर्ती नातुडे ध्यानीं । तरी भजावें प्रतिमेच्या स्थानीं । तेथें ही चलाचल दोनी । भजाव्या गुरुवचनीं समसाम्यभावें ॥ ५७० ॥ ज्या उपासक पूजिती । त्या जाणाव्या ’चला’ मूर्ति । ज्या पांडुरंगादि द्वारावती । त्या स्थावरा मूर्ति पुराणोक्त ॥ ५७१ ॥ त्या मूर्तीहूनि श्रेष्ठ स्थान । पूर्ण पूज्यत्वें ब्राह्मण । तेथें करावें गा भजन । सर्वस्वें जाण सर्वदा ॥ ५७२ ॥ त्या ब्राह्मणामाजीं अतिश्रेष्ठ । श्रोत्रिय सदाचारनिष्ठ । त्यांतही वेदशास्त्रार्थीं प्रविष्ट । ते अतिवरिष्ठ पूज्यत्वें ॥ ५७३ ॥ त्यांहीमाजीं जे भागवत । भागवतधर्मीं नित्य निरत । जे निष्कर्मेंसीं भगवत्भक्त । ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णीं ॥ ५७४ ॥ ज्यांसी आत्मा श्रीकृष्ण हृदयस्थ । ज्यांचा अनन्य स्वामी श्रीकृष्णनाथ । ऐसें जे भगवद्भक्त । ते पूज्य निश्चित निजभक्तां ॥ ५७५ ॥ अतिमहत्त्वें पूज्य गहन । ज्याचे सुर नर वेद बंदीजन । तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान । शिष्यासी जाण सर्वस्वें ॥ ५७६ ॥ गुरु ब्रह्म दोनी समान । हेंही वचन दिसे गौण । गुरुवाक्यें ब्रह्मा ब्रह्मपण । तेथें व्हावया समान भिन्नत्व नुरे ॥ ५७७ ॥ जैसा देवाचे ठायीं भावो । तैसाचि गुरुचरणीं सद्भावो । गुरुदेवांमाजीं पहा हो । भिन्नत्वभावो असेना ॥ ५७८ ॥ देवो पूजिल्या गुरु तोषे गुरु तोषे । गुरु पूजिल्या देवो संतोषे । दों नांवांचेनि हरुषें । स्वरूपें एकें वर्तती ॥ ५७९ ॥ सुवर्ण आणि कांकण । दों नांवीं एक सुवर्ण । तेवीं गुरु-ब्रह्मांमाजीं जाण । भीन्नपण असेना ॥ ५८० ॥ त्या सद्गुरुचें निजभजन । चित्तवित्तें अवंचन । गुरुचरणीं आत्मार्पण । करावें आपण सर्वेंसीं ॥ ५८१ ॥ तैसेचि साधु श्रोते सज्ञान । तेही मानावे सद्गुरुसमान । त्यांचेनि संवादें आपण । श्रवण कथन करवें ॥ ५८२ ॥ परस्परानुकथनं पावनं भगवद्यशः । मिथो रतिर्मिथस्तुष्टिर्निवृत्तिर्मिथ आत्मनः ॥ ३० ॥ तेथ करितां कथनुवादु । परस्परें निजात्मबोधु । करितां गुह्यज्ञानसंवादु । परमानंदु वोसंडे ॥ ५८३ ॥ एवं हरिकथेच्या आवडीं । परस्परें श्रद्धा गाढी । सुखसंवादपरवडी । निजसुखगोडी चाखिती ॥ ५८४ ॥ चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी । उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥ ५८५ ॥ भावें करितां अभेदभजन । भक्त पावती स्वानंद पूर्ण । त्या स्वानंदाचें निजचिन्ह । ऐक सांगेन नृपनाथा ॥ ५८६ ॥ स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथोऽघौघहरं हरिम् । भक्त्या सञ्जातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥ ३१ ॥ क्वचिद्रुदन्त्यच्युतचिन्तया क्वचिद् । धसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः । नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजं । भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृताः ॥ ३२ ॥ हरिकथेची महिमा कैसीं । आदरें पुसत्या-सांगत्यासी । होती पुण्याचिया राशी । पाप वोखदासी मिळेना ॥ ५८७ ॥ ज्याचिया नामस्मरणकरीं । सकळ पातकतें हरि हरी । तो स्वयें प्रगटला अंतरीं । पातकां उरी उरे कैंची ॥ ५८८ ॥ साधनरूपभक्तीच्या युक्तीं । पूर्ण सप्रेम उपजे भक्ती । ते भक्तीची निजस्थिती । ऐक चक्रवर्ती सज्ञाना ॥ ५८९ ॥ सद्भावें निजभजनकरीं । हृदयीं प्रगटतां श्रीहरी । तंव देहींचीं चिन्हें बाहेरी । क्षणामाझारीं पालटती ॥ ५९० ॥ परस्परें निजसंवादु । करितां जाहला स्वरूपावबोधु । नेत्रीं जळ अंगीं स्वेदु । प्राणस्पंदु पंगुळे ॥ ५९१ ॥ चित्तचैतन्यां होतां भेटी । हर्षे बष्प दाटे कंठीं । पुलकंकित रोमांच उठी । उन्मीलित दृष्टी पुंजाळे ॥ ५९२ ॥ करितां अच्युतचिंतन । सप्रेम गहिंवरे मन । अट्टहासें करी रुदन । अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वसें ॥ ५९३ ॥ त्या रुदनासवेंचि हर्ष प्रगटे । त्या हर्षाचेनि नेटेंपाटें । हांसो लागे कडकडाटें । सुखोद्भटें गदगदौनी ॥ ५९४ ॥ मीपणाचेनि अनुरोधेन् । गिळिलों होतों मोहमदें । तो सुटलों गुरुकृपावबोधें । तेणें परमानंदें डुल्लत ॥ ५९५ ॥ मी=माझेनि भवभानें । मज मी चुकलों मीपणें । मज मी भेटलों सद्गुरुवचनें । आनंदें तेणें उल्हासेन् ॥ ५९६ ॥ कैसें सद्गुरुवचन अलोलिक । म्यांचि माझें भोगिजे निजसुख । येणें आश्चर्यें देख । स्वानंदोन्मुख उल्हासे ॥ ५९७ ॥ संसारबागुलाचें । भय लागलें नेणों कैंचें । तें गुरुवाक्यें दवडिलें साचें । म्हणोनि नाचे निर्लज्ज ॥ ५९८ ॥ जेवीं माउली देखोनि डोळां । बालक नचे नानाकळा । तेवीं गुरुवाक्याचा सोहळा । देखोनि स्वलीळा निजभक्त नाचे ॥ ५९९ ॥ तेणें निजनृत्यविनोदें । फावलेनि निजबोधें । नानापरीचीं भगवत्पदें । सुखानुवादें स्वयें गातु ॥ ६०० ॥ तेणें कीर्तनकीर्तिगजरें । त्रैलोक्य सुखें सुभरे । परमानंदुही हुंबरे । सुखोद्गारें तुष्टोनी ॥ ६०१ ॥ तेंही सांडोनियां गाणें गर्जो लागे अतिसत्रणें । दुजें नाहीं नाहीं म्हणे । गाणें ऐकणें म्यां माझें ॥ ६०२ ॥ मीचि गाता मीचि श्रोता । माझें गाणें मीचि तत्त्वतां । जगीं मीचि एकुलता । द्वैताची कथा असोनि नाहीं ॥ ६०३ ॥ सद्भावें भगवत्परिचर्या । करितां पारुषे कर्मक्रिया । अहं-सोआं निरसोनियां । वृत्तिही लया जाय तेथें ॥ ६०४ ॥ एवं सप्रेम भक्तिसंभ्रमु । तेणें निरसे साधनश्रमु । फिटे निःशेष भवभ्रमु । वाचेसी उपरमु इंद्रियां होय ॥ ६०५ ॥ जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें । जेथ सुखही निजसुखामाजीं विरे । तें स्वरूप निर्धारें निजशिष्य होती ॥ ६०६ ॥ जेवीं बाळाचे लळे पाळणें । हे व्यालीचि वेदना जाणे । कां शिष्यांसी पूर्ण बोध करणें । तेथील कळवळणें सद्गुरु जाणे ॥ ६०७ ॥ बाळका लेवविल्या लेणें । जेवीं मऊली निवों जाणे । कां शिष्यसुखें सुखावणें । हें सद्गुरु जाणे परिपूर्णबोधें ॥ ६०८ ॥ इंद्रियें नेणती ज्याचें घर । जें मना वचना अगोचर । बुद्धीसि न कळे ज्याची मेर । ऐसी निर्विकार निजवस्तु ॥ ६०९ ॥ दृष्टीं दाविजे साक्षात । हातीं देइजे पदार्थ । तैसा नव्हे गा परमार्थ । तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्यां ॥ ६१० ॥ शिष्यासी करावया प्रबोध । बोधिता सद्गुरु अगाध । युआलागीं शिष्यसुखें स्वानंद । भोगी परमानंद गुरुरावो ॥ ६११ ॥ शिष्यासी आकळे परब्रह्म । तंव तंव निरसे त्याचा भ्रम । तेणें सद्गुरुसी परम । सुखसंभ्रम उल्हासे ॥ ६१२ ॥ सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥ ६१३ ॥ ऐसी शिष्यकृपेची कळकळ । ज्या सद्गुरूमाजी प्रबळ । तेणें भागवतधर्म हे सकळ । शिकावे अविकळ अनन्यश्रद्धा ॥ ६१४ ॥ इति भागवतान्धर्मान्शिक्षन्भक्त्या तदुत्थया । नारायणपरो मायामञ्जस्तरति दुस्तराम् ॥ ३३ ॥ ऐशी भागवतध्र्मस्थिति । शरण जाऊनि सद्गुरूप्रति । अभ्यासावी भगवद्भक्ति । तैं मायेची शक्ति बाधूं न शके ॥ ६१५ ॥ माया वेदशास्त्रां अनावर । ब्रह्मादिकां अतिदुस्तर । ते सुखें तरती भगवत्पर । हरिनाममात्र-स्मर्णार्थें ॥ ६१६ ॥ हरिनामाच्या गजरापुढें । माया पळे लवडसवडें । यालागीं तरणोपावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥ ६१७ ॥ परात्पर नारायणाची माया । भजतां नारायणाच्या पायां । सुखेंचि तरिजे गा राया । त्या भजनउपाया सांगितलें ॥ ६१८ ॥ मायातरणोपयस्थिति । राया तुवां पुशिली होती । तदर्थीं मुख्य भगवद्भक्ति । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ६१९ ॥ भक्तीपाशी नित्यतृप्ति । भक्तीपाशीं नित्यमुक्ति । भक्तीपाशींभगवत्प्राप्ति । मायानिवृत्ति हरिभजनेन् ॥ ६२० ॥ हरिभजननामकल्लोळें । माया जीवित्व घेऊन पळे । भक्त तरती बाळेभोळे । हरिभजनबळें महामाया ॥ ६२१ ॥ करितां नरायणाची भक्ती । निजभक्त सुखेन् माया तरती । ते नारायणाची मुख्य स्थिती । स्वयें चक्रवर्ती पुसतु ॥ ६२२ ॥ श्रीराजोवाच । नारायणाभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः । निष्ठामर्हथ नो वक्तुं यूयं हि ब्रह्मवित्तमाः ॥ ३४ ॥ सर्वां भूतीं भगवद्भावो । हा मुख्य मायातरणोपावो । । आइकोनि सुखावला रावो । तेणें आनन्दें पहा हो परब्रह्म पुसे ॥ ६२३ ॥ करितां नारायणाची भक्ति । उत्तम भक्त माया तरती । ते नारायणाची निजस्थिति । साक्षेपें नृपति पुसतु ॥ ६२४ ॥ ब्रह्म-परमात्मा-नारायण । वस्तूसीच म्हणणें जाण । ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण । राजा आपण पुसतु ॥ ६२५ ॥ सकळांमाजीं अधिष्ठान । सबाह्य ज्याचेनि परिपूर्ण । त्या स्वरूपातें नारयण । स्वयें वेदज्ञ बोलती ॥ ६२६ ॥ तुम्हांऐसे ज्ञाननिधि । भाग्यें जोडलेति त्रिशुद्धी । तुमच्या वचनामृतबोधीं । अहंबुद्धि उपजेना ॥ ६२७ ॥ तुमचिया वचनोक्तीं । वोसंडली स्वानन्दस्फुर्ति । लांचावली चित्तवृत्ती । श्रवणें तृप्ती कदा न मनीं ॥ ६२८ ॥ ऐकोनियां रायाचा श्रेष्ठ प्रश्न । प्रबुद्धाधाकुटा पिप्पलायन । तो बोलावया आपण । स्वानंदें पूर्ण सरसावला ॥ ६२९ ॥ श्रीपिप्पलायन उवाच । स्थित्युद्भवप्रलयहेतुरहेतुरस्य । यत्स्वप्नजागरसुषुप्तिषु सद्बहिश्च । देहेन्द्रियासुहृदयानि चरन्ति येन । सञ्जीवितानि तदवेहि परं नरेन्द्र ॥ ३५ ॥ अगा ज्याचेनि उपजे उत्पत्ति । ज्याचेनि संगें स्थितीसी स्थिति । ज्याचेनि प्रळया प्रळयशक्ति । ऐसा जो त्रिजगतीं मुख्य हेतु ॥ ६३० ॥ यापरी जो जगाचा हेतु । स्वयें स्वसत्ता हेरुरहितु । सच्चिदानंदें सदोदितु । तो जाण निश्चितु नारायणु ॥ ६३१ ॥ जेवीं सायंप्रातर्मध्यान्ह । तिहीं काळीं अलिप्त गगन । तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयीं जाण । अलिप्त नारायण परमात्मा ॥ ६३२ ॥ उत्पत्तिस्थितिप्रळयांत । म्हणसी कोण देखे येथ । तेचि अर्थींचा दृष्टांत । स्फुरदर्थ अवधारीं ॥ ६३३ ॥ जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । तिन्ही व्यापूनि समधीही परती । ज्याची साक्षित्वें स्फुरे स्फुर्ति । तो जाण निश्चितीं नारायण । ६३४ ॥ जागृतीचें जाणपण । स्वप्नाचें मिथ्या भान । सुषुप्तीचा साक्षी पूर्ण । तो नारायाण निश्चित ॥ ६३५ ॥ एवं परमात्मा परंज्योति । आत्मा हृदयस्थ त्रिजगतीं । त्यातें नारायण म्हणती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥ ६३६ ॥ ऐसी सांगतां ब्रह्मस्फूर्ति । अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ति । सहजें ब्रह्म आतुडे हातीं । ऐक त् उपपत्ति सांगेन ॥ ६३७ ॥ तरी परमात्मा ब्रह्म पूर्ण । तुझे हृदयीं नांदे आपण । ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें जाण वर्तती ॥ ६३८ ॥ नयनें तेणें तेजें देखणें । रसना तेणें स्वादें चाखो जाणें । श्रवण तेणें अवधानें शब्दज्ञानें प्रबोधती ॥ ६३९ ॥ तेणें अहंकारा अहंभाव । तेणेंचि मनासी मंतव्य । तेणेंचि चित्तसी चेतव्य । बुद्धीसि बोद्धव्य तेणें ब्रह्मावगोचें ॥ ६४० ॥ तेणें जड देह चेतन । तेणेंचि कळे मृदु कठीण । तेणेंचि चरणाच्या ठायीं गमन । करी कर ग्रहण त्याचिये सत्ता ॥ ६४१ ॥ त्याचेनि प्राण परिचरती । त्याचेनि निमिषोन्मेषस्फूर्ति । त्याच्या आनंदलेशस्थितीं । आनंद उपस्थीं भोगिती प्राणी ॥ ६४२ ॥ एवं चाळकु तो त्रिजगतीं । तो स्वानन्दें नांदे हृदयस्थितीं । त्यातें नारायण म्हणती । तोचि निश्चितीं परमात्मा ॥ ६४३ ॥ ज्याचेनि मन बुद्धि प्राण । इंद्रियें विचरती संपूर्ण । तो तूं म्हणसी त्यांआधिन । हें कल्पांतीं जाण कदा न घडे ॥ ६४४ ॥ तेथ जाणपणें जाणों जासी । तैं जाणावें तेंचि नेणसी । तेथ ज्ञातेपणें ज्ञानासी । स्वरूपापाशीं रिगू नाहीं ॥ ६४५ ॥ जाणीव आणि नेणीव । हे सोडूनि सर्व भाव । जैं उपजे स्द्भाव । तैं ब्रह्म स्वयमेवपाविजे ॥ ६४६ ॥ नैतन्मनो विशति वागुत चक्षुरात्मा । प्राणेन्द्रियाणि च यथानलमर्चिषः स्वाः । शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूलम् । अर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः ॥ ३६ ॥ वैकुंठ कैलास क्ष्राब्धी । मन कल्पी कल्पनीविधी । परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी । मनबुध्यादी सरेना ॥ ६४७ ॥ स्वयें कल्पीं त्रिभुवन । तें स्वरूपीं रिघों न शके मन । बुद्धि निश्चयात्मन पूर्ण । तीसही जाण अगम्य वस्तु ॥ ६४८ ॥ जें मन बुद्धिअगोचर । तें वाचेसी अति दुस्तर । वस्तु नव्हे शब्दगोचर । परात्पर ब्रह्म ॥ ६४९ ॥ मोटे बांधतां आकाशातें । चारी पालव पडती रिते । तेवीं शब्दें बोल्लवें वस्तूतें । तंव शब्द शब्दार्थें निर्धर्म ॥ ६५० ॥ प्राणाचेनि निज ढाळें । जे कां क्रियाशक्ति चळे । ते क्रियेसी वस्तु नातले । मा इंद्रियेनि आकळे कैसेनी ॥ ६५१ ॥ जेवीं थिल्लराआंतौता । बिंबोनि वोला नव्हे सविता । तेवीं मनगुद्धिइंद्रियांपरता । जाण तत्त्वतां परमात्मा ॥ ६५२ ॥ जो मनाचें अनादि मन । जो बुद्धीची बुद्धि सज्ञान । जो नयनाचे आदि नयन । जो श्रवणाचें श्रवण साधानत्वे ॥ ६५३ ॥ जो घ्राणाचें निजघ्राण । जो रसनेची रसना आपण । जो त्वच्चेची निजत्वचा पूर्ण । जीवाच जो जाण जीवु स्वयें ॥ ६५४ ॥ जो इंद्रियांचा प्रकाशिता । जो कर्म करोनि अकर्ता । तो इंद्रियीं इंद्रियार्था । विषयी सर्वथा हों नेणें ॥ ६५५ ॥ जेथ बुद्धीची दृष्टि न वळंघे । तेथे मन मनपणें केवीं रिघे । मा श्रवणनयनघ्राणयोगें । विषयसंयोगें केवीं भेटे ॥ ६५६ ॥ जेथ प्राणशक्ति न चले पुढें । जेथ वाचा स्वयें लाजिली मुरडे । मा कर्मेंद्रियांसी कोणीकडे । पवाडु पुढें जोडेल ॥ ६५७ ॥ अग्नीपासूनि आह्या अनेग । क्षणक्षणां निघती चांग । परी आह्यांमाजीं अग्नींचें अंग । सर्वथा प्रगटेना ॥ ६५८ ॥ कां सूर्यापासून सूर्यकांत । प्रकाशती असंख्यात । परी सूर्यकांताआंत । कदा भास्वत प्रगटेना ॥ ६५९ ॥ जेवीं सिंधूपासून तरंग । प्रकाशति अति अनेग । परी तरंगीं सिंधूचें अंग । सर्वथा साङ्ग पगटेना ॥ ६६० ॥ तेवीं ब्रह्मापासोनि करणें पकाशती अनेकपणें तरी त्या इंद्रियान् ब्रह्म जाणणें । हें जीवें प्राणें घडेना ॥ ६६१ ॥ जरी केळापासूनि केळी निपजे । कां साखरेपासूनि ऊंस उपजे । तरी इंद्रियीन् ब्रह्म जाणिजे । हें न ये निजवोजें ब्रह्मादिकां ॥ ६६२ ॥ आशंका ॥ शब्ददेवपरोक्षमति । ऐशी श्रुतिशास्त्र-उत्पत्ति । तेही मिथ्या वाटे वदंती ऽइसें तूं निश्चितीं मानिसी राया ॥ ६६४ ॥ तेही अर्थींचें निरूपण । ऐक राया सावधान । शब्द निमोनि आपण । दे ब्रह्मज्ञान जीवासी ॥ ६६५ ॥ पूर्वील श्लोकार्ध - शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूलम् । अर्थोक्तमाह यदृते न निषेधसिद्धिः ॥ जीवु सोडवावया होडा । शब्दें सवेग उचलिला विडा । तेणें घेतां तत्त्वांचा झाडा । आपणही पुढां निमाला ॥ ६६६ ॥ श्रुति नेते नेति येणें शब्दें अतद्व्यावृत्तिमिषेधबोधें । परी साक्षात् वेदानुवादें । निज वस्तु शब्दें न बोलवे ॥ ६६७ ॥ शब्दासी जें वाच्य नोहे । तेंचि परब्रह्म जाणावें । तेथील जो खुणे पावे । तो ब्रह्म सद्भावें स्वयें होय ॥ ६६८ ॥ श्रुति नेति नेति येणें वचनें । शब्द निषेधूनि वस्तु दावणें । शब्दीं निःशब्द जो लक्षूं जाणे । तेणें पावणें परब्रह्म ॥ ६६९ ॥ शब्दु निजनिषेधें जें बोधी । तेथ समरसे ज्याचि बुद्धि । तेंचि परब्रह्म गा त्रुशुद्धि । निषेधावधि तो ठावो ॥ ६७० ॥ शब्द निमोनि सर्वशक्तिं । जीवासी दे ब्रह्मप्राप्ति । शब्दादेवापरोक्षेति । जाण निश्चितीं या नंव ॥ ६७१ ॥ वाच निःशेष निवर्ते । मन बुद्धि न पवे जेथें । तेचि अवधि निषेधातें । परब्रह्म त्यातें बोलिजे ॥ ६७२ ॥ जें वाचेचें वदवितें । परी वाचा वदों न शके ज्यातें । जें मनबुद्ध्यादिकां जाणतें । परी मन बुद्धि ज्यातें नेणती ॥ ६७३ ॥ जें नयनातें दाखवितें । परी नयन न देखती ज्यातें । जें श्रवणघ्राणांतें चेतवितें । परी श्रवण घ्राण ज्यातें नेणती ॥ ६७४ ॥ एवं सर्वांचें जाणतें । परी सर्व सर्वथा नेणे ज्यातें । ज्यासी जाणावयालागीं येथें । आणिक जाणतें असेना ॥ ६७५ ॥ ऐसें स्वसंवेद्य निजज्ञातें । ज्यासी दुजें नाहीं जाणतें । शब्द रिघावया तेथें । रिगमु त्यातें असेना ॥ ६७६ ॥ जें कृश ना पुष्कळ । जें वक्र ना वर्तुळ । जें सूक्ष्म ना नव्हे स्थूळ । वस्तु केवळ निर्विकार ॥ ६७७ ॥ ज्यासी नाहीं रूपगुण । ज्यासी नाहीं आश्रमवर्ण । ज्यासी नाहीं मीतूंपण । ज्यासी जन्म-मरण असेना ॥ ६७८ ॥ जें हळुवट ना गहिंस । जें चिवळ ना स्पोस । जें वसतें ना वोस । जें का निःशेष निर्धर्म ॥ ६७९ ॥ जें र्हस्व ना मोठें । जेन् वडील ना धाकुटें । जें विचारितां विवेकवाटे । विवेकुही आटे निःशेष ॥ ६८० ॥ ज्यासी आदि ना अंतु । जे मध्यस्थितीरहितु । जें गुण ना गुणातीतु । अच्युतानंतु अद्वयत्वें ॥ ६८१ ॥ त्या स्वरूपाचा वचनपाठ । करावया वेदें केली खटपट । तेथ श्रुतीचाही बोभाट । लाजिला करूनि कष्ट नेतिनेतिवादें ॥ ६८२ ॥ वेदु काय नेणोनि परतला । जाणोनि न बोलिवेचि बोला । याचिलागीं तो मौनावला । तटस्थ ठेला निःशब्दें ॥ ६८३ ॥ वेदें धरितां दृढ मौन । शास्त्रें भांबावलीं जाण । तिहीं धरोनि मताभिमान । करिती वल्गन अतिवादें ॥ ६८४ ॥ शब्दांतीं ब्रह्मज्ञान । हे वेदें पावोनि पूर्ण खूण । शब्दें शब्द निषेधून । दृढ मौन तेणें धरिलें ॥ ६८५ ॥ वेदरायें धरितां मौन । शास्त्रें भांबावलीं जाण । शोधितां शब्दांचें रान । निजसमाधान न पावती ॥ ६८६ ॥ ज्यासी शब्दांतीं ब्रह्मप्राप्ति । त्यासी दर्शनें ऐक्या येती । शास्त्रें स्वयेंचि समजतीं । ऐक्यें त्रिजगती आभासे ॥ ६८७ ॥ ब्रह्म एकाकी अद्वय स्थिति । तुवांचि दाविली उपपत्ति । तेथें ऐक्यरूपें त्रिजगती । म्हणसी कवणाप्रती आभासे ॥ ६८८ ॥ ज्याची तुटली वासनाफांसिटी । विराली अहंकाराची गांठी । प्रारब्ध उतरलें देहाचे तटी । त्यासी ऐक्यें सृष्टी आभासे ॥ ६८९ ॥ त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी । सांगावया उल्हास पोटीं । पिप्पलायनि स्वानंदतुष्टी । ब्रह्मैक्यें सृष्टी वाखाणी ॥ ६९० ॥ सत्त्वं रजस्तम इति त्रिवृदेकमादौ । सूत्रं महानहमिति प्रवदन्ति जीवम् । ज्ञानक्रियार्थफलरूपतयोरुशक्ति । ब्रह्मैव भाति सदसच्च तयोः परं यत् ॥ ३७ ॥ ब्रह्मनिजऐक्यपरिपाटी । प्रपंदु ब्रह्मत्वेंचि उठी । संतासंत सकळ सृष्टी । देखती दृष्टीं ब्रह्मरूप ॥ ६९१ ॥ जेवीं नभीं नीळिमेचें भान । तेवीं ब्रह्मीं माया नांदे संपूर्ण । नवल तियेचें विन्दान । नपुंसका जाण पुरुषत्व केलें ॥ ६९२ ॥ अगाध तिचा पतिव्रताधर्म । नपुंसकीं उपजवी काम । अनाम्या ठेवी नाम । कीं निष्कर्मा कर्म तिचेनी ॥ ६९३ ॥ निःसंगसंगा रातली । स्पर्शेंवीण गुर्विणी झाली । प्रधान-महत्तत्त्वें गर्भा आली । तेथ त्रिगुणातें व्याली विकारयुक्त ॥ ६९४ ॥ विद्याअविद्या निजस्वभावीं । जीवशिवांची भेदपदवी । प्रिया पुरुषातें भोगवी । ज्ञाना-ज्ञानगांवीं वसोनियां ॥ ६९५ ॥ जेवीं सुवर्णीं अलंकार । तंतूमाजीं पटाकार । भिंतीवरी भासे चित्र । तेवीं माया साकार ब्रह्मीं भासे ॥ ६९६ ॥ मृत्तिकेची गोकुळें केलीं । नाना नामाकारीं जरी पूजिलीं । तरी मृत्तिकाचि संचलीं । तेवीं ब्रह्मीं भासलीं जगद्रूपें माया ॥ ६९७ ॥ जैशा घृताच्या कणिका । घृतेंसीं नव्हतीं आणिका । तेवी ब्रह्मीं मायाशक्ति देखा । दावी अनेका अर्थांतें ॥ ६९८ ॥ ब्रह्म पुर्वीन् एकाकी एक । तेंचि केवीं झालें अनेक । तो मायायोगपरिपाक । विशद अर्थ देख पिप्पलायनु सांगे ॥ ६९९ ॥ मुळीं मुख्य ब्रह्म ओंकार । तें एकचि झालें त्रिप्रकार । आकार-उकार-मकार । सत्त्वादि विकार गुणत्रयात्मक ॥ ७०० ॥ गुणत्रय समसमान । त्या नांव बोलिजे प्रधान । तेंचि क्रियाशक्ति सूत्र जाण । तेथें प्रगटल्या ज्ञान महत्तत्त्व म्हणती ॥ ७०१ ॥ अहंब्रह्म हे पूर्णफुर्ति । तें अहं आलें देहाकृती । देहाभिमानें निश्चितीं । जीव म्हणती वस्तूतें ॥ ७०२ ॥ क्रिया म्हणिजे दशधा करणें । ज्ञान शब्दें चेवताधिष्ठानें । अर्थ ऐसें विषयांसी म्हणणें । तेथ फळ जाणणें सुखदुःख ॥ ७०३ ॥ गुण-भूतें-विषय-करणें । जीव भोक्ता सुखदुःखपणें । ज्ञान क्रिया कर्माचरणें । हें सर्वही जाणणें पूर्ण ब्रह्म ॥ ७०४ ॥ साखरेचा फणस प्रबळ । तेथें कांटे त्वचा बीजगोळ । अवघी साखरचि केवळ । तेवीं ब्रह्मचि सकळ जगदाकारें ॥ ७०५ ॥ जेवीं पाटाऊ पुतळीकृत । तेथ विषमावयवीं समान सूत । तेवीं जगदाकारें आकारवंत । दिसे अविकृत परब्रह्म ॥ ७०६ ॥ जग-विश्व-प्रपंचु नाम । परी ते निखळ परब्रह्म । हा उपनिषदार्थ उत्तम । वेदांती परम परमार्थु तो हा ॥ ७०७ ॥ जगदकारें ब्रह्म निश्चित । जग अवघें विकारवंत । तैं ब्रह्मासही विकार प्राप्त । म्हणती तो अर्थ न घडे राया ॥ ७०८ ॥ नात्मा जजान न मरिष्यति नैधतेऽसौ । न क्षीयते सवनविद्व्यभिचारिणां हि । सर्वत्र शश्वदनपाय्युपलब्धिमात्रं । प्राणो यथेन्द्रियबलेन विकल्पितं सत् ॥ ३८ ॥ ब्रह्मासी नाहीं माता पिता । यालागीं न घडे जन्मकथा । आत्मा एकदेशी होता । तरी जन्मा येता जनजीजठरा ॥ ७०९ ॥ आत्म्यावेगळा कांहीं । तिळभरी ठावो रिता नाहीं । यापरी पूर्णत्वें पाहीं । जन्म ते ठायीं स्पर्शेना ॥ ७१० ॥ जन्मापूर्वीं । बाळाचें नास्तिक्य । जन्मापाठीं मानिती आस्तिक्य । या अस्तिनास्तीची भाख । आत्म्यासी देख असेना ॥ ७११ ॥ आतां आहे पूर्वीं नाहीं । ऐसें आस्तिक्य आत्म्याचे ठायीं । कदाकाळीं न रिघे कांहीं । तो नित्य पाहीं निरंतर ॥ ७१२ ॥ तेहीं जन्मल्या बाळकासी । वाढी दिसे दिवसदिवसीं तो बाळजन्म नाहीं आत्म्यासी । यालागीं वृद्धि त्यासी घडेना ॥ ७१३ ॥ ज्यासी वृद्धि नाहीन् तत्त्वतां । त्यासी न ये विपरिणमता । बाल्य तारुण्य वृद्धावश्था । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ७१४ ॥ जो मी बाळत्वें होतों धाकुटा । तोचि मी तार्य्ण्यें जाहलों मोठा । तो मी वृद्ध जाहलों कटकटा । ऐसा त्रिकाळद्रष्टा परमात्मा ॥ ७१५ ॥ द्रष्टा । साक्षी जो अवस्थातीत । तो कदा नव्हे अवस्थाभूत । देहीं असोनि अवस्थारहित । जाण तो निश्चित परमात्मा ॥ ७१६ ॥ निरवस्थ आत्मा अविकारी पूर्ण । त्यासी कदा न ये क्षीणपण । ज्यासी जन्मचि नाहीन् जाण । त्यासी मरण असेना ॥ ७१७ ॥ तो अविकारी निरवस्थ पूर्ण । ज्यासी नाहीं जन्ममरण । ऐसा त्य्य्ं आत्मा म्हणशील कोण । तरी जाण सर्वज्ञ ज्ञानस्वरूप ॥ ७१८ ॥ म्हणसी ज्ञानही क्षणिक असे । घटज्ञानें पटज्ञान निरसे । तेथ इंद्रियार्थवृत्तिचि नासे । ज्ञान जैसें तैसें अविनाशी ॥ ७१९ ॥ तेचि अर्थींचा पूर्ण चृष्टांत । जेवीं प्राण देहातें वाढवीत । तों देहोचि होय अवस्थाभूत । प्राण निरवस्थ जैसा तैसा ॥ ७२० ॥ प्राणु देहातें चाळितां । त्यासी न बाधी देहावस्था । आत्मा प्राणातें चेतविता । त्यासी देहावस्था असेना ॥ ७२१ ॥ येणें चि प्राणदृष्टांतें साधूनि घ्यावें परब्रह्मातें देहेंद्रियवेगळें आत्म्यातें । पुढील श्लोकार्थें प्रबोधी ॥ ७२२ ॥ अण्डेषु पेशिषु तरुष्वविनिश्चितेषु प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र । सन्ने यदिन्द्रियगणेऽहमि च प्रसुप्ते कूटस्थ आशयमृते तदनुस्मृतिर्नः ॥ ३९ ॥ अंडज स्वेदज जारज । चौथें जाण गा उद्भिज । त्यांचे ठायीं प्राणु सहज । आत्मयोगें सद वर्ते ॥ ७२३ ॥ प्राणयोगें आत्मा वर्ततां । त्यासी जीव म्हणती तत्त्वतां । त्या प्राणासी न बाधिती देहावस्था । मा जीवाचे माथां त्या कैंच्या ॥ ७२४ ॥ देहेंद्रियामाजीं वर्ततां । आत्मा अलिप्त देहावस्था । तो कैसा म्हणती आतां । ऐक त्याही दृष्टांता सांगेन ॥ ७२५ ॥ आत्मा जागृतिदेहीं वर्ते । तैं सविकार मानिती त्यातें । तोचि सांडूनि देहेंद्रियांतें । स्वप्नीं वर्ते पूर्वानुध्यासें ॥ ७२६ ॥ देहेंद्रियाविहीन । केवळ लिंगदेह जाण । निजात्मा देखे स्वप्न । जागृत्यभिमानसंकल्पें ॥ ७२७ ॥ तें उपरमल्या स्वप्न । देहाभिमान झालिया लीन । सवविकारविहीन । सुषुप्तिकाळीं पूर्ण परमात्मा उरे ॥ ७२८ ॥ देहेंद्रियासीं अभिमान लीन । कोणीही स्फुरेना स्फुरण । तरी तें झालें सर्व शून्य । आत्मा चिद्घन नाहीं म्हणसी ॥ ७२९ ॥ जरी सुषुप्तीसी आत्मा नाहीं । तरी सुखें निजेलों होतों पाहीं । हें उपजे ज्याच्या ठायीं । तो सर्वथा नव्हे कहीं शून्य ॥ ७३० ॥ जो मी जागृतीं जागता । तोचि मी स्वप्नातें देखता । तोचि मी सुषुप्तीं सुखभोक्ता । एवं तिहीं अवस्था साक्षी जो ॥ ७३१ ॥ गो अवस्थात्रयीं साक्षी पूर्ण । तो सर्वथा नव्हे शून्य । तोचि परमात्मा परिपूर्ण । शुद्ध चिद्घन तो राया ॥ ७३२ ॥ सुषुप्तीं ब्रह्मानुभवो आहे । तरी कां पुढतीं संसारु पाहे । तेथ अविद्येसीं अहं लीन राहे । यालागीं होये भवभ्रमु ॥ ७३३ ॥ तें अविद्या अहंकारेंसी नाशे । तैं जगद्रूपें ब्रहचि भासे । जन्ममरणांचा ठावोचि पुसे । जीव समरसे परब्रह्मीं ॥ ७३४ ॥ तेथ हेतुमातु दृष्टां । प्रमाण-प्रमेय विवर्जित । परमात्मा सदोदित । परब्रह्म निश्चित परमानंदें ॥ ७३५ ॥ तेथ सुखावरी सुख नांदे । आनंदु भोगिजे आनंदें । जग दुमदुमी परमानंदें । स्वानंद बोधें संपूर्ण ॥ ७३६ ॥ निरसोनियां निजमाया । ऐसा अनुभवो मुनिवर्या । कैं होईल म्हणसी राया । तैं भजावें यदुवर्या निष्कामभावें ॥ ७३७ ॥ यर्ह्यब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या । चेतोमलानि विधमेद्गुणकर्मजानि । तस्मिन्विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं । शाक्षाद्यथामलदृशोः सवितृप्रकाशः ॥ ४० ॥ निर्विकारस्वरूपप्राप्ति । अवश्य पावणें आहे चित्तीं । तैं करावी भगवद्भक्ति । उत्कटा प्रीति अविश्रम ॥ ७३८ ॥ त्यजूनि पुत्रवित्तेषणेचें काज । जिणौनि लौकिकाची ।आज । पद्मनाभभजनाचें भोज । अतिनिर्लज्ज नाचावें ॥ ७३९ ॥ पुत्रवित्तलोकेषणा । त्यजूनि भजतां हरिचरणां । तंव तंव चित्ताचे चैत्यमळ जाणा । क्षणक्षणां नासती ॥ ७४० ॥ रजतमादि कर्मज मळ । चित्तीं बैसले जे सबळ । ते प्रक्षाळती सकळ । भक्तिप्रेमजळक्षाळणें ॥ ७४१ ॥ जंव जंव थोरावे सप्रेम भक्ति । तंव तंव पाया लागे विरक्ति । स्वयें विरमे विषयासक्ति । होय चित्तवृत्ति निर्मळ ॥ ७४२ ॥ निर्मळ जाहलिया चित्तवृत्ति । परमात्मया सर्व भूतीं । भजों लागे अनन्यप्रीतीं । हे चौथीं भक्ति उदार ॥ ७४३ ॥ ये भक्ति अतिशयें उदार । निर्दाळी भक्तांचा अहंकार । उद्धरी सुर नर स्त्रिया शूद्र । आनंदनिर्भर करी जीवु ॥ ७४४ ॥ हे भक्ति जैं लागे हातीं । तैं भवभयाची निःशेष शांति । पायां लागती चारी मुक्ती । ऐशी उदार भक्ति ह्जरीची ॥ ७४५ ॥ जेवीं डोळां असतां पडळ । सविता उगवे सर्व काळ । तो सन्मुख न देखे रविमंडळ । मा पदार्थ सकळ त्या कैंचे ॥ ७४६ ॥ तेंचि फिटलिया पडळ । दृष्टी होय अतिनिर्मळ । देखों लगे पदार्थ सकळ । रविमंडळसमन्वयें ॥ ७४७ ॥ तेवीं निजात्मा हृदयीं वसे । परी चित्तवृत्ति मळिण असे । तंव परब्रह्म न प्रकाशे । चित्त वासनादोषें दूषित ॥ ७४८ ॥ तेथ करितां भगवद्भक्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति । तेव्हां निर्विकारस्वरूपप्राप्ति । भक्त पवती निजभजनें ॥ ७४९ ॥ पावावया परमप्राप्ति जगीं दाटुगी भगवद्भक्ति । ते म्यां सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं नृपनाथा ॥ ७५० ॥ जेवीं डोळ्यांचे पडळ फिटे । तेथ प्रकाशेंसीं सविता भेटे । तेवीं कल्पनालोपें प्रगटे । नेटेपाटें परब्रह्म ॥ ७५१ ॥ जेथ निर्विकल्प समान । निश्चयेंसीन् जाहलें मन । त्यासी देहीं वर्तांही जाण । भवबंधन स्पर्शेना ॥ ७५२ ॥ ऐसें गर्जोनिया जाण । हर्षें बोले पिप्पलायन । तंव राजा सुखावला संपूर्ण । जीवींची खूण बाणली ॥ ७५३ ॥ ऐकतां ब्रह्मनिरूपण । राजा लांचावला पूर्ण । पुढें वाढावया निरूपण । अन्वयें प्रश्न पुसतसे ॥ ७५४ ॥ जेणें तुटे कर्मबंधन । त्या कर्मयोगाचें लक्षण । समूळ ऐकावया जाण । राजा आपण सादरें पुसतु ॥ ७५५ ॥ श्रीराजोवाच । कर्मयोगं वदत नः पुरुषो येन संस्कृतः । विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विन्दते परम् ॥ ४१ ॥ राजा निजश्रद्धासंपन्न । अतिविनीत करी प्रश्न । जेणें तुटे कर्मबंधन । तो कर्मयोग संपूर्ण सांगा स्वामी ॥ ७५६ ॥ कोणें कर्में कर्म तुटे । नैष्कर्म्यासिद्धि स्वयें प्रगटे । पुरुषा पुरुषोत्तम भेटे । हें मज गोमटें वर्म सांगा ॥ ७५७ ॥ एवं प्रश्नमृषीन्पूर्वमपृच्छं पितुरन्तिके । नाब्रुवन्ब्रह्मणः पुत्रास्तत्र कारणमुच्यताम् ॥ ४२ ॥ पूर्वीं हाचि प्रश्नु सनकादिकां । पित्यासन्निध पुशिला देखा । ते उत्तर नेदितीचि कां । हेही आशंका फेडावी स्वामी । रायाचे प्रश्न अतिपवित्र । त्यांचें द्यावया प्रतिउत्तर । हरिखावला आविर्होत्र । तो कर्मवैचित्र्य निरूपी ॥ ७५९ ॥ श्रीआविर्होत्र उवाच । कर्माकर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः । वेदस्य चेश्वरात्मत्वात्तत्र मुह्यन्ति सूरयः ॥ ४३ ॥ कर्माकर्मविकर्म जाणा । सामान्य नव्हे नृपनंदना । करितां विभागविवंचना । नुगवे सज्ञानां स्मृतिकारांसी ॥ ७६० ॥ जे स्वयें प्रतिसृष्टिकारी । तेही भुलले कर्मविभागावरी । जे समुद्र घोंटिती चुळेकरीं । तेही कर्मसगरीं बुडले ॥ ७६१ ॥ येचि कर्मविवंचनेसाठीं । ऋषिमर्षींचिया कोटी । मताभिमानें झालें हिंपुटी । त्यांसीही शेवटीं नुगवेचि ॥ ७६२ ॥ कर्माकर्मविभाग जाणा । स्वयें नुगवेचि चतुरानना । इतरांची कोण गणना । कर्मविवंचना करावया ॥ ७६३ ॥ कर्म वेदमूळ जाण । वेदु स्वयें नारायण । वेदवादविवंचन । करितां मौन श्रुतिशास्त्रा ७६४ ॥ कर्म-अकर्म-विकर्म जाण । एकचि परी त्रिविध भिन्न । तेंही विभागविवंचन । सावधान अवधारीं ॥ ७६५ ॥ श्वेत मृदु मधुर । त्रिविधभेदें एक साखर । तेवीं एकचि त्रिप्रकार । कर्मठ नर मानिती कर्म ॥ ७६६ ॥ भिन्न करितां मधुरता । तीमाजीं ये मृदु-श्वेतता । श्वेततचि भिन्न करितां । मृदु-मधुरतं तीमाजीं ॥ ७६७ ॥ तेवीं भिन्न करितां कर्म । कर्मा सर्वांगीं अकर्म । कर्म अकर्मामाजी विकर्म । मिरवे परम सौभाग्यें ॥ ७६८ ॥ मुख्य मूळीं जें कां निपजे । कर्म ऐसें त्यातें म्हणिजे । विहिताविहितक्रिया जे जे । विकर्म म्हणिजे तिये नांव ॥ ७६९ ॥ कर्म अकर्मयोगें चळे । ऐसें विकर्मीं ज्यासी विवळे । त्यास निष्कर्मता आकळे । गुरुकृपाबळें तत्काळ ॥ ७७० ॥ कर्मावरी कर्म विशेष वाढे । विकर्म त्यातें म्हणणें घडे । जेथें कर्म रिघों न शके पुढें । अकर्म चोखडें या नांव ॥ ७७१ ॥ ऐशी कर्मविवंचना अटक । हा प्रश्न केला तैं तूं बाळक । त्याचिलागीं गा राया देख । सनकादिक न सांगितीचि ॥ ७७३ ॥ कर्माकर्मविवंचना । अधिकारेंवीण कोणा । सांगों नये नृपनंदना । कर्म सज्ञाना अतिदुर्बोध ॥ ७७३ ॥ परोक्षवादो वेदोऽयं बालानामनुशासनम् । कर्ममोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदं यथा ॥ ४४ ॥ जेवीं रोगु जावया निश्चित । बापु बाळा भेषज देत । तेथें साखर घाली हातांत । तत्सेवनार्थ प्रलोभें ॥ ७७४ ॥ तेवीं वेदांचा परोक्षवाद । सत्य मानिती बुद्धिमंद । कर्में छेदवी कर्मबाध । हा वेदानुवाद मुख्यत्वें ॥ ७७५ ॥ वेदु बोले स्वर्गादि फळ । तो प्रवृत्तिलोभ केवळ । परी कर्में छेदी कर्ममूळ । हें मुख्यत्वें फळ वेदोक्तीं ॥ ७७६ ॥ लोहाची बेडी पडली पायीं । ते तोडावया घणु आणिला पाहीं । तो घणुचि विकून खादला जिहीं । त्यांचें बंधन कहीं तुटेना ॥ ७७७ ॥ तेवीं कर्में छेदावें कर्मबंधन । तें कर्म वेंचिती विषयीं पूर्ण । त्यांचें कदा न तुटे भवबंधन । जन्ममरण सरेना ॥ ७७८ ॥ आम्ही स्वर्गफळा विरक्त । म्हणोनि नाचरे जो वेदोक्त । त्याचें ज्ञान जालें विपरित । अति अनर्थ पावे तो ॥ ७७९ ॥ नाचरेद्यस्तु वेदोक्तं स्वयमज्ञोऽजितेन्द्रियः । विकर्मणा ह्यधर्मेण मृत्योर्मृत्युमुपैति सः ॥ ४५ ॥ आम्ही जितेंद्रिय म्हणवीत । म्हणोनि नाचरे जो वेदेक्त । त्यासी नातुडे गा परमार्थ । अतिअनर्थ अंगीं वाजे ॥ ७८० ॥ जरी शास्त्रज्ञ ज्ञाता झाला । आणि वेदोक्ता विमुख ठेला । तरी तो जाणपणेंचि नागवला । जाण बुडाला दुःखार्णवीं ॥ ७८१ ॥ नाचरे जो वेदोक्त कर्म । त्यक्तकर्में मानी मिष्कर्म । त्यासी थोरपडला भ्रम । नाडला परम अभिमानें ॥ ७८२ ॥ जरी विषयो निग्रहिल । आनि वेदोक्ता जो दुरावला । तो निजघाता प्रवर्तला । स्वयें बुडाला नरकार्णवीं ॥ ७८३ ॥ वेद निज्मूळ परमार्था । तें वेदोक्त नाचरतां । जें जें करणें न्६इपनाथा । त्ं तें तत्त्वतां अधःपाती ॥ ७८४ ॥ डोळे देखणें तत्त्वतां । ते काढोनि पाहो जातां । न देखे आपुली डोळसता । मा इतर पदार्था कोण देखे ॥ ७८५ ॥ तैसा नाचरोनि चेदार्थु । जो जो मानिला परमार्थु । तेणें आंवतूनियां अनर्थु । जाण निश्चितु आणिला घरा ॥ ७८६ ॥ तेणें आचार अनर्थपाटें । वाहावले जन्ममरणवाटे । तेथ नानायोगिनिगर्भसंकटें । सोसितां न सुटे कल्पांतीं ॥ ७८७ ॥ तेथें जन्मजन्मों जन्म न टके । मरमरों मरण न चुके । जैं वेदविहित चुके । तैं अतिदुःखें दुःखभोगु ॥ ७८८ ॥ विकर्मणा ह्यधर्मेण । हें मूळींचें पदनिरूपण । तेणें विकर्मामाजीं अध्र्म पूर्ण । परी अकर्म तें जाण अधर्म नव्हे ॥ ७८९ ॥ ज्यासी लावितां न लागे कर्म । या नांव मुख्य निष्कर्म । निष्कर्मलक्षण हाचि धर्म । येणेंचिपरम मुक्त साधु ॥ ७९० ॥ ज्यासी शुद्ध आकळे अकर्म । तो तत्काळ होय निष्कर्म । अकर्माचें कळल्या वर्म । मुक्तता परम पायां लागे ॥ ७९१ ॥ वेदोक्तमेव कुर्वाणो निःसङ्गोऽर्पितमीश्वरे । नैष्कर्म्यं लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः ॥ ४६ ॥ दासी सामीची आज्ञाधारी । कां राजमुद्रा प्रजांवरी । तैसी वेदाज्ञा जो शिरीं धरी । स्वधर्माची निष्काम ॥ ७९२ ॥ मी एकु कर्मकर्ता । ऐशी उठों नेदी अहंता । तें कर्मचि स्वभावतां । अर्पीं श्रीअनंता ईश्वरातें ॥ ७९३ ॥ एवं ईश्वरीं जें अर्पे कर्म । तें कर्म होय निर्धर्म । याचि नांव परम । नैष्कर्म्य निजसिद्धी ॥ ७९४ ॥ वेदें बोलिले कर्मफळ । ज्याची वासना निष्काम निर्मळ । त्यासि वेदोक्त फळ प्रबळ । भोगावया केवळ स्वप्नीं न दिसे ॥ ७९५ ॥ ऐसें असतां कर्मफळ । वांछितां नाडिजे केवळ । जेवीं परिसु देऊनि सोज्ज्वळ । मगिजे पोफळ ता।म्बूलासी ॥ ७९६ ॥ कर्मा निष्कामता नित्य फळ । तेथ फळाशा नाडले सकळ । चंदन सर्वांगीं सफळ । तेथ मागतां फळ नाडिजे स्वयें ॥ ७९७ ॥ हातिं आंतुडावया मासा । गळीं लाविजे अल्प आमिषा । तेवीं निष्काम करावया मानसा । वेदु फळाशा प्रलोभी ॥ ७९८ ॥ आमिष घालूनि मासे पाळी । किं तद्योगें जळाबाहेरी गळी । तेवीं कर्म कर्मातें निर्दाळी । हें नेणिजे मुळीं फळकामी ॥ ७९९ ॥ हो कां फळाचिये चाडे । स्वधर्मकर्मीं प्रवृत्ति घडे । तेणें नैष्कर्म्यसिद्धि आंतुडे । हें वेदाचे फुडें निजगृह्य ॥ ८०० ॥ कर ब्रह्मत्वें सदा सफळ । फळ वांछी त्यातें निष्फळ । हें जाणोनि कर्मकुशळ । फळाशा समूळ छेदिती ॥ ८०१ ॥ ऐसें आचरतां वैदिक कर्म । तेणें कर्में पाविजे नैष्कर्म्य । याहोनियां अति सुगम । सांगेन वर्म तें ऐक ॥ ८०२ ॥ य आशु हृदयग्रन्थिं निर्जिहीऋषुः परात्मनः । विधिनोपचरेद्देवं तन्त्रोक्तेन च केशवम् ॥ ४७ ॥ जेणें वासनेचें जाळ तुटे । अहंकारची गांठी सुटे । जीवीं परमात्मा स्वयें प्रगटे । तें तांत्रिक गोमटें ऐक रया ॥ ८०३ ॥ जया तांत्रिक महापूजा । संतोष होय गरुडध्वजा । तें तांत्रिक विधान बोजा । महाराजा अवधारीं ॥ ८०४ ॥ वैदिक मंत्र त्रांत्रिक तंत्र । हे मिश्रपूजा अतिपवित्र । शीघ्र निष्काम करी नर । तो पूजाप्रकार अतिउत्तम ॥ ८०५ ॥ वैदिक अथवा तांत्रिक । गुरुमार्गें सिद्धिदायक । यालागी गा आब्वश्यक । सद्गुरुसी देख शरण जावें ॥ ८०६ ॥ लब्ध्वानुग्रह आचार्यात्तेन सन्दर्शितागमः । महापुरुषमभ्यर्चेन्मूर्त्याभिमतयात्मनः ॥ ४८ ॥ प्रवृत्तिनिवृत्तिकृत कार्या । अवश्य पाहिजे आचार्या । आपमतीं भजतां राया । अनेक अपायांमाजीं पडे ॥८०७ ॥ भोयी पाय सिद्ध आहेती । भोयाळेंवीण वृथा भ्रमती । तेवीं गुरूवीण जे जे करिती । ते ते अहंमती दृढ भ्रमले ॥ ८०८ ॥ गुरु ब्रह्म दोनी ऐक । ऐशिया भावना आवश्यक । सेवा करूनि भावपूर्वक । संतोषवूनि देख अनुग्रहो घ्यावा ॥ ८०९ ॥ तेथ निजाधिकारप्राप्तें । जे मूर्ति आवडेल आपणियातें । तेचि मंत्रविद्या तेथें श्रद्धासंभरितें अंगीकारावी ॥ ८१० ॥ तेव्हां गुरुमुखें मिश्र वोजा । पुरुषोत्तममहापूजा । शिकोनियां निजकाजा । भजावें अधोक्षजा शिक्षिता मतीं ॥ ८११ ॥ ते चि भजती हातवटी । आगमोक्त निजपुष्टी । राया सांगेन गोमटी । सावधानदृष्टीं अवधारीं ॥ ८१२ ॥ शुचिः सम्मुखमासीनः प्राणसंयमनादिभिः । पिण्डं विशोध्य सन्न्यास कृतरक्षोऽर्चयेद्धरिम् ॥ ४९ ॥ विध्युक्त करितां संध्यास्नान । तेथचि आहे ब्रह्मज्ञान । आचमनीं होय हरिरूप आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भरती ॥ ८१३ ॥ केशवदी नामीं जाण । अंगप्रत्यंगीं न्यासितां पूर्ण । तेव्हां हरिरूप होय आपण । हें नेणोनि अज्ञान आगमीं भारती ॥ ८१४ ॥ करूनि आगमोक्त संध्यास्नान । मूर्तीपासीं येऊन जाण । संमुख घालावें आसन । चैलाजिनकुशयुक्त ॥ ८१५ ॥ र्चक-पूरक-कुंभकें जाण । प्रणायामें प्राणसंयमन । भूतशुद्ध्यादिकीं जाण । शरीरशोधन करावें ॥ ८१६ ॥ भूतविलय भूतशुद्धी । प्राणप्रतिष्ठा पिंडादिशुद्धी । मूळमंत्रें न्यास प्रबुद्धीं गुरुदीक्षाविधी विध्युक्त कीजे ॥ ८१७ ॥ हृदय कवच शिखा शिर । नेत्रे अस्त्रादि फळ्कार । एवंविधान अनुकार । आगमोक्तप्रकार करावे न्यास ॥ ८१८ ॥ यापरी मूळमंत्रदीक्षा । करोनि दिग्बंधनादि संरक्षा । मग मूर्तिपूजनपक्षा । नृपाध्यक्षा अवधारीं ॥ ८१९ ॥ अर्चादौ हृदये चापि यथालब्धोपचारकैः । द्रव्यक्षित्यात्मलिण्गानि निष्पाद्य प्रोक्ष्य चासनम् ॥ ५० ॥ प्रयोगछंद संपूर्ण । पूर्वान्वया विपरीत जाण । द्रव्यशुद्धि क्षितिमार्जन । हें मागील निरूपण पुढां आलें ॥ ८२० ॥ द्रव्यशुद्धि मुख्यशोधन । भूमिशुद्धि संमार्जन । आत्मशुद्धि सावधान । काढिल्या अनुलेपन मूर्तिशुद्धी ॥ ८२१ ॥ पूजासंभार सिद्ध करून । समस्त शंखतोयें प्रोक्षून । निजासनीं सावधान । एकाग्र जाण बैसावें ॥ ८२२ ॥ ज्यासी च्यानीं मूर्ति न ये पूर्ण । तेणें प्रतिमामूर्ति अधिष्ठान । तेथेंचि करावें पूजन । लब्धोपचारें जाण आगमोक्त ॥ ८२३ ॥ ज्यासी ध्याना मूर्ति ये अतिसंकटीं । तेणें बाह्योपचारआटाटी । सांडूनियां ध्यानदृष्टीं । करावी गोमटी मानसपूजा ॥ ८२४ ॥ ज्याचे हृदयींचें न विकरे ध्यान । बाह्यमूर्तिपूजेसी सावधान । तेणें उभयतां पूजन । करावें संपूर्ण आगमोक्त ॥ ८२५ ॥ पाद्यादीनुपकल्प्याथ सन्निधाप्य समाहितः । हृदादिभिः कृतन्यासो मूलमन्त्रेण चार्चयेत् ॥ ५१ ॥ सकळ पूजासंभार । निकट ठेवूनि उपचार । मग मूर्तीसी न्यासप्रकार । उक्तशास्त्र करावा ॥ ८२६ ॥ जैसेचि न्यास आपणास । तैसेचि करावे मूर्तीस । हा आगमोक्त गुरुसौरस । मूळमंत्रें न्यास मूर्तीसी ॥ ८२७ ॥ आगमोक्त करितां न्यास । अंगप्रत्यंगीं विन्यास । तेणें कर्ता होय हृषीकेश । हा अर्थसौरस दृढ करावा ॥ ८२८ ॥ दृढ करोनि अनुसंधान । मूळमंत्रें मूर्तिपूजन । हृदयीं आणि प्रतिमेसी जाण । पूजाविधान दोहीं ठायीं ॥ ८२९ ॥ साङ्गोपाङ्गां सपार्षदां तां तां मूर्तिं स्वमन्त्रतः । पाद्यार्घ्याचमनीयाद्यैः स्नानवासोविभूषणैः ॥ ५२ ॥ करचरणादि अव्यंग । मूर्ति चिंतावी सुन्दर साङ्ग । श्याम मनोहर श्रीरंग । उल्हास चांग निजध्यानीं ॥ ८३० ॥ मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ । सुनंदादि पार्षदमेळ । चिंतावे सकळ आयुधादिक ॥ ८३१ ॥ यथोक्त मधुपर्कविधान । अर्घ्यपाद्यादि आचान । पुरुषसूक्त्मंत्रें जाण । करावें स्नान निर्मळ जळें ॥ ८३२ ॥ मुकुट कुंडलें कटी मेखला । कांसे मिरवे सोनसळा । आपाद रुळे वनमाळा । कौस्तुभ तेजाळा कंठीं झळके ॥ ८३३ ॥ पाद पद्मांकित सुकुमार । ऊर्धरेखा ध्वज वज्र । वांकी अंदुवांचा गजर । चरणीं तोडर गर्जतु ॥ ८३४ ॥ गन्धमाल्याक्षतस्रग्भिर्धूपदीपोपहारकैः । साङ्गम्सम्पूज्य विधिवत्स्तवैः स्तुत्वा नमेद्धरिम् ॥ ५३ ॥ निढळीं शुद्ध श्यामकळा । टिळकु रेखिला पिंवळा । त्यावरी अक्षता सोज्ज्वळा । आरक्त तेजाळा कुंकुमाक्त ॥ ८३५ ॥ सुमनें गुंफिली वीरगुंठी । त्यांवरी मधुकरांची घरटी । तुळसीकमळमाळा कंठीं । चंदनाची उटी श्यामंगीं शोभे ॥ ८३६ ॥ धूप दीपं उपहार । तांबूल अर्पावा सकर्पूर । निरंजनें जयजयकार । मंत्रावसर अर्पावा ॥ ८३७ ॥ स्तुति करावी वेदोक्त मंत्रें । कां पुराणोक्त नाना स्तोत्रें । अथवा प्राकृत नामोच्चारें । नाना प्रकारें गध्यपध्यें ॥ ८३८ ॥ स्तवनें संतोष अधोक्षजा । ऐसें भावावें महाराजा । मग साष्टांगें अतिवोजा । गरुडध्वजा नमस्कारावें ॥ ८३९ ॥ आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं संपूजयेद्धरेः । शेषामाधाय शिरसा स्वधाम्न्युद्वास्य सत्कृतम् ॥ ५४ ॥ द्वैतभावें भजनविधि । ते जाणावी स्थूल बुद्धि । भजनाची भजनसिद्धी । जाण त्रिशुद्धी तन्मय होणें ॥ ८४० ॥ मूर्तिध्यानें तन्मय स्थिति । ऐक्यत्वें राहे निश्चळ वृत्ति । याचि नांव मुख्य भक्ति । उठलिया पुढतीन् नमावें हरी ॥ ८४१ ॥ अओशी पूजा करूनि हरी । शेष प्रशादु धरोनि शिरीं । मग देवो आपणियाभीतरीं । हृदयमंदिरीं निजविजे ॥ ८४२ ॥ एवं पूजेचें उद्वासन । ध्यानमूर्ति हृदयीं शयन । प्रतिमा पर्यंकीं निजवून । विधिविधानसमाप्ति ॥ ८४३ ॥ जाहलिया पूजविसर्जन । विसर्जूं नये अनुसंधान । अखंड हरीचें स्मरण । सर्वस्वें आपण सर्वदा कीजे ॥ ८४४ ॥ या नांव गा आगमविधि । राया जाण त्रिशुद्धि । सदा पाळिती सद्बुद्धि । परमत्मसिद्धिप्रापक ॥ ८४५ ॥ आगमोक्त विधिकक्षण । प्रतिमाचि मुख्य नव्हे जाण । ज्यासी जेथ श्रद्धा पूर्ण । तेथ हें विधान सुखें कीजे ॥ ८४६ ॥ एवमग्न्यर्कतोयादावतिथौ हृदये च यः । यजतीश्वरमात्मानमचिरान्मुच्यते हि सः ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कंधे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ हे पूजा नव्हे एकदेशी । बहुत स्थानें ये पूजेसी । त्यांत शीघ्रतर जें प्रप्तीसी । तें मी तुजपासीं सांगेन राया ॥ ८४७ ॥ येणेंचि विधानें यथाकाळीं । साङ्ग पूजा कीजे जळीं । अथवा सूर्यमंडळीं । पूजा सोज्ज्वळीं हरिध्यानें कीजे ॥ ८४८ ॥ अग्नीच्या ठायीं होय दीप्ति । पूजा कीजे कमळापति । अवघ्यापरीस शीघ्रप्राप्ति । पूजावा अथिथि भगवद्भावें ॥ ८४९ ॥ आलिया वैश्वदेवाचे अंतीं । तो भलता हो भलते याती । त्यासी जे भगवद्भावें पूजिती । त्यांचे घरा पूर्ण प्राप्ति वोरसोनि ये ॥ ८५० ॥ पूर्वीं अनोळखु निश्चितीं । आलिया वैश्वचेवाचें अंतीं । त्यातें ब्रह्मभावें जे पूजिती । त्यांसी भुक्तिमुक्ति आंदणी ॥ ८५१ ॥ त्या वैश्वदेवाचे अंतीं जाण । निजभाग्यें आलिया शुद्ध ब्राह्मण । तया श्रद्धेनें पूजितां आपण । ते घरीं नारायण स्वानंदें वसे ॥ ८५२ ॥ राया वैश्वदेवाचें अंतीं । अतिथीसवें ये भुक्तिमुक्ति । विमुख जाहल्या त्या लाभा नाडती । पूजकां सुखप्राप्ति परमानंदें ॥ ८५३ ॥ अतिथीच्या ठायीं मूर्तिध्याम । सर्वथा करणें न लगे जाण । तो स्वरूपें स्वयें नारायण । पूजितां संपूर्ण सर्वार्थसिद्धि ॥ ८५४ ॥ एवं अतिथीसी जें अर्पे । तें भगवंतमुखीं स्मर्पे । यालागीं अतिसाक्षेपें । अतिथि ब्रह्मरूपें पूजिजे सदा ॥ ८५५ ॥ जें जें बोलिलें पूजास्थान । तेथें निजश्रद्धाचि प्रमाण । श्रद्धेवेगळें राया जाण । प्राप्ति संपूर्ण कदा न लभे ॥ ८५६ ॥ निजश्रद्धेचें हृदय स्थान । ते हृदयीं विध्युक्त पूजन । करितां श्रद्धेनें आपण । प्राप्ति संपूर्ण उद्बोधे स्वयें ॥ ८५७ ॥ येर्हवीं तरी आपुल्या देहीं । चाळक ईश्वरु आहे हृदयीं । श्रद्धेनें भजतां त्याचे ठायीं । निजप्राप्ति पाहीं सहजें लाभे ॥ ८५८ ॥ जें जें आपण सेविजे । तें तें भगवन्मुखीं भाविजे । येणें निजभजनें पाविजे । जाण सहजें परमात्मा ॥ ८५९ ॥ सांडोनि देहींची अहंता । सकळ भोग ईश्वर भोक्ता । ऐसी दृढ भावना भावितां । पाविजे परमार्था अपरोक्षसिद्धी ॥ ८६० ॥ देह जड मूढ अचेतन । सकळभोक्ता ईश्वर पूर्ण । तेथ वाढवूनि देहाभिमान । भोगिती अज्ञान अनेक दुःखें ॥ ८६१ ॥ ते सांडूनि देहअहंता । हृदयस्था शरण जातां । पाविजे पूर्ण परमार्था । जाण तत्त्वतां नृपवर्या ॥ ८६२ ॥ निःशेष सांडिजे मीपण । याचि नांव हृदयस्था शरण । तूं सहजें परब्रह्म पूर्ण । मिथ्या देहाभिमान धरूं नको ॥ ८६३ ॥ राया येणेंचि कर्में जाण । तुटे कर्माचें कर्मबंधन । पाविजे पूर्ण समाधान । तें हें मुख्य लक्षण नृपनाथा ॥ ८६४ ॥ आगमोक्त निजभजन । कर्मयोगाचें मुख्य लक्षण । ऐकतां राजा समधान । परमानंदें पूर्ण निवाला ॥ ८६५ ॥ जंव जंव रायाचें पुरे कोड । तंव तंव कथा लागे गोड । अतिशयें श्रवणाची चाड । विशेषें वाड थोरावली ॥ ८६६ ॥ राजा निवालेनि परमानंदें । सुखावलेनि निजबोधें । लांचावलेनि स्वानंदें । पुधां प्रश्न विनोदें पुसेल ॥ ८६७ ॥ उगें राहतां आपण । उठून जाती मुनिगण । यालागीं प्रश्नावरी प्रश्न । विचित्रविंदान पुसतु ॥ ८६८ ॥ स्वानंचें लोधली चित्तवृत्ती । इंद्रियें वेधलीं सुखस्थितीं । राजा निवाला निश्चितीं । तरी प्रश्नोक्ती पुसत ॥ ८६९ ॥ पुसेल हरीचे अवतार । ते कथा सुंदर मनोहर । निरूपण अति अरुवार । निजजिव्हार निववील ॥ ८७० ॥ त्या प्रश्नाचें प्रत्युत्तव । कथाकौतुक सनागर । एका जनार्दनाचा किंकर । उपानहधर संतांचा ॥ ८७१ ॥ संत सज्जन कृपास्थिती । श्रीजनार्दन वरदमूर्ती । पुढील कथेचि व्युत्पत्ती । सांगेन यथार्थी अर्थुनी ॥ ८७२ ॥ श्रीभागवताचे राशीवरी । एकाजनार्दन केला मापारी । तो निजबोधाचे कुडवावारीं । भरील वखारी श्रवणाच्या ॥ ८७३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां एकाकार टीकायां निमिजायंतसंवादे मायाकर्मब्रह्मनिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ५५ ॥ ओव्या ॥ ८७३ ॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org